Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

माझा विमान प्रवास

माझा विमान प्रवास

3 mins
1.7K


विमानाने प्रवास करत होते आयुष्यात प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव तोही भारताच्या उत्तरेकडील काश्मीर या थंड प्रदेशात जाण्यासाठी. खूपच रोमांचक अनुभव. लहानपणी वाचलेल्या परिकथेतील ढगांच्या कापसा वरून गेल्याचा आभास की सत्य माझा माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तीन तासांचा संलग्न प्रवास परंतु दोन वेळा विमान खाली उतरून पुन्हा दोन वेळा उड्डान. किती आनंद होता! शब्दातून साकारताच येत नाही.

पहाटे सहाला निघालेले विमान सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी श्रीनगर विमानतळावर स्थिर झाले आणि हुडहूडी भरणाऱ्या थंडीने दातावर दात आपटू लागले. स्वेटर, हातमोजे यांची शोधाशोध. दुसरा गट रात्री येणार होता. जेवण घेऊन थोडा आराम करून फ्लोटिंग मार्केट पाहण्यासाठी शिकाऱ्यातुन निघालो. माझ्याबरोबर मुंबईतील तीन चार जण उत्सुक अवस्थेत. कालपर्यंत भारताचे नंदनवन म्हणून पुस्तकातून, चित्रातून पाहिलेले काश्मीर प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून ओढयुक्त हुरहूर लागून राहिली होती. थोडेसे मार्केटिंग करून रात्री परत येईपर्यंत बाकी मंडळी आम्हाला सामील झाली. थंडीतील रोमांचक थंडी, टीम लीडरची उठायचे, निघायचे वेळापत्रक ठरलेले. रोज नवीन विश्व पाहायला जाताना गोड गुलाबी गुदगुल्या करणारी थंडी तनामनाला सुखावून जात होती. मला सर्वात आवडलेले ठिकाण म्हणजे पहेलगाम.वय विसरुन बर्फात खेळणारी आम्ही थोराड मुले एकमेकांवर बर्फ टाकत होतो. पुन्हा चार दिवस नंदनवन पाहून जय मातादी करत जाणारी तीन हजार पाचशे फूट अंतर नव्या दमाने दर्शनासाठी रात्र असूनही दिवस असल्याप्रमाणे ताजे टवटवीत आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत डोंगर चढलो. दिवस उगवायच्या आत हॉटेलवर पोहोचलो. उंच उंच हिमगिरी पर्वत उतारावर हिरवीगार सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये, त्यावर साचलेला बर्फ आणि चांदी प्रमाणे चमकणारे वृक्षांचे शेंडे ,पर्वताच्या कुशीत उगम पावून आपला खळाळता अवखळपणा घेऊन धावणार्‍या उत्साही नद्या, विविधरंगी फुलांनी सजलेल्या ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध असणाऱ्या बागा, विस्तीर्ण सरोवरात उभारलेल्या आलिशान हाऊसबोट, संथ जळावर हलके तरंग उमटवत विहरणारे रंगीबेरंगी शिकारे आणि पर्यटकांना साद घालून बोलवणारे काश्मिरी यजमान, निराळ्या पुरातन वास्तू आणि स्थानिक अशीच व्याख्या काश्मीरची करता येते. नैसर्गिक वारसा लाभलेल्या अनेक आणि संपन्न असणाऱ्या आपल्या भारत देशाचा मुकूटमणी म्हणजेच काश्मीरची राजधानी श्रीनगर असलेला हा प्रदेश.

ईश्वराने मुक्तहस्ताने उधळण केलेला भूतलावरील स्वर्ग. दल,नगीन अशी विशाल सरोवरे पाहून थक्क होऊन जाणारे पर्यटक पुन्हा येण्याची ग्वाही देतात. नैसर्गिक सौंदर्याचा वैविध्यपूर्ण वारसा लाभलेल्या अनेक वेशांनी आणि भाषांनी संपन्न असणाऱ्या आपल्या भारत देशाचा मुकूटमणी म्हणजेच काश्मीर. राजधानी श्रीनगर असलेला हा प्रदेश ईश्वराने मुक्तहस्ताने उधळण केलेला संपन्न असा भूतलावरील स्वर्ग होय. दल लेकच्या तीरावरील उंच टेकडीवर वसलेले शिवालय मंदिर प्राचीन आहे. जगद्गुरु श्री आदि शंकराचार्यांनी या मंदिरात वास्तव्य केले होते म्हणून या टेकडीला शंकराचार्य हिल म्हणून ओळखतात. दल लेकमधील 'चार चिनार 'हे बेट चित्रपटात पाहूनही निसर्गरम्य असल्याचे जाणवते. नितांत सुंदर असे गुलबर्गा उन्हाळ्यात गवतांच्या कुरणांनी, हिवाळ्यात बर्फाची मऊ शाल पांघरुण पहूडलेले असते.

'गोंडाला' केबल कार मधून हवाई सफर करताना हिमाच्छादित जमीन मनाला मोहवते. या ठिकाणी दुर्मिळ असे याच रस्त्यावर 'संगम 'या गावात क्रिकेटच्या बनवल्या जातात. अमर यात्रेचा आरंभबिंदू असणारे 'पहलगाम'.गावाचा इतिहास विचारत 'लीडर' नदीच्या खोऱ्याचे अपूर्व दर्शन घडते. काश्‍मीर खोऱ्यात हिंदू-मुस्लीम दोन्ही समाज बरोबरीने नांदताना दिसतात. येथील वैष्णोदेवी बरोबर महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा देवी माँ तिन्ही रूपांत पाहायला मिळतात. मस्जिद व मंदिर शेजारी असणारे. भारताची सीमा असणारी ही नगरी पाहताना सौंदर्याचा परिपूर्ण आविष्कार प्राप्त होतो. घरी आल्यावर पाहिलेल्या निसर्गाचे वर्णन करताना मध्यरात्र कधी होते हेच समजत नाही


Rate this content
Log in