पायवाट...
पायवाट...
मी इयत्ता पाचवीत असताना आम्हाला धडा होता, पायवाट. त्यात विविध प्राण्यांची पायवाटीबद्दल स्पष्ट केले होते. धडा संपल्यानंतर आमच्या मराठीच्या सरांनी माणसाच्या पायवटीबद्दलही सांगितले, ते म्हणाले जसे आपण प्राण्यांच्या पायवाटीवरून ते कुठे गेलेत याचा पत्ता लावू शकतो, तसेच आपण माणसाच्या पायवटीवरून सुद्धा ते कुठे गेलेत हे समजू शकतो.
आता मी आमच्या गावावर शेती संभाळत आहे.आमची शेती इतर शेतीपासून फार दूर आहे, जिथे कोणीही नसते फक्त मी शेती पहायला येतो व आमचा जागल्या तिथे रहायचा.
एक दिवस मी शेतात गेलो असताना मला माझ्या शेतात पोलीस आलेले दिसले. ते म्हणाले की काल रात्री आम्ही चोरांचा पाठलाग करत असताना आम्ही चोरांना इथेच येतांना पाहिले. मी पोलिसांना म्हणालो साहेब इथे तर कोणीच येत नाही, जर कोणी इथे आलं असेल तर मी तुम्हाला त्याचा पत्ता लावून देतो.
पोलिस म्हणाले कसकाय ? मी सांगितले साहेब इथे कोणी येत नाही म्हणजे इथे जो काल रात्री आला असेल त्याच्या पायवाटा उमटल्या असतील. पोलीस म्हणाले हो बरोबर आहे, व आम्ही लगेच शेतात शिरलो व बघितले तर खरंच तेथे दोन पायवाटा उमटल्या होत्या. आम्ही त्या पायवाटांचा मागे मागे गेलो तर आम्हला माझ्या शेताच्या थोड्या अंतरावर एक झोपडी दिसली , ती झोपडी बघून मी ही आश्चर्य चकित झालो , कारण जिथे कोणी येत देखील नाही तेथें एक झोपडी...
आम्ही त्या झोपडीत गेलो तर पाहतो तर काय... पोलिसांना जे चोर हवे होते, तेच चोर गाढ झोपलेले, पोलिसांनी एका फटक्यात त्यांना उठवले ते चोर पोलिसांना बघताच घाबरले, पोलिसांनीही त्यांना ताब्यात घेतले व माझे आभार मानून निघाले.
आज मला मी शिकलेले कामात आले व मी पोलिसांची मदत करू शकलो...
