सुगंधी क्षण
सुगंधी क्षण


कुठून कसें यजमानांनी
पाहिले मला घरीं जातांना
पाहतांक्षणी कळी खुलली
स्मितहास्य माझें टिपतांना
आलें माझ्या घरीं अचानक
घेऊन त्यांच्या आईबाबांना
पसंत आहे मुलगी तुमची
रहा उभे फक्त कन्यांदाना
आईबाबा क्षणभर थक्कच
काय आहें बरे गौडबंगाल
कोण तुम्ही अन् अचानक
मी तर हा असा दीनकंगाल
हसुनि मग यजमान वदले
पत्नी म्हणून मी निवडली
तुमची ही सदगुणी कन्या
अशी ही गृहलक्ष्मी बनली
सुगंधी क्षण आले नशिबी
करोडोपतीची राज्ञी बनली
कंगाल पित्याची ही मुलगी
पतीराजांनी हृदयी वसवली