*सानूल पण सोनूल बालपण* भाग पहीला
*सानूल पण सोनूल बालपण* भाग पहीला


भाग पहीला
बालपण हे आयुष्यात एखदाच मिळत...आणि ते सुंदररीत्या मनाच्या गाभा-यावर कोरल जात ते अगदी आयुष्याच्या शेवट पर्यन्त ते मनावर राज्य करत असत.
असच आपण सर्वांनी बालपणी उपभोगलेले असते.ते क्षण कुणा लाहान मुलाला पाहील की,जे आपल्या आयुष्यात लहापणी घडून गेलेले असतात. ते क्षण त्या गमंतीजमंती आठवतात. जसे जसे आपन मोठे होत जातो .तस तसे गत काळातील या आठवणी कधी कधी उजाळा देत असतात.तसे प्रत्येकाच्या आयुष्यात काही तरी सांगनारे आंबट गोड क्षण हे येत असतात.त्यातले काही असे क्षण आठवणीतल्या आठवणी बनलेले असतात.ओठावर स्मित हास्य फुलवनारे क्षण,हर्षभराने आंनदलेले क्षण,निरागस मनाने बागडलेले क्षण,हसरे क्षण,रूसवे क्षण,स्वत:हा रडलेले क्षण,दुस-याला रडवनारे क्षण,काही गमंती जमंतीचे क्षण, आपल्या सर्वांच्या आयुष्यात बालपनी ,तरूणपणी,प्रौडपणी घडलेले असतात,किंवा घडत असतात.अश्याच काही रंगी बेरंगी क्षणांची नांदी प्रत्येकाच्या मन मंदिरी बसलेली असते.त्यातल्या त्यात काही निवडक क्षणाची रंगी बेरंगी पुष्पे मनात दरवळत असतात.अशीच काही सुगंधीत दरवळनारी व काही न दरवळनारी पुष्पे,एका धाग्यात ओवली की,सुदंर अशी क्षण माला तयार होते.या क्षण मालेतील काही पुष्पे आठवणीना उजाळा देत,आपल्या मनात दरवळत असतात.आणि आयुष्य पून्हा पून्हा भरभरून जगण्यास भाग पाडतात.गत काळीच्या सागरात मनसोक्त डुबण्यास भाग पाडतात.तेच क्षण लहान असताना उमगलेले नसतात.परंतू त्यातल्या गमंती जमंती कालांतराने आपल्याला उमगतात.आणि आपसूक मनातून ओठावर,आणि ओठावरून लेखणी द्वारे ,पाऊस पडल्या वर छतावरूण ओघळणा-या पागोळ्या प्रमाणे झरझर वही वर उतले जातात. आणि हे क्षण आपल्या सर्वांन मधे आंनदित होवून बागडत नाचत राहतात.
कोकणातल माझ गाव त्याच वर्णन केल नाही तर पूर्ण चित्रात एखादा रंग भरायचा राहूण गेल्यावर ,ते चित्रच बेसूर वाटते..
,सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले रम्य मनोहर कोकण,कोकणची भुमी पशूरामाची.त्या मुळे या भुमीला वेगळा असा इतिहास आहे .हे वेगळ सांगायला नको,हिंदवी स्वराज्य निर्माण करनारे छत्रपती शिवाजी राजे, त्यानी बांधलेला मालवण समुद्रातील किल्ला,सर्वांचे लक्ष वेधल्या शिवाय राहात नाही.त्याच बरोबर या भूमीत साधू संत जन्माला आले हे ओघाने आलेच,
स्व:तहाहून देव वावरलेल्या कोकणचा थाट काही औरच,डोंगर माथ्या वरूण चारी बाजूस नागमोडी वळणे घेत खाली उतरलेल्या वाटा कोकणच रक्षण करण्यास सज्य असलेला सिंहा सरखा कणखर सह्याद्री पर्वत ,सह्याद्रीच्या कडेकपारीतून नाद घुमवत वाहणार-या नद्या,आजू बाजूला वसलेली हिरवी गार हिरवळ,उंच उंच डोंगर,त्याच्या पायथ्या पाशी वसलेली देवालये,त्या देवालयात स्व:हून देव राहायला आल्याचा भास,हे सार पाहून मन उल्लासीत झाल्या वाचून राहत नाही.पूर्ण सुष्टी हीरवी गार सदा टवटवीत असणा-या लता वेली ,त्यावर ऊमललेली नाजूक सूदंर फुले,अश्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलानी बहरलेल्या वनात तो पांडूरंग स्व:ता कणा कणात विराज मान असल्याची जाणीव होते.शेती वाडी दुभती जनावरे,संपूर्ण परीपूर्ण सुष्टी कूठे असेल तर ती कोकणात,इथल्या लोकांच रहाणीमान साध असल तरी त्यांची बोली भाषा एवढी गोड असते.की प्रत्येकाला वेढलावल्या शिवाय राहात नाही.आंब्याच्या झाडाला हिरवी गार पालवी, चिंचेला मोहर,वडाला लोबंणा-या पारंब्या,पिंपळाच्या झाडावर सळसळनारा वारा,पाहूण मनात गुदगुदल्या झाल्या शिवाय राहात नाही.रानात बेधुंद वाहनारा रान वारा तिथला गारवा केवड्याचा वार-यावर पिंगा घालनारा सुगंध,आणि ईतर सुवासाची फूले त्यांचा भिन्नभिन्न सुगंध , अजून सुवासीक फुलांची अनेक झाडे मानसाला प्रेमात टाकल्या शिवाय राहत नाही.धरतीवर कूठे रान मेवा चाखायचा असेल,तर तो फक्त कोकणचा,अस माझ कोकण सर्वांना हवहवस वाटणार नाही हे नवलच,म्हटल पाहीजे,अश्या या परीपूर्ण सूखसोईने युक्त असणा-या कोकणात माझ बालपण रंगल,हे माझ भाग्यच,आणि त्याहून मी या कोकणात जन्म घेतला,व कोकण माझे ,व मी कोकणची, हे गर्वाने सांगणे हे माझे सौभाग्य....क्रमंश ...पूढे...
जिवन जगण आणि ते जगवण अशी कला असते.जन्माला सर्वच येत असले तरी ठराविक लोक जिवण जगत असतात .अस म्हणन वावग नसाव.कारण आज सरळ सुटसुटीत जीवण कुणाच्याही वाटणीस नसाव,आणि जर का तस असल तर तो जीव पुण्यवान म्हनता येईल.पण त्याही जीवाच काही सल मनात असतच. माझ्याही मनात सल आहे पण ते माझ्या आई साठी काही करता आले नाही याच..आज ही माझ्या बालपणातल्या काही गोष्ठी माडण्याच कारण आईच्या पुण्यवान स्मृतिस उजाळा देण एवढाच माझा प्रामाणीक हेतू आहे.
माझ गाव कोकणात.माझ सार बालपण कोकणातल्या लाल तांबड्या मातीत गेले.अनवानी फीरताना कायम आमच्या पायाला लाला मातीच वंगण असायच,घरी आमच्या अंगणात सारवण शेणाच असायच अंगण कस लख्ख साफ सुतर ,त्यावर आमच्या पायाचे ठसे हुबेहूब ऊठलेले दिसले की माझी आई जास्त ओरडत असे .आईला मी आये म्हणाची.आये घरातून बाहेर आली की पहील दर्शन तीला आमच्या लाल मातीच्या पायाच्या ठश्याचे होई,,ते एवढे गडद उठायचे,की पाहणा-याला वाटव पादूका ठेवल्या की काय?आये मात्र पदूका म्हणून गप बसायच सोडून आमचा उध्दार आपल्या गोड गळ्यातून लग्नात जश्या बायका ओव्या गातात ,तशी ताला सूरात चार घराला ऐकू येइल अशी आये ओरडायची,आयेचा आवाज मात्र खडखडीत असायचा,आयेला कधी म्हटल आये हळू बोल त्यावर आयेच उत्तर अगदी मुद्देसूत ठरलेल असायच..
