माझी शाळा
माझी शाळा
"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळॆभोवती तळॆ साचून सुट्टी मिळॆल काय.. " हे गाणे लहानपणी सर्वांनीच गायले असेल.. 😊
शाळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय.. बालपण देगा देवा! बालपणाचे सर्वात सोनेरी दिवस म्हणजे शाळा.. शाळॆच्या प्रत्येकाच्या आठवणी असतात.. काहींच्या गोड तर काहींच्या कडू.. असो माज्याही तशाच आहेत.. माज्या तशा दोन शाळा झाल्या त्यामूळॆ भरपूर आठवणी आहेत पण लिहायला शब्द कमी पडतात. शाळॆचा तो पहिला दिवस, आईचे शाळॆत सोडायला येणे.. केसांची दोन पोनी त्यावर हेअर बॅंड, हिरवा गणवेश, छोटीशी बॅग, गळ्यात वाॅटर बोटल, रूमाल, डबा व एक कोरी वही.. सर्व आठवणी ताज्या होतात. 😍
मी बाकी मुलांसारखी शाळॆच्या पहिल्या दिवशी रडले नव्हते पण लाजाळू होते.. आईचे बोट सोडून जावस वाटत नव्हत... सर्वच नवीन होत.. पण हळू हळू आपलेसे झाले. शाळॆत प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही.. माज्या आईची कृपा असे म्हटले तरी वावग ठरणार नाही..ती माझा अभ्यास घेत असे. मी मस्तीखोर मूळीच नव्हते त्यामूळॆ आईच्या हातचा मार फार कमी मिळाला😂
मला लहानपणापासून नृत्याची देखिल आवड.. पहिलीत असताना "ढोलकीच्या तालावर" ही लावणी केलेली.. शिक्षकांनी भरभरुन कौतुक केले होते..व आजोबांनी बक्षिस म्हणून पैसे दिले होते.. माझं पहिल बक्षिस! घर shift झाल्यामूळॆ दुसरीला गेल्यावर नवीन शाळा..शाळा तशी मोठी नव्हती. तळमजल्यावर होती.. नवीन मित्रमैत्रिणी, नवीन शिक्षक पण तिकडेही रुळायला जास्त वेळ नाही गेला.
"छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.."आवडते बालगीत.. वर्गात शिक्षक नसल्यावर मित्रमैत्रिणी सोबत चोर चिटी, नाव गाव फळ फूल खेळायचो. एकदा सर्वांसोबत छडीचा मार पण खावा लागला होता.😅
पण एक कडू आठवण म्हणजे मी तिसरीला मोनिटर झाले नाही.. रडू आले.. वाईट वाटले पण आता ते आठवलं की हसू येत. 😆 अभ्यासू असल्यामूळॆ शिक्षकांचीसुद्धा लाडकी झाले.. मूलांचा होमर्वक चेक करणे असो वा फळ्यावर शिक्षकांनी सांगितलेले लिहणे सर्व जबाबदारी माज्यावर..
शाळॆत सर्व कार्यक्रम व्हायचे.. त्यात पण मनापासून भाग घ्यायचे..स्वातंत्र्यदिनी भाषण देने असो अथवा प्रजासत्ताकदिनी समूह गीत.. शिक्षकांनी प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केले..
स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी परेड व्हायची. हातात तिरंगा घेऊन संपूर्ण शहरात मिरवणूक काढत "भारत माता की जय" म्हणताना मन गर्वाने भरून यायचे..मग घरी निघताना शिक्षक सर्वांना बिस्कीट,चाॅकलेट वैगरे दयायचे..आताही ते क्षण हवेहवेसे वाटतात. स्पोर्ट्समध्ये सुद्धा भाग घ्यायचे व दुसरा क्रमांक पटकवलेला.. पण त्यात एवढा लगाव नव्हता..वेगवेगळ्या स्पर्धाही व्हायच्या व त्याच्याजोडीला विज्ञानप्रदर्षण. माझे आवडीचे विषय म्हणजे इंग्रजी व विज्ञान होते..
Annual day ला मित्रमैत्रिणी सोबत नृत्य करणे व लंच ब्रेक मध्ये त्याची practice.. शाळा सुटल्यावर कैरी, चिंचा, बोरे, बर्फाचा रंगीत गोळा खाणे सर्वच गोड आठवणी.. होळीच्या एक दिवस आधी शाळा सुटल्यावर मित्रमैत्रिणींना पाण्याने भिजवणे असो अथवा गणपती व दिवाळीला सर्वांच्या घरी जाऊन उकडीचे मोदक व चमचमीत फराळ खाणे असो..मित्रांना वाढदिवसाला स्वताच्या हाताने सजवून तयार केलेले ग्रीटिंग कार्ड देने किंवा बाकी मित्रांसोबत पैसे जमवून दिलेली भेट...आता या गोष्टी तशा खूप कमी निर्दशणास येतात☹️
सातवीला गेल्यावर मग वर्गात friendship day साजरा करायचो त्याची एक वेगळीच मजा होती व नंतर शिक्षकांच्या धाकाने रीबीन काढून ठेवायचो..घरी आल्यावर मग किती रिबीन भेटले ते मोजत बसायचो😂 वर्षाअखेरीस सहलीची वाट आर्वजून बघायचो..आमची सहल जास्त करून पाण्याच्या ठिकानी जायची. मग जाताना बसमधली अंताक्षरीची जुगलबंदी व घरून आणलेला खाऊ.. खूप धमाल यायची.. 😍 पीटीच्या तासाची आतुरतेने वाट बघायचो व शिक्षक ग्राऊंड वर खेळायला न्यायचे.. मग काय हवे ते खेळ खेळा...कबड्डी खोखो यांचे सामनेही व्हायचे. आताच्या नवीन पिढीच्या हातात मोबाईल फोन आल्याने त्यांना मैदानी खेळाची मजा अनुभवता येत नाही.
नववीला असताना लेझीम नृत्य व लोकगीत घेतलेले.. सर्वांनी कौतुक केले. शेवटी दहावीचे वर्ष..अभ्यास एके अभ्यास..farewell दिवशी रेड कलरची साडी नेसलेली.. सर्वच मुली छान दिसत होत्या.. शिक्षक व शाळॆविषयी बोलताना अश्रू येत होते.. असं वाटत होत कायतरी सुटतय. आमचं एक कुटुंब झाल होत..खूप वाईट वाटत होत..पण आजही शिक्षक किंवा मित्रमैत्रिणी भेटले की जुन्या आठवणीत रमावसं वाटत, अस वाटत परत ते दिवस यावे.
"शेवटी गेले ते दिवस.. राहिल्या त्या आठवणी"❤️
