kishor zote

Others

5.0  

kishor zote

Others

माय मराठीशी माझे नाते

माय मराठीशी माझे नाते

2 mins
500


   माय या शब्दातच सारे काही सामावले आहे ना, मग मायचे व लेकराचे जे नाते तेच माय मराठीशी माझे नाते होय यात वेगळे ते काय ? माझे जसे माझ्या माय वर प्रेम तसेच माय मराठीवर देखील माझे जिवापाड प्रेम आहे.

  तसे घरात आजोबा कालकथीत भिकाजी दशरथ मगर ( गुरूजी ) [ आईचे वडील ] तुळजापूर ता. देऊळगांव राजा व मोठा मामा प्रा. सुभाष भिकाजी मगर ह. मु. मेहकर यांच्या कलागुणांचा बोलबाला होताच. त्यातच वाचन गोडी मग सहज लेखन सुरू केले आणि आठवीत असताना पहिली कविता ही निबंधात लेखन केली. माझा तो पेपर नंतर नोटीस बोर्डवर लावला गेला होता. तेंन्हा पासून लेखन सुरुवात झाली ती आजपर्यंत जेंव्हा सवड मिळेल तेंव्हा लिहीत गेलो. मराठीतून लेखन कला विकसीत होत गेली आणि या माय मराठीने बरीचशी प्रसिध्दी देखील मिळवून दिली.

    आई जशी लेकराला मोठा होताना बघते व असाच मोठा होत रहा म्हणून आशिर्वाद देते तसेच या माय मराठीने देखील लेखन संदर्भात आशिर्वाद दिला असेच म्हणावे लागेल. वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करत गेलो आणि प्रसिध्दी सोबतच बक्षीस देखील मिळत गेले होते. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम स्वरुपात ती पारितोषिके होती. विविध वर्तमानपत्र , साप्ताहीक, पाक्षिक. मासिक, त्रैमासक. अर्धवार्षीक ,वार्षीक, व्दैवार्षीक, अनियतकालिक अशा छपाईच्या प्रत्येक प्रकारात लेखन करत गेलो व साहित्य प्रकाशित होताना प्रसिद्धी देखील मिळत गेली.

    अगदी वाचक पत्र लेखन ते लघु कादंबरी पर्यंत लेखण प्रकार हाताळत गेलो. जसे आईने लेकराला हळुहळू मोठे करावे व स्वतःच्या पायावर उभे करावे तसेच या लेखन प्रकारात पाय मजबुत रोवण्यास या माय मराठीने खूप मोलाचे सहकार्य केले आहे. आधीचे व नवे प्रकार या सर्व प्रकारात महत्वाचे लेखन करण्यात यश लाभले ते या माय मराठी मुळेच. अगदी आपल्या या प्रतिलिपि पोर्टलवर सन २०१९ मधे अभंग या रचना प्रकारात नं. १ मिळाला तो देखील या माय मराठी मुळेच.

    माय जरी असली तरी प्रत्येक लेखन प्रकारानुसार ही मराठी भाषा त्या त्या प्रसंगानुरुप व साहित्य प्रकार व साहित्यातील नात्यानुसार भाषेने देखील ते नाते परिपूर्ण निभवण्याचा प्रयत्न केला आहे. बडबड गीतात ती लेक झाली तर प्रेम प्रकारात ती प्रियसी घडली. इतर देखील काव्यप्रकारात ती संवाद साधनारी व्यक्ती घडल्याने तो तो साहित्य प्रकार वाचकांसमोर ठेवल्याने त्या त्या लेखकाचे लेखन हे वाचन प्रिय घडत गेले आहे. एवढेच नव्हे तर भाव भावनांचा रंग देखील त्यांनीच उडवला. त्या रंगात सर्वांना रंगवून देखील माझी माय मराठी गेली आहे.

   शेवटी एकच वाटते की ही माय मराठी होती म्हणून आज इथ पर्यंतची ही वाटचाल करता आली बरं का ! नाही तर कोण हा किशोर झोटे ? असा देखील प्रश्न विचारला गेला असता.

   माझ्या वयानुरूप व लेखनारुप माझ्याशी समरस होवून अगदी प्रत्येक नाते मनोभावे निभावले ते माझ्या या माय मराठीनेच.


Rate this content
Log in