महाबली शहाजीराजे
महाबली शहाजीराजे


इतिहासातील पराक्रमी तारा, परंतु भरकटलेल्या सामाजिक जीवनात योग्य दिशा नसल्याने त्यांच्या पराक्रमाला वाव मिळाला नाही. निजामशाही आणि आदिलशाहीच्या वर्चस्वाखाली भारत देश भरकटलेला होता. मधूनच मुघलांचे आक्रमण असे. लोकांची द्विधावस्था झालेली. मालोजीराजे आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे नि शरीफजी असे दोन पुत्र जन्मले. शहाजीराजे पराक्रमी होते पण यादवीमुळे ते निजामाच्या दरबारी सरदार म्हणून कार्यरत होते. त्यांना आपल्या माणसांची दैन्यावस्था पाहावत नव्हती. आपसातील वैरभाव महाराष्ट्रातील वीरपुत्रांना एकत्र आणू शकत नव्हता.
निजामशाहीच्या खच्चीकरणानंतर शहाजीराजे जाऊन विजापूरच्या आदिलशहाला मिळाले. लखुजी जाधव यांच्या जिजाऊनामक कन्येशी त्यांचा विवाह झाला. जिजाऊदेखील पराक्रमी लखुजींच्या शूरकन्या होत्या. महाराष्ट्रातील दयनीय अवस्था त्यांना चिंतीत करत असे. त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी नामक पुत्राला जन्म दिला. शहाजीराजे बंगलोरमधील जहागिर नि आक्रमणे परतवण्यात व्यस्त असताना जिजाऊ पुण्यात राहत.
शहाजीराजांनी आपल्या पराक्रमाने आदिलशहा, निजामशहा दरबारातून अनेक किताब मिळवले होते. पण त्यांनीच अखेर शहाजीराजांचा विश्वासघात केला. मनातून शहाजीराजे दुःखी होते त्यामुळे दादोजी कोंडदेव या कारभाऱ्यांकडून शिवरायांना त्यांनी सर्व युद्ध कौशल्य शिकवले. जिजाऊंनी शिवरायांना दुरदृष्टीचे धडे दिले. रामायण, महाभारताच्या कथा सांगून त्यांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवले. शहाजीराजे पराक्रमी असून हे समाजातील यादवीने हतबल झाले होते. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे आजही गायिले जातात.