Abhijeet Tekade

Others

5.0  

Abhijeet Tekade

Others

कु -रूप -भाग १

कु -रूप -भाग १

8 mins
1.0K


शाळेच्या आवारात असलेल्या ऑडिटोरियम मधून ठेक्या मध्ये “एक दोन एक ... एक दोन एक” असा आवाज येत होता. 

 शाळेच्या वार्षिक सम्मेलनानिमित्य नृत्याचा सराव सुरु होता. हा समूह ५व्या वर्गाच्या मुलींचा होता. 

संपदा मॅडम नृत्य दिग्दर्शित करीत होत्या आणि सहायक शिक्षिका म्हणून आशा मॅडम त्यांना मदत करीत होती.  

हा इंडियन क्लासिकल डान्स फॉर्म होता आणि आज ग्रुपची रंगीन तालीम असल्यामुळे मुली स्टेजवरती कॉस्ट्यूममध्ये आणि पायाला घुंगरू घालून प्रॅक्टिस करीत होत्या. 

शाळेच्या सुट्टीनंतर गेल्या २ महिन्यापासून मुली तासंन तास प्रक्टिस करीत होत्या आणि आता ३ दिवसानंतर वार्षिक संमेलन होणार होते. 

 संपदा मॅडम ठेक्यामध्ये “Thaiya Thai ,Thaiya Thaihe , Thaihe Thai Thai Tham,Thaiyathaihe,Thaiya Thaithaitham,Thaithaitham Thaithaitham ” 

 संपदा मॅडम टाळ्या वाजवीत “व्हेरी गुड! आता पुन्हा एकदा” 

थोडं थांबत ग्रुपकडे बघतात नंतर आशाला (सहायक शिक्षिका) स्वतःकडे बोलावीत . 

आशा जवळ आल्यावर (हळूच) “आशा समोरच्या रांगेमधील आणि मागच्या रांगेमधल्या काही मुलींना आपल्याला शफल करावं लागेल” आणि आशाला समजवून सांगतात. 


आशा हळू आवाजात कोण्या एका मुलीबद्दल बोलत  

“पण मॅडम लावन्या सर्वांमध्ये फार छान नृत्त्य करते. तर तिला मागील रोमध्ये परफॉर्म करायला का म्हणून ..”

संपदामॅडम आशाला सांगत “लावण्याच्या जागी आपण सौंदर्याला फ्रंट रो मध्ये घेऊ ती पण छान करतेय. आणि लावण्याला आपण दुसऱ्या रो मध्ये ठेवणारच”

 आशा “पण.. ”

 संपदा मॅडम जोर देत “आशा समजून घे! मला प्रेसेंटेशन मध्ये काही कमतरता नकोय” 


आशा मुलींच्या ग्रुपकडे जाते आणि संपदा मॅडमनी सांगितल्या प्रमाणे ग्रुप मधील काही मुलींना उभी करीते .

लावन्याचा हात पकडून समोरच्या रांगेमधून मागील रांगेमध्ये शिफ्ट करित असताना आशाला लावण्याच्या चिमुकल्या डोळ्यांमध्ये एक निरागसपणा आणि अजान प्रश्नार्थक भाव स्पष्टच दिसत होता . 

आशा भारी मनाने लावण्याची नजर चुकवीत तिला मागील रांगेमध्ये उभी करते. 

आशाला नृत्याची जाण होती आणि तिला हे चांगले ठाऊक होते की लावण्या सर्वमुलींमध्ये छान डान्स करतेय. पण इथे आशाचा नाईलाज होता.

चिमुकली लावाण्या तर हे डावपेच कळण्याइतकी समझदार नव्हती त्यामुळे तिचा विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता किंवा त्यावर आपत्ति सुद्धा नव्हती. 

तिच्या नाजूक वयामध्ये तिची समज म्हणजे मोठी लोक नेहमी बरोबर असतात व शिक्षक तर पालकांपेक्षाही सुज्ञ असतात त्यामुळे त्यांना नकळत ते मानाचे स्थान दिल्या जाते.

 पण तिला हे नव्हते काळत कि शिक्षकसुद्धा मनुष्य प्रजातीच व त्यांच्याकडून पण चुका होवू शकतात. 


आशा मॅडम लावण्याच्या जागी सौंदर्याला समोरच्या रांगेत उभी करते करते, हे करीत असताना आशाचे एकदा लक्ष लावण्याकडे जाते. ह्यावेळी लावण्याच्या चेहऱयावर चिंता आणि निराशा एकत्र दिसत होती.  

सौंदर्या मात्र फार आनंदाने समोरच्या रांगेत उभी झाली कारण त्यात तिला तिची जास्त योग्यता असेल असेच वाटले. 

