शिक्षक दिन
शिक्षक दिन
1 min
220
शाळेत जायला सुरवात
केली तेंव्हा माझी पाटी होती कोरी
पाटीवर हळू हळू लिहून ,
गोळा केली ज्ञानाची शिदोरी।
घराचा पाया जसा असावा
लागतो भक्कम।
तसाच शिक्षणामुळे जीवनात
कर्तृत्वाची ईमारत उंच जाते पटकन।
अक्षरांची ओळख करून दिली, तसे माणसे ही वाचायला शिकवली।
म्हणूनच मला आयुष्यात पुस्तकासारखी माणसेही वाचता आली।
अजूनही हारले कधी तर,
हारलेलं आवडत नाही माझ्या मना।
आठवते तुमची कविता , म्हणते
फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा।