""कीत्याक हळू बोला कोणाची चोरी केली काय?"तस आत्ताही ती अंगणात येताच विज कडकडावी तशी कडाडली...
"""को..णाच्या पायार शिरा पड..ला गो..
आयेच्या भीतीने आम्ही काही बोलत नसू .पण आयेचा तोंड कधीच लवकर गप्प बसत नसे. अंगणातले मातीचे डाग नाहीसे झाले तरी आये नाँनस्टाँप बोलत बसायची,जोवर तीला कूणी बाजूची मानस किंवा घरातली काही बोलत नाही तो वर ती नाना अलंकारानी स्त्री नटते,तशी ती नाना शिव्यानी आमची पुजा करायची.मधीच कुणी म्हनायचे.
,जावदे गे तीया कीतक्या बोल्लय तरी पोरा करूचा ता करतली""
"""पोरांका काय खळा सारवचा लागना नाय,आनी पानी गे कोन हाडून दीता"""
आयेन पाण्याचा विषय काडला की मी हळूच आये पासून दहा हात लांब राहूनच बोलायची कारण धणूष्यातला बाण आणि आयेच्या हातातली झाडू कधी आयेच्या हातून सुटून आमचा नेम धरायची ते माहीतह पडायच नाही...आपल्याला लागल आणि तोंडातून शब्द आला ,हाय,तेव्हाच कळायच की आयेन झाडू फेकूण मारली,,म्हणून स्आवत:हाच्या संरक्षणार्थ मी लांबूनच बोले. पण हळूच बोलायची.
""आये तीया आता खळा सारय़ताना मीया पानी हाडून देयन""
मी अस बोलली की बारा हत्तीच बळ अंगात आल्या प्रमाणे आये झाडू घेवून मागे लागे,आमचा माय लेकराचा हा पाठशिवनीचा खेळ पाहायला वाडीतली माझ्याच वयाची चार पोर माझ्या बरोबर धावत.आये काय जराशी धावल्या सारखी करायची आणि थांबायची ,ह्याच कारण मनातून आयेला मला मारायचे नव्हते.पन पोर मात्र आयेक डीवचण्या साठी म्हणायची..
"""गे ताई तीया दमलय???तर सांग आमी सोबल्याक धरून हाडून दीतो.."
शोभा अस माझ सुदंर नाव पण त्या नावाची वाट मात्र लावून त्यात व्याकरणातले अनेक वचन वापरून सोबल्या केलल,आणि त्याच नावात पून्हा बहूवचन वापरल जायच, आम्हा मुलांन मधे भांडण झाली की शोभाच,सोबल्या,सोबल्याच,मग खोबल्या,अती झाल टोबल्या अस दोन अक्षरी नावाच रूपांतर बहू शब्दात व्हायच...
मानसाच मन हे काही वेळा मनातच मरत असते. पाणी डोळ्यात सुकत.अंधारावर मात करत ,सूर्य जेव्हा पूर्ण ताकतीनीशी धरतीवर अवतरतो,अवघ जग काही मिनिटात प्रकाशमय होते. आशेची किरणे सूर्य प्रकाशात उजळून आठवणीच्या खिडक्याची तावदाने मनात झुलत उघड झाप करतात. तेव्हाच मनाच्या द्वारी.गत काळीच्या स्मृति जाग्या होवून झुलत राहतात,मनाच्या बंद कुलूपात बंदीस्त असलेल आठवणीच गाठोड अलगद सोडावस वाटत आणी सूखमय बालपणातले ते दिवस झरझर वहीच्या पानावर उतरून साक्षात मनच कोरून ते
मधात घोळवलेल्या आठवणीतल्या शब्दांना झाडाखाली फुलांचा सडा विखूरला जातो.... तस मनमनात आठवणी विखरून त्या बेधुंद होतात.आणि पून्हा पून्हा ताज्या होतात..
, माझ्या घरी आम्ही सर्व एकत्र कुटुंबात राहत असू,त्याकाळी माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी शिक्षणाचे महत्त्व माहिती नव्हते. शिक्षण घ्यायलाच हवे.अस,तेव्हा तरी कुणाला महत्वाचे वाटत नसावे.अस माझ मत, दुसर कारण कदाचीत आमची परिस्थिती फार हलाखीची होती. दोन वेळा पोट भरण्याचे वांदेअसायचे, तीथे कपडे वगैरे मिळणे तर सोडूनच द्या ,साधा चहा सूद्धा आम्हाला मिळणे कठीण असायचे.,आणि महत्वाचे म्हणजे आमच्या घरची वडीलधारी माणसे एकूण एक निरक्षर होती. फक्त नाही म्हणायला माझे मोठे काका त्यांना आम्ही सर्व ताता म्हणून हाक मारत असू ते तेवढे काहीतरी लिहत. किंवा वाचत असत. आमचे वय वाढत असूनही आम्हाला शाळेत जा म्हणून सांगणारं कोणी नव्हतं आम्ही एकूण सख्खी चुलत मिळून आठ भावंडे , परंतु आम्हाला कधी सख्ख चुलत असा फरक समजलाही नाही. आमचे आई-वडील भले अशिक्षित असले तरीही आम्हा सर्व भावंडांना दुजा भाव न दाखवता प्रेम करायचे की आम्हाला कधी सख्ख ,चुलत, माझ, तूझ, हा भेद भाव कळलाही नाही. आजही आम्हा भावंडांमध्ये कसलेही मतभेद नाही याचं कारण म्हणजे आमचं एकमेकांवर असलेले निस्वार्थ प्रेम, मी वयाने वाढत होती. तसं मला शाळेच्या आकर्षण वाटायला लागले, आजूबाजूची लहान लहान मुलं शाळेत जाताना पाहून मलाही सारखं वाटायचं आपणही शाळेत जाव! मला शाळेत जाण्याचे एवढे वेड लागले, कि रात्रंदिवस मी शाळेचा ध्यास घेतला. एक दिवस मी माझ्या आये जवळ गेली .पण आयेला कस सांगू हे मला काही कळत नव्हते. एवढ्यात आयेच बोलली,
""सोबा जा गो भायरची दोन शीरपूटा आण(झाडाची बारीक वाळलेली लाकडे)
एरवी आयेन काही सांगीतल की मी नाक मुरडत असायची.पण या वेळी मी नीमुटपणे बाहेरून लाकडे आयेक आणून दीली.आणि तीथेच घुटमळत राहीली.ते पाहून आये म्हणाली..
""काय गो ..काय...जाला..चुलीकडे कीत्याक घुटमळतय??
आता आयेला काय सांगू??धीर होत नव्हता पण आत्ता या वेळी काही तरी सांगायला हव ,नाही तर ही मला पुन्हा तोच प्रश्न विचारेल म्हणून मी म्हणाली...
""आये तीया आमका खावक काय हाडलय गे"""
माझ वाक्य पूर होत नाही तोवर आये समुद्राला भर्ती यावी आणि तो खळवळावा तशी आये खवळली
""मीया मिरवक बाजारात नाय जावक होतय....हयच कासात शेणी पलटूक गेल्लय... तूका खावचा पडला आधी रातीक तूमच्या पोटाक काय करू ता कळना नाय...
"""नको गे खावक मीया तूका असाच इचारलय..समजला मा...माका तुका काय तरी इच्यारूचा आसा....
"""तीया पण मोठा जालय तुका पन इचारूसा वाटता...
"""होय गे...
"""मगे बोल काय इचारतय"??"
"""आये ...मीया शाळेत जाव गे...
"""काय शाळेत जातलय?? हयसर खावचे वांदे जाले ...आणि तुका शाळेचा पडला...
"""अगे पैसे नाय लागनत शाळेत जावक..
""मगे तुका कोण फुकट पाटी दिताला""
"""नाय गे पन मीया शाळेत जातलय..
आयेच्या मनात असून पण मला ती शाळेत पाटवू शकत नव्हती हे तीच्या चेह-यावर जानवत होत...पण तीचा ना विलाज असेलही तेव्हा पण ते न दाखवता आयेने चुलीच्या कोणत ठेवलेली ,व मीच आणून दिलेली काठी माझ्यावर उगारत खेकसली
"""तीया आदी हयसून भायर जा...
"""जातय,जातय,नाय थाबनय पण शाळेत मीया जातलय आयकलय"""
""तीय ऊभ्या रव गो तुका कसे कुळथे घालतय ते बघ....
पण आयेच बाकी भाषण ऐकायला मी थांबली नाही......
जास्त जिद्द न करता तिथून निघून गेली नसती तर आयेन माझी पाट मात्र भात शिजून मऊ होतो,तशी केली असती.
' पुढच्या एक आठवडा भर आयेला मी शाळेत जानार म्हनून भांडवून सोडत असे. ज्याच्या अंगी जिद्द असते. त्याच्या पाठीशी साक्षात देव उभा असतो.असे म्हनतात ते काही खोट नाही. आणि माझ्या प्रयत्नांना यश आले एक दिवस रोजच्या माझ्या कटकटीमुळे आईने मला हो म्हणून होकार दिला आये कडून होकार मिळाल्याबरोबर मला एवढा आनंद झाला की मी तो शब्दात मांडणे सुद्धा अशक्य आहे.आयेचा होकार येताच शाळेत जायला प्रथम आपल्याकडे एक पार्टी हवी याची मला जाणीव झाली .पण आमच्या गरिबीमुळे आपल्याला पाटी, कोण देणार हा प्रश्न मात्र दिवसभर भेडसावत राहिला. अखेर रात्री गोधडीवर पडताच मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आमच्या समोरच्या सावंताच्या घरात महाडेश्वर कुटुंब भाड्याने राहत होते. त्यांची मुलगी कुंदाबाई प्राथमिक शाळेत शिकवत होती. म्हणून मला या बाईजवळ पाटी मिळनार अस वाटून मी सकाळ होताच तीथे जायच ठरवल..आणि मी सकाळी लवकर उठून प्रथम त्यांच्या घरचा रस्ता धरला. आणि घाबरत घाबरतच बाहेरच्याअंगणात ऊभी राहीली कारण मी कुंदा बाईना फार घाबरत असे.मी अंगणात असलेल्या तुळशी वृंदावना पाशी उभी राहून चांगला अर्धा झाला तेव्हा कूठे माझ्यावर कुंदाबाईच्या आईचा लक्ष गेला.त्या मला पाहून म्हनाल्या काय गं शोभा तू सकाळीच ईकडे काय करतेस?.मी घाबरतच त्यांना म्हनाली आई मला ना एक जुणी पाटी द्याना!मी फास्ट बोलली.एकदा पटकन बोलून संपवायच अस मला वाटत होत. त्या म्हणाल्या
""पाटी आसा काय नाय ती बघूची लागात आता माका येळ नाय तू मगे ये""
मनातल्या मनात मला खूप आनंद झाला पाटी ची चिंता सुटली ,परंतु त्या आहे म्हणाल्या हेच माझ्यासाठी खूप होत.पुढे त्यांच्या जवळून पाटी मिळेपर्यंत मी दहा वेळा तरी त्या घरच्या चकरा मारल्या ,तेव्हा कुठे माझ्या हाती पाटी लागली . पाटी हीती येताच मी धूम ठोकली, ती थेट माझ्या घरी येऊन थांबले, कदाचित आईचं मत बदली होऊन पाटी मागून घेतली तर? अशी मला अनाठायी भीती वाटत होती .पाटी घेऊन प्रथम घरात आली एका जागेवर धापा टाकत बसले .पाटीला उलट सुलट करूण पाहीले प्रेमाने जसी आई मुलांना जवळ घेवून त्याच्या वर मायेने हात फीरवते,तशी मी मायेन पाटीवर हात फीरवला, व पाटी घट्ट छातीशी बराच वेळ धरून राहीली. हा माझा आंनद काही वेगळाच होता.शिवाय घरातल्या गरीबीची जाणीव काही वेळ तरी विसरायला लावनारा होता. काही वेळाने मी पाटी स्वच्छ धुऊन घेतली .एवढे दिवस ती अडगळीत असल्याकारणाने कशीतरी दिसत हेती. धुतल्यावर ती नवीन करकरीत वाटायला लागली एका लहानशा कपड्याने प्रथम मी पार्टी पुसून घेतली. पण आता याच्यावर लीहिण्यासाठी खडू हवा तो माझ्याकडे नव्हता. मग पुन्हा त्याच आईच्या घरी गेली .यावेळी मला कुंदा बाईंचा सामना करावा लागला त्या मला पाहताच भूवया वर करून म्हणाल्या
"" काय ग! दारातच ताटकळत का ?उभी आहेस ?काय काम आहे का? काही काम असेल तर सांग?
मी घाबरत घाबरत म्हणाली.
""बाई मला लहानसं खडू द्या ना !बाईंनी काही न बोलता लहानसा खडूचा तुकडा माझ्या अंगावर भिरकावला ,मी खडूचा तुकडा घेऊन घरी आले. पाटी मांडीवर घेतली, आणि मला जमतील तश्या आडव्या-उभ्या रेघा मारत सुटली .याचं कारण मला काही लिहायला येत नव्हतं .म्हणून पाठीवर फक्त रेघा मारण्या शिवाय काही काडू शकत नव्हती. मी वेड्यासारखी किती वेळा तरी पाठीवर रेषा मारत होती. पुसत होती , शेवटी माझे हात थकले. तेव्हा कुठे मी पाटीवर आखण बंद केल. आता माझ्याजवळ खडू आणि पाटी अशा दोन्ही वस्तू होत्या, खरं सांगते या दोन्ही वस्तू माझ्या हातात होत्या म्हणून जगातली सर्वात श्रीमंत मीच असेन ,असे माझ्या चेहऱ्यावरचे भाव होते, आत्ता फक्त आयेला सांगायचं होतं. मी उद्यापासून शाळेत जाणार . पण हे सांगायला आये घरात नव्हती. ती बाहेर मोलमजुरीसाठी गेली होती. त्यामुळे तिच्या येण्याकडे माझे लक्ष लागून राहिले. आणि माझी प्रतिक्षा संपली ,आये घरी आली. ती आल्या आल्या मी तिला म्हटलं
""आये, माझ्याजवळ पाटी आणि खडू आहे , मी उद्यापासून शाळेत जाणार. ""
आयेने ही माझी इच्छा जाणून मानेनेच होकार दिला आणी मी जिंकलं होतं माझ्या आयेला, माझ्या जीवनातली कधीही न विसरायला लावणारी ही मोठी माझी जीत होती.....
कधी कधी वाटत..
बालपण ते छान असे
भातूकलीच नुसत ध्यान असे...
रमयला ते सोबती असती..
रूसायलाही मन मोकळ असे
गट्टी बट्टीत जिवन फुलत असे ..
रातीला मातेस बिलगत असे...
रवि येता भुईवरी...
आठवे पहीली सख्यांची यारी...
शाळेत जावे ते सखीना बिलगवया...
घरी यावे ते माते हस्ते घास घ्यावया...
हसरे जग हसरी माया...
कपट ना छळ
भाबडे ते निर्मळ मन
जसे सानुले फुलपाखरू भिरभिर करी मोकळ्या अंबरी
आयेची परवानगी मिळाल्यावर मी तडक राजाचा शोध घेतला .राजा माझा समवयाचा चुलत भाऊ समवयाचा असल्या कारणाने आमच बरच जमत असे. घर भर राजाला शोधत असताना मला राजाची आई ,तीला आम्ही सर्वच माई म्हणायचे ती दिसली मी तीला विचारल ..