लावण्याचे सौंदर्याला प्रथम रांगेत उभे केल्यावर दुखी होण्याचे कारण होते. कारण दोघींची तुलना ही लहानपणापासूनच असायची. लावाण्या आणि सौंदर्या ह्या जुळ्या बहिणी.


जुळ्या म्हटलं कि हुबेहूब दिसणं, वागणं.

 पण दुर्देवाने ह्यांदोघींमध्ये अस नव्हते.

 

स्वभावाने सौंदर्या चंचल होती तर लावण्या हि थोडी लाजरी होती. 

सौंदर्या दिसायला फार लोभस होती. पांढऱ्या हळदीसारखा रंग, पाणेदार बदामी डोळे, स्टरबेरी सारखे ओठं, तिचे गोड हास्य आणि त्यात तीच्या गालावरील खळी सर्वना मोहित करून टाके. ती सारखी हसत आणि आनंदी राहायची. तिच्या बोलण्यामध्ये फार मधुरता आणि आपुलकी असायची व याच कारणांनी ती शाळेमध्ये सर्व टीचर्सची लाडकी होती.

लावण्या ही थोडी कमी बोलायची. लावण्या दिसण्यामध्ये रंगाने तर तिच्या जुळ्या बहिणी प्रमाणेचे होती मात्र इतर काही साम्य दोघीमध्ये राहिले नव्हते. तिच्या चेहऱ्यावरती कोणतेही हावभाव कधी स्पष्ट्पणे उमटत नसायचे. जणू चेहऱ्यावरती प्लॅटिस्टिक कोट केलाय आणि चेहरा निर्जीव अवस्तेथ आहे . तिच्या ओठाच्या नसा मृत झाल्यांमुळे तिचे हास्य कधीच उमटत नसे. जेव्हा ती हसायची तेव्हा तिच्या कंठातुन येणाऱ्या आवाजावरून कळे. दुःखी असली की तिच्या डोळ्यांतला ओलवा त्याची ग्वाही देत असे. 

तिचे पाणेदार डोळे फार बोलके होते. जे भाव तिचा चेहरा वक्त करू शकत नव्हते ते तीचे डोळे चांगले व्यक्त करी. त्यादिवशी आशाला तिच्या डोळ्यांमध्ये तिच्या मनातील भाव दिसले. 

लावण्याला तिची बहीण सौंदर्या बद्दल ईर्षा नव्हती. तिला फक्त त्यावेळी तिला मागे जावे लागले ही निराशा होती आणि स्वतःचे नेमके काय चुकत असेल याबद्दल ती विचार करी. अगदी प्रीस्कूल पासून ते आता पाचवी पर्यंत या दोघी सोबतच एकाच शाळेमध्ये ,एकाच वर्गामध्ये होत्या आणि तेव्हा पासूनच सौंदर्ऱ्या अगदी सहजपणे सर्वांचे लक्ष वेधून टाकायची व तेच लावण्याला सहजा सहजी नाही मिळायचे. 

दोघी बहिणी तश्या ऑलराऊंडर होत्या. अभ्यासामध्ये लावण्या मात्र सौंदर्यापेक्षा हुशार होती आणि तिला जास्त मार्क्स मिळायचे.

 पण वर्षभर जे अटेन्शन सौंदर्याला मिळायचे ते लावण्याला नाही मिळाले. मानवीमनाला अगदी लहानपाणापासूनच स्वतःकडे दुसऱ्यांचे लक्षवेधण्याची इच्छा असते. पण लावण्याचे फर्स्ट इम्प्रेशन सहज कधी पडलेच नाही.  यामध्ये खरंच काय तिचा दोष होता. म्हणायला तर ती हुशार, आज्ञाधारक, स्वभावाने हळवी, शांत, शाळेत आणि बाहेरपण मोठ्यांचा आदर करणारी होती. मग काय असे होते ज्यामुळे ती अपूर्ण होती. का तिला तिची पारख करणारी योग्य लोक समाजात कधी भेटलीच नव्हती? 

लावण्या हुशार होतीच पण मेहनती पण फार होती. जे अटेन्शन तिला सहज मिळत नसे, ते तिला जेव्हा शाळेकरिता कॉम्पेटीशन जिंकायची तेव्हा किंवा परीक्षेच्या निकाला नंतर मिळायचे. तेव्हा सर्वांना तिचे कौतुक करणे भाग पडायचे. काय मिळतंय काय सुटतंय यावर विचार करण्यासाठी तिचे वय फार कोवळे होते. आतापर्यंत ज्या वेळी जे मिळतंय त्यात्या वेळी तसतसे भाव तिच्या हृदयात उमटायचे. कधी अती हर्ष तर कधी निराशा. त्या निरागस बालमनामध्ये मिळालेले दुःख काही काळच टिकायचे नंतर पुनः पूर्ववत छोट्या छोट्या गोष्टींमधून निखळ आनंद परत येई. 

अजाण बालपण जर हि निराशा आणि अपमान विसरून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये निखळ आनंदात रामयला लावत असेल तर खरंच ते किती समझदार वय असावे. 

 लहान असताना स्वभोवताली काय सुरु आहे आणि कोण आपल्याला काय म्हणतंय, व्यक्तीचे मूल्यांकन कसे केल्या जाते याबद्दल कधी विचार येत नाही. 

पण काय ती समझदार वयात असा अपमान, हीन भावना सहजपणे विसरून आनंदी राहू शकेल ? का ती छाप हृद्यावरती कायमस्वरूपी राहील?

आता लावण्या दहा वर्ष्याची होती हळू हळू ती आता स्वतःबद्दल आणि स्वभोवतालच्या व्यक्तीबद्दल विचार करायला लागली होती. नेमके ते आकलन तिला नाही जमायचे अर्थात आता तरीही हे वय तेव्हडे परिपक्व नव्हते, पण तीचा शोध सुरु झाला होता.

आज ज्याप्रकारे भेदभाव केल्या गेला त्यात तिला त्यात स्वतःच काही चूक केल्याचे वाटून ती दुखी होती. लावण्याला संगीत आणि नृत्याची फार आवड होती आणि तिच्यासाठी हि मोठी गोष्ट होती. 

प्रॅक्टिसनंतर सायंकाळी ४.३० ला दोघी घरी पोहचल्या. त्यांची आई रश्मी ने दार उघडले. सौंदर्या मस्तीमध्ये धावत आत शिरत तिच्या रूममध्ये पळाली. तर लावण्यानी जडपावलांनी घरात प्रवेश केला. रश्मीला हे थोडे खटकले पण कदाचित थकल्यामुळे असेल असेच तिला वाटले. 

आई किचनकड़े कामाला निघुन गेली. थोडा वेळनी लावण्या आणि सौंदर्या रूममध्येच आहेत है लक्षात आल्यावर आईने ओरडून हाक दिली “सौंदर्या ,लावण्या चला चेंज करा आणि फ्रेश व्हा “. 

रश्मी किचन मध्ये मुलींकरिता काही खायला बनवीत होती. सौंदऱ्या धावत आई कडे आली व आईच्या कमरेला बिलगली.

आणि ती हसत म्हणाली “आई आज मला काही सांगायचे आहे, मला डान्समध्ये ..... “

रश्मी सौंदर्याला कमरेतून सोडवत “ते सगळे नंतर आधी फ्रेश व्हा. मी खायला करतेय. आणि लावण्या काय करतेय?”

सौंदर्या मस्तीत उड्यामारीत सांगत “ती रूम मध्ये झोपलीय “

“झोपली ! उठव तिला आणि फ्रेश व्हा” सौंदऱ्या अर्धवट एकूण फ्रेश व्हायला बाथरूमकडे निघून गेली.

रश्मी पुन्हा जोरात आवाज देत “लावण्या ऐकलं का चला फ्रेश व्हा हि झोपायची वेळ आहे का?”

लावण्या रूममधून किचन कडे येत थोड्या नाराजीच्या स्वरात “आई मला नाही खायचे”

आई मागे वळून एका हाताने तिला जवळ घेत “का ग बेटा ?” अस विचारातच लावण्या रडायला लागली. आता रश्मी खाली बसत तिला जवळ घेत विचारायला लागली “ काय झाले तुला कोणी काही बोलले का?”

रडतच “आई मला टीचरणी डान्स साठी मागली रो मध्ये शिफ्ट केले”

तिला सांभाळत प्रेमाणे “त्यात काय झाले रडायला! डान्समध्ये तर आहेस ना ! इट्स ओके बेटा”

आई पुन्हा उठून बनवलेले पोहे दोघींकरिता प्लेट मध्ये वाढले.

तेवढ्यात सौंदऱ्या पण आनंदाने किचनकडे येत “आई आई ...”

तिला थांबवत आणि प्लेट हातात देत “चला गोष्टी नंतर बाबा आल्यावरती. आधी खाऊन घ्या”

लावण्या आईनी समजावून सांगितल्या मुळे थोडी समजली होती आणि खाऊन झाल्यावर दोघी आपल्या रूममध्ये खेळायला निघून गेल्या. 

संध्याकाळी सात ला राजेश (बाबा) घरी आले. आईने दार उघडले राजेशनी हातामधील पिशवी रश्मीकडे देत समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावरती रेटून बसला. तो बसतो न बसतो दोघी लावण्या आणि सौंदर्य धावत येत बाबाच्या कुशीत शिरल्या. बाबांनीही त्यांना हसत प्रेमाने जवळ घेतले.

सौंदर्या आनंदात विचारीत “ बाबा काय आणले माझ्यासाठी”

“तुम्हाला आवडते ते ओळखा पