माझा आवडता रंग
माझा आवडता रंग
मला माणूसकीचा, नात्यांचा रंग आवडतो.पण हल्ली या रंगांची मुळीच गॅरंटी राहिली नाही.जिथे विश्वासाने खांदा टेकावा तिथे अविश्वासाचे काटेच बोचू लागतात मग अविश्वासाचा रंग गहिरा बनत आपल्या सभोवार दिसायला लागतो.ज्यांच्यावर माणूसकी दाखवून प्रेमाचा वर्षाव केला होता तिथून ईर्ष्यारूपी द्वेष बाहेर पडताना दिसतो नि मनाला वाटते,अरे हेच का ते !!! ज्यांच्या भल्यासाठी,मदतीसाठी आपण आपला बळकट खांदा पुढे केला होता.ज्यांना आपली गरज आहे असे समजून गरज भागवली होती.आपण केले होते सत्कर्म मग बदल्यात का मिळत आहेत काटे??? की गरज सरो वैद्य मरो ही वृत्ती जागृत झालीय.
&
nbsp; आपण मदत करताना नव्हते केले दूजेपण? मग का आता पहावे आप्पलपोटेपण?? खरंच सप्तरंगी इंद्रधनुच्या कमानीत हा मानवीहीनतेचा रंग का घुसावा बरे!!! माझं माझं म्हणत पोटात खंजीर खुपसला हे खरे.
नकोत आता असली नाती जी उच्छृंखल असतात नि ऐनवेळी दगा देतात.खरे सांगु आता मला काळा रंगच आवडू लागलाय कारण तो कोणातही मिसळला तरी आपला मूळ स्वभाव सोडत नाही.उलट गहिरा बनत जातो नि यांच्याकडून फारशा अपेक्षाही कोणी करत नाही.हा नाही प्रेमाचा रंग ना खुशीचा.याची आपली स्वत:चीच ओळख आहे.रात्रीच्या अंधारातही तो मस्त सामावून जातो.मग का आवडू नये मला काळा रंग??