व्हॅलेंटाइन डे : एक विचारमंथन
व्हॅलेंटाइन डे : एक विचारमंथन


आज जगाच्या नकाशात भारतीय संस्कृती आदर्श गणली जाते. युवावर्गाला पाश्चात्य संस्कृतीचे वारे लागले नि घराघरात त्या संस्कृतीचा अवलंब होऊ लागला. तरूण पिढी इंग्रजाळू लागली नि त्यालाच उच्च सोसायटी असे नामांकन झाले.सहाजिकच भारतीय संस्कृती खेडवळ,गावंढळ वाटू लागली.वाढदिवसाला औक्षण करते दूरच पण केक कापून शॅंपेनच्या बाटल्या उघडणे स्टेटस सिंम्बल झाले. झोपताना दूध पिऊन झोपणारा तरूण वर्ग रात्री उशीरापर्यंत पार्ट्या जोडू लागला नि बिअर ,सिगारची फॅशन करू लागला.म्हणजे बाळबोध अशी भारतीय संस्कृती लोप पावत चालली.पॅकेजेस वाढल्याने हॉटेल्स,मॉल्स,शॉपिंग यातच वेळ व्यतित करू लागला.आज भारतात दसरा दिवाळीपेक्षा नाताळ नि न्यू इअर जास्त प्रमाणात साजरे होतात.याच गोड गैरसमजातून व्हॅलेन्टाईन डे हा दिवस(कोणालाही या दिवसाचे खरे कारण किंवा खरी कथा माहित नाही) साजरा होऊ लागला.
नवीन पिढी चित्रपटसृष्टीचे जास्त अनुकरण करताना दिसते.त्या आभासी जगाला सत्य समजून तसेच वागण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे आज घरांघरातुन व्हॅलेंटाईन डे साजरे होतात.घरातील आई,आजीचे संस्कार आउटडेटेड होऊन त्यांची चेष्टा केली जाते. हे खुप चुकीचे आहे हे कळत असुनही मागणी पिढी असहाय झाली आहे.पाश्चात्य संस्कृतीचे भूत नव्या पिढीच्या डोक्यावरून उतरवायला आता चित्रपटसृष्टी पुढे सरसवायला हवी. परंतू पैसे कमविण्यासाठी ते असे करत नाहीत त्यामुळे आपल्या आदर्श संस्कृतीचा ऱ्हास ' याचि देही याचि डोळा' पाहण्यावाचून गत्यंतर नाही.