लहानपणीचा खेळ
लहानपणीचा खेळ
लहानपणीचा खेळ
खेळत नाही कोणी।
मोबाईल हातात लेकरांच्या
नाही दिला तर डोळयांत पाणी।
आपडी थापडी
गुळाची पापडी ।
लहानपणीचा पहिला खेळ,
नंतर होती आमची काचबांगडी।
भातुकलीची भांडी आता
खूप वाढत गेली।
खेळामधले राजा राणी
आता मोठे झाली।
मामाच पत्र आहे आता
आमचं खूप दिवसाचं हरवलेलं ।
प्रत्येकजण मोबाईलमध्ये
असत आता गुंतलेलं।
लिंगोरच्या नाही,
नाही आता लंगडीपाणी।
कोणी खेळतांना दिसत नाही
सारखे हेडफोनवर गाणी।
खो खो संगीत खुर्ची
आता फक्त नावालाच।
क्रिकेट खेळ आहे आता
सगळ्यांचाच खूप आवडता।
लपाछपी, कबड्डी आमच्या
होती फार आवडीची।
वेळ मिळाला तर शाळेतच
आता आहे सवडीची ।
असे बालपणीचे खेळ
आता खेळत नाही कोणी
मोबाईलच्या गेममध्ये व्यस्त
कितीही आरडा ओरडा कोणी।
