Abasaheb Mhaske

Others

1  

Abasaheb Mhaske

Others

नातं..

नातं..

2 mins
3.5K


     माणूस जन्मास येतो तेव्हापासून नातं त्याला चिकटलेलं असत. मरेपर्यंत सोबत करत . त्याची इच्छा असो या नसो नात्याचा गुंता त्याच्याभोवती असतोच . जसं जसं माणसाचं वय वाढत जात तस - तस नात्याचा गोतावळा वाढत जातो . काही नाती रक्ताची असतात तर काही अनामिक, निनांवीही असू शकतात . नाती टिकणं न टिकणं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असत . त्यांना न्याय देण्याचं तो आपल्यापरीनं प्रयत्न  करीत असतो . काही नाती टिकतात , वृध्दिंगत होतात . तर काही स्वार्थापायी लयास जातात , स्मृतिशेष उरतात .नावापुरतेच . त्यांच्या असण्या नसण्याने त्या माणसाच्यालेखी सर्वकाही संपलेलं असत 

      निनावी नातेही टिकून राहतात कारण त्यात भावनांचा ओलावा असतो . प्रेम , आपुलकी असते . जिव्हाळा असतो . ते कधीच कोट नसत . जिथे स्वार्थच नसतो ती नाती टिकतात जन्मभर . 

नातं असतं  जगण्याचा सहारा , आनंदसोहळा नातंच सावरत दुखी जीवांना नाट्यामुळेच माणूस घडतो . तसं बिघडतोही . नातं होत डोईजड तेव्हा नात्यामध्ये वणवा पेटतो आणि सारंकाही होत्याच नव्हतं होत क्षणार्धात नातं बनत क्लेशदायी विखुरत दिशादाही ते नातं बनत स्वछंदी , घडते त्यामुळे सर्व अनर्थ .. तेव्हा मात्र नात्याचा ओझं वाटू लागत . नातं होत नकोसं जीवघेणं .. स्वार्थामुळेच नात्याला ग्रहण लागत . 

    नातं रुजावं लागत खोलवर मना - मनात परस्परांच्या ... विश्वासामुळे नात्याची घट्ट वीण तसूभरही कमी होत नाही . प्रेम जिव्हाळा वाढत जातो तेव्हा रक्ताच्या नात्यापेक्षाही अशी नाती शेवटपर्यंत टिकतात. नात्यामुळे माणुसकीची बरकत होते . माणूस नात्याचा गुंता सोडविण्यात सफल होतो . खऱ्या अर्थाने स्वतःचा विकास घडवून इतरांनाही सोबत घेऊन चालतो . तेव्हा नातं व्यक्तिविकास , समाज तसेच राष्ट्रासही पूरक ठरतात नाती

नातं असतं मनस्वी मना सारखं नित नवीन सदोदित .. स्वार्थापायी कधीच न होऊ द्यावे त्यास कोत. नातं असावं दूरदर्शी आरशासारख वास्तवदर्शी निर्मळ , निस्वार्थ ,प्रवाही ..


Rate this content
Log in