मुलाचे कोड्यातील उत्तर...
मुलाचे कोड्यातील उत्तर...
राजुचा बाप दारुड्या असल्याने त्याला नेहमी मांसाहार हवा असायचा. राजुची आई मोल मजुरी करून घर चालवत होती, त्यात राजुच्या बापाला रोज मांसाहार लागत असे. आज आईजवळ मांसाहारासाठी पैसे नव्हते.
आई चिंतेत पडली आज जर यांना मांसाहार मिळाला नाही तर मला तर ते चांगलेच बदडतील, काय करावे सुचत नव्हते. तेव्हढ्यात राजुच्या आईला समोर कुत्र्याचे पिल्लू दिसले. राजुच्या आईने त्या कुत्र्याच्या पिल्लुला मारले व त्याचाच मांसाहार केला.
राजुचा बाप नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला, त्याने राजुला विचारले, काय रे आज काय स्वयंपाक केला तुझ्या आईने? मांसाहार तर आहे ना? राजू कधी खोटे बोलत नसे. तो चिंतेत पडला काय सांगावे? मग त्याने एक कोड्यात उत्तर दिले, ते अश्या प्रकारे,
कहू त ना कव्हाय,
कहू त माय मार खाय,
ना कहू त बाप कुत्ता खाय.
एवढे बोलून तो तेथून निघून गेला....