"माई राजगो खय गेलो ""
इथे पण राजा सारखा माझा भाऊ,पण व्याकरण वापरण्यात कोकणातल्या मानसांचा हात कुणी धरू शकत नाही. मालवणी घरात मूल जन्माला आल की फक्त त्याच्या नामकरण विधीच्या दिवशीच त्या बाळाच् नाव नीट घेतल जात. नतंर ते मूल मोठ होत, जात तस त्याच नाव ही आपोआप लांब होत जाते .तस आम्ही राजाला राजगो म्हणू..
प्रथम माई मला काही बोलली नाही.पण मी मात्र राजाला हाका मारत मारत माईच्या झोपण्या खोलीत जायला लागली तशी माई मला ओरडत म्हणाली..
""गो सोबल्या तीया त्या व्हवरेत(खोलीत) कीत्याक जातय आमचा अंथरूण-पांघरूण अजून काडूक नाय तुझे ते पाय घेवन तीया नाचा नको .."
"नाय गे मीया तुझ्या व्हवरेत जाणय नाय माका राजगो खय तो सांग""
"""तो बघ पडयेत मरता रखयेत बसलो"""
मला माईच्या तोंडून राजाची एवढी माहेती पूरेशी होती.आमचा घर म्हणजे महाल नव्हता .की प्रत्येक दालनात राजाला शोधायला .आमच्या घरात पाच खोल्या ,एक वळय आताच्या सुधारक पद्दतीत (हाँल)म्हणतात .तोही आमच्या भाषेत कुणाला सरळ बोलायला जमत नाही.
याच कारण आमच्या गावी तेडूंलकर या सावकाराने सिमेंटचा घर बांधला होता. घर भरणीला गेलेली मानस बोलताना कानावर शब्द पडायचे.
"""मेल्यान घर बरा बांधल्यान""
""होय तर हाल (हाँल)बघलय कसलो मोठो ""
आम्ही मात्र मनात विचार करत असू ,घर बरा ट्रकासारखा बांधल्यानी,ट्रकासारख या साठी बोलत असू की ते घर लांब लचक बांधलेले पण पुढचा भाग ट्रकासारखा दिसे.म्हणून मग घरभरणीला हाल कुणाचे मोठे केल्यानी....पण इथे आमच्या घराचे पडवी वळय पाटला दार धरून 8खोल्यांचा घरात राजाला शोधायला आडकाठी नव्हती.माई बोलली ना पडवीत राजा आहे.मग मी धावत पडवीत गेली पण जाताना पाटी खडू न्यायला विसरली नाही.मी पडवीच्या दारावरूनच राजाला अवाज दिला..
"""राजग्या""
"""काय गो""
"""ह्या बघ माझ्या दोन्ही हातात काय आसा""
राजा माझ्या जवळ बघत म्हनाला..
""काय आसा गो"""
एक मात्र बर हा !आमचा मालवणी मानूस कधी समोरच्याच्या हातात वस्तू पाहूनही न पाहील्या सारख करत , तो आपल्यालाच विचारेल,
""काय रे ता""
तस राज्याला माझ्या हातात पाटी दिसत असूनही त्याने मलाच प्रश्र केला..
"""मेल्या तुका दिसना नाय डोळे फुटले की काय ?मेल्या ही पाटी बघ आणी ह्यो खडू $$ मीया आता शाळेत जातलय आयेन पण जा म्हणान सांगल्यान""
राजा पाटी पाहून राखेतून वर उठत माझ्या जवळ येत म्हणाला...बघूया माका दाकव...""
"""ऊ...हुँ...मीयी नाय आदी रखा लागली हाताक ती पूस"""
तसा क्षणाचा ही विलंब न लावता राजाने दोन्ही हात आपल्या हाप पँन्टीला पुसले...कोकणातली ही हात धुवायची जुनी पद्दत.स्त्री असेल तर ती पदराला हात पूसते.मुली असल्या तर फ्राँकला.पुरूष प्रधान मंडळी तर जे कीही घातले असेल त्याला...तस राजाने पँन्टीला हात पूसून पून्हा दोन्ही हात सरसावले पाटी घेण्या करता...परंतू त्याच्या हात काही साफ झाले नव्हते अर्धी राख हाताला तशीच होती..मी पून्हा त्याला म्हणाली...
""":बघ हाताक आजून रखा तसीच आसा ,काय पुसलय,बरे हात पूस मरे"""
"""मीया नाय तूका देवची तर दे नाय तर,नको देव समजला""
"माझ्या मनात नसतानाही मी पाटी त्याला दीली पण मला भीती वाटत होती.राजान् पाटी खाली पाडली आणि ती फुटली तर??म्हणून मी मनातच पहील आमचे देव सदकार ,आणि पाटेकार, याना गा-हाण घालून(देवा माझी पाटी राजग्या कडसून खालते पडाने नको.)मगच पाटी दिली...
राजाने पाटी उलट सूलट करून पाहीली.पण मला जेवढा आंनद पाटी हातात आल्यावर झाला, तसा त्याला मात्र झालेला दिसला नाही..मी लगेच त्याच्या हातून माझी पाटी घेतच म्हणाली..
""बघलय मा पाटी ,आता मीया शाळेत जातलय"""
"""गो तीया खोटा बोलतय""
'"""मीया कीत्याक खोटा बोलू""
""आवशीच्यान गो""
""तुझ्या आवशीच्यान मी शाळेत जातलय""
""गो माझ्या माईची शप्पथ कीत्याक घेतय...सांगा माईक"""
"""ये बाबा माईक सांगा नको पण माझ्या आयेच्यान मी शाळेत जातलय"""
आता मात्र राजा नरमलाआणि म्हनाला..
""आपून दोघाय शाळेत जावया""
""व्हय पन तुका पाटी ""
"""तुका कोणी दिल्यान""
""कुंदाबाईच्या आईन""
""चल आणखी आसा काय ती बघूया ""
"""नाय रे ही एकच होती ""
"""मगे माकाा पाटी कोण दिताला" "
"माका काय म्हाईत""
राजा बराच वेळ चेहरा पाडून बसला.मी ही काही बोलली नाही.काही वेळात राजा उठला ऊभा राहत म्हणाला..
"""चल"
""खय"""
"""दाजीकडे मीया दाजीक सांगतय माका पाटी आनून दी म्हनान...
दाजी राजाचे वडील माझे काका पण सर्व गाव त्याला दाजी म्हनून हाक मारत ..आम्ही दोघ दाजी बसायचा तीथे आलो.दाजी पोकळे बंधू कारखाण्यातून विड्या वळायला घरी आणत असे.आताही दाजी विड्या वळत बसला होता..राज्याने दाजीला हाक मारली..
"""दाजी"""
"""हं ..काय रे """
"""दाजी सोबल्या कडे पाटी आसा तसली माका पाटी हाडशीत???
"""तूका कित्याक पाटी व्हई"""
"""दाजी सोबला शाळेत जाताला ,मीया पन जातलय""
दाजीने माझ्या जवळ पाहीले.मला दाजीच्या कपाळी ब-याच आट्यांचे जाळे दिसले...ते तसेच ठेवत दाजी म्हनाला..
"""ह्या शाळेत जाता, केवा पासून""
"""तीया माका पाटी घेवन दिलय काय आमी दोघा जातोलो...
"""व्हय तुमका शाळेत रोज व्हरताला कोण???
आता मात्र मी बोलली..
"""आमका शाळा माहीत आसा आमी दोघा वागंडान जातोलो"""
"""बरा मीया तूका सोमवाराक पाटी देयन"""
राजा खुष झाला..आता आमचे डोळे लागले होते ते येणा-या सोमवार या दिवसाजवळ,कारण दाजीचा पगार दर सोमवारी व्हायचा......
क्रमश ....पूढे..