भारत देश माझा
भारत देश माझा
1 min
368
भारत देश माझा आहे
विविधतेने नटलेला।
शूर वीरांच्या पराक्रमाचा अन
विविधतेत एकता असलेला।
अमृत महोत्सव आज
साजरा करू या आनंदाने
देशासासाठी आहुती देणाऱ्यांचे
गीत गाऊ अभिमानाने।
उंच आकाशी नभात
फडकऊ या तिरंगा।
आमच्या भारत देशातच
वाहते आहे गंगा आणि जमुना।
गाऊ या राष्ट्रगीत अभिमानाने
साजरा करू आनंद उत्सव।
७५ वर्ष पूर्ण झाली
आठवण करूनी शूरवीरांची
जल्लोषात साजरा करू
अमृत महोत्सव।
