श्रीकृष्णजन्माष्टमी
श्रीकृष्णजन्माष्टमी


अरे राधेच्या कृष्णा, हो राधेचा शामच तू. म्हणूनच तुझ्या नावाआधी तिचेच नाव लागते. अष्टपत्नींचा पती झाल्यास जरासंधाच्या तावडीतून सोडविलेल्या सोळा सहस्त्र एकशेआठ स्त्रियांचा पत्नी म्हणून उद्धार केलास. रुक्मिणीला पट्टराणीचा दर्जा दिलास. पण खरे प्रेम मात्र राधेला देवून बसलास. म्हणतात ना पहिले प्रेमच खरे असते. तुझ्या जन्माचे नि जीवनाचे थोडे गूढ वाटते. देवकी आणि वासुदेवाचे तू आठवे आपत्य. आई-वडील कंसाच्या बंदीवानात. नारदाने केलेल्या भविष्यवाणीवरून दुष्ट कंसाने बहीण आणि मेव्हण्याला कारावासात ठेवले. त्यांच्या सात अपत्यांना निर्घृणपणे मारून टाकले. तुला वाचवण्यासाठी कारागृहातील पहारेकऱ्यांवर मोहिनी केलीस. वासुदेवाच्या बेड्याही निखळून पडल्या. बंदीगृहाची द्वारे उघडली. यमुनेला महापूर आलेला. काळोख्या रात्री तुला पाटीत घालून वासुदेव गोकुळच्या दिशेने चालू पडला.
यमुना दुथडी भरून वाहत होती. वासुदेव त्या पाण्यातून चालत होता. डोक्यावर तुला घेतलेली पाटी. यमुनेला तुझ्या पदकमलांचा स्पर्श झाला आणि ती शांत झाली. तिचा पूर ओसरला. किती अतर्क्य तुझे जीवन! तू मनुष्यरूपात, मनुष्यापोटी जन्माला आलास. मनुष्यरूपात तू सर्व मानवी भोग भोगलेस. अनेक संकटांचा समर्थपणे सामना केलास. सर्व संकटांवर मातही केलीस. तुझ्या बचावासाठी नंदाने आपली नवअर्भक असलेली त्याची कन्या वासुदेवाच्या स्वाधीन केली जिला कंस दगडावर आपटून मारणार होता. कंसाने तिचाही वध केला. मरताना तिच्या वाणीतून कंसाला कळाले की त्याचा मारेकरी अजूनही जिवंत आहे, नि तो गोकुळात आनंदात वाढतो आहे. त्याने कितीतरी बालकांची हत्या केली आणि त्यांचे छळ केले पण तू त्याच्या तावडीतून सहीसलामत सुटलास. पुढे गोपगोपींशी खेळत दही-दूध-लोणी चोरत बालपण जपलेस. यौवनावस्थेत राधेवर प्रीत केलीस. नंतर तिचाही तुला विसर पडला. गवळणींचे दुधाने भरलेले माठही तू खडे मारून फोडलेस. गवळणींनी तक्रार केल्यावर यशोदेने तुला उखळाला बांधून घातले. परंतु तुझ्यातील दैवीशक्तीने जमिनीत रोवलेल्या उखळासकट चालू पडलास. गोड हसून यशोदेला सार्या विश्वाचे दर्शन दिलेस.
आपल्या लडिवाळ खोड्यांनी साऱ्या गोकुळाला वेड लावलेस. राधेसोबत नि गोपिकांसोबत रासलीला रचलीस. यमुनेच्या डोहातील कालियाला शापातून मुक्त केलेस. गोकुळात बालपण उपभोगलेस नि मोठा झाल्यावर द्वारकेला निघून गेलास. पुन्हा गोकुळाकडे वळूनही पाहिले नाहीस. तिथे द्वारकेत आपले राज्य स्थापन केलेस आणि विवाह करून सुखी संसार केलास. अष्टपत्नींचा पती झालास. जरासंधाच्या तावडीतून सोडविलेल्या सोळा सहस्त्र एकशेआठ स्त्रियांचा पत्नी म्हणून उद्धार केलास. रुक्मिणीला पट्टराणीचा दर्जा दिलास. पण खरे प्रेम मात्र तू राधेला देऊन बसलास. म्हणतात ना पहिले प्रेमच खरे असते. गोकुळात बालपण उपभोगलेस. द्वारकेत सोन्याचे राज्य स्थापन केलेस. पांडवांशी मैत्री केलीस. मयसभेत पांडव द्युतात हरले असता दु:शासन जेव्हा द्रोपदीच्या वस्त्राला हात घालत होता तेव्हा बंधू म्हणून तिचा पाठीराखा झालास. तिच्या हाकेला लगेच धावत आलास.
युद्धाच्या वेळी अर्जुनाला गीतोपदेश केलास. कौरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचा सारथी बनलास. न्यायी पांडवांना युद्धही जिंकून दिलेस. द्वारका बुडल्यानंतर तू तिकडे वळलाही नाहीस. मानवाच्या किती प्रतिकृतीमध्ये तू आपले आपल्या लीला दाखवून दिल्यास. खरंच! तुझा मानवी जन्म निराळाच. जीवनातील सगळेच रंगढंग तू उपभोगलेस. खरेच कृष्णा तुझी लीला अगाध.