STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Others

4  

Sakharam Aachrekar

Others

आयुष्य म्हणजे...

आयुष्य म्हणजे...

1 min
4.6K

आयुष्य म्हणजे एक क्षणभराचा विरंगुळा

अन् कधीतरी क्षणभर मिळणारा जिव्हाळा


आयुष्य म्हणजे एक अरुंद रस्त्याची वाट

जीवनाची असंख्य वळणे अन् वेडेवाकडे घाट


आयुष्य म्हणजे एक विचारांचं विस्तीर्ण मैदान

अन् कधी होणारी असंख्य प्रश्नांची गलथान


आयुष्य म्हणजे एक उंच आकाशातली तारका

अन् कधी न संपणारी असंख्य रंगांची मालिका


आयुष्य म्हणजे एक कोर्‍या कागदावरचं चित्र

अन् कधी मिळणारे अनेक अनुभव विचित्र


आयुष्य म्हणजे एक विशाल स्वप्नांची इमारत

अन् कधीतरी केलेली स्वतःसोबतची शरारत


आयुष्य म्हणजे दोन जीवांचा अनोखा खेळ

अन् क्षणाक्षणाला निघून जाणारा भविष्याचा वेळ


Rate this content
Log in