Charumati Ramdas

Others

3  

Charumati Ramdas

Others

मूर्खपणाची गोष्ट

मूर्खपणाची गोष्ट

3 mins
1.5K


मूर्खपणाची गोष्ट


लेखक: मिखाईल ज़ोशेन्का भाषांतर : आ. चारुमति रामदास


आता पेत्या काही इतका लहानही नव्हता. तो चार वर्षाचा होता. पण मम्मी त्याला अगदी कुक्कुलं बाळंच समजायची. ती त्याला चमच्याने खाऊ घालायची, हात धरून फिरायला घेऊन जायची आणि सकाळी स्वतःच त्याला कपडे घालायची. तर, तिने पेत्याला कपडे घातले आणि त्याला पलंगाजवळ उभं केलं. पण पेत्या एकदम पडला. मम्मीला वाटलं, की तो खोडी करतोय, आणि तिने त्याला पुन्हां उभं केलं. पण तो पुन्हां पडला. मम्मीला खूप आश्चर्य झालं आणि तिने तिस-यांदा त्याला पलंगाजवळ उभं केलं. पण मुलगा पुन्हां पडला.


मम्मी खूप घाबरली आणि तिने पप्पांना ऑफिसमधे फोन केला.


तिने पप्पांना म्हटलं, “लवकर घरी या. आपल्या छोट्याला काहीतरी झालंय – त्याला आपल्या पायांवर उभं नाही होतायेत.”


पप्पा आले आणि म्हणाले, “हा निव्वळ मूर्खपणा आहे. आपला मुलगा चांगला चालतो आणि धावतो, आणि असं होऊंच नाही शकंत की तो पडेल.”

आणि त्यांने लगेच मुलाला कार्पेटवर उभं केलं. मुलाला आपल्या खेळण्यांकडे जायचंय, पण पुन्हां चौथ्यांदा पडतो.


पप्पा म्हणाले, “डॉक्टरला दाखवावं लागेल. कदाचित आपला मुलगा आजारी झालाय. कदाचित त्याने काल जास्त चॉकलेट्स खाल्ले असावेत.


डॉक्टरला बोलावण्यांत आलं.


डॉक्टर येतात, स्टेथोस्कोप लावून. डॉक्टर पेत्याला विचारतांत :

“हा काय प्रकार आहे! तू असा कां पडतोयस?”

पेत्या म्हणाला, “माहीत नाही कां, पण थोडा-थोडा पडतोय.”

डॉक्टर मम्मीला म्हणतात:

“मुलाचे कपडे काढा, मी आत्ता ह्याला तपासून घेतो.”


मम्मीने पेत्याचे कपडे काढले, आणि डॉक्टर स्टेथोस्कोपने त्याच्या हृदयाची धडधड ऐकूं लागले.

डॉक्टरने आपल्या ट्यूबने त्याची धडधड ऐकली आणि म्हणाले:

“मुलगा अगदी स्वस्थ्य आहे. कमालीची गोष्ट आहे, की तो असा पडतो कां आहे. ह्याला पुन्हां कपडे घालून टाका आणि उभा करा.”


मम्मीने लवकर-लवकर त्याला कपडे घातले आणि फरशीवर उभं केलं. आणि डॉक्टरने पट्कन चष्मा घातला, ज्याने चांगलं पाहता यावं की मुलगा कसा पडतोय.

पण जसंच मुलाला उभं केलं – तो लगेच पुन्हां पडला.


डॉक्टरला खूप आश्चर्य झालं आणि तो म्हणाला, “प्रोफेसरला बोलवां. कदाचित प्रोफेसरंच काही अंदाज़ लावूं शकतील की हा मुलगा सारखा कां पडतोय.”

पप्पा प्रोफेसरला फोन करायला गेले, आणि तेवढ्यांत पेत्याकडे त्याचा मित्र छोटू कोल्या आला.

कोल्याने पेत्याला बघितलं, तो हसूं लागला आणि म्हणाला:

“मला माहीत आहे, की तुमचा पेत्या घडीघडी कां पडतोय.”

डॉक्टर म्हणाले:

“बघा, कसां छोटासा वैज्ञानिक अवतरलांय – ह्याला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहीत आहे की मुलं कां पडतात.”

कोल्या म्हणाला:

“जरा बघा तर, पेत्याने कपडे कसे घातले आहेत. पैण्टचा एक पाय झुलतोय, आणि दुस-यांत त्याचे दोन्हीं पाय घुसले आहेत. म्हणूनंच तो पडतोय.”

आता तर सगळेच ‘आह!, आह!!’ आणि ‘ओह, ओह!!’ करूं लागले. पेत्या म्हणाला:

“हे मम्मीनी मला कपडे घातले आहे.”

डॉक्टर म्हणाले:

“प्रोफेसरला बोलवायची गरंज नाहीये. आता कळलंय की मुलगा कां घडी-घडी पडतोय.”


मम्मी म्हणाली, “सकाळी मी खूप घाईंत होते, त्याच्यासाठी पॉरिज करायचं होतं आणि मी खूप वैतागले होते, आणि म्हणूनंच मी त्याला चुकीने अश्याप्रकारे पैण्ट घालून दिली.”कोस्त्या म्हणाला, “मी नेहमी स्वतःचं कपडे घालतो, आणि माझ्या पायांबरोबर असला मूर्खपणा कधीच नाही होत. मोठे लोक नेहमी काही ना काही गडबंड करतंच असतात.”

पेत्या म्हणाला, “आतापासून मीपण स्वतःचं आपली ड्रेस घालंत जाईन.”


सगळे हसू लागले. आणि डॉक्टरपण हसू लागले. त्यांने सगळ्यांचा निरोप घेतला...आणि ते आपल्या कामावर चालले गेले. पप्पा ऑफिसला गेले. मम्मी किचनमधे चालली गेली. आणि खोलींत कोल्या आणि पेत्याच राहिले.

ते आपल्या खेळण्यांशी खेळू लागले.


दुस-या दिवशी पेत्याने स्वतःच पैण्ट घातली, आणि त्यानंतर त्याच्याबरोबर कधीच अशी मूर्खपणाची घटना नाही घडली.


**********



Rate this content
Log in