चिमणा चिमणीची प्रवास
चिमणा चिमणीची प्रवास
1 min
234
काडी काडी
गोळा करून।
बांधले घरटे
डोके लावून।
पाऊस जोराचा
आला जेंव्हा।
घरटे पडले खाली
चिमणी बघते तेंव्हा।
आला चिमणा घराकडे
चिमणी धायमोकलून रडली।
आग वेडे, रडते कशाला
देवाने आपली सत्वपरिक्षा पहिली
कोणी मदतीला येणार नाही
आपल्या ,आपणच सावरू।
नव्या घरात आपल्या ,नव्याने
आयुष्याचा प्रवास सुरु करू ।
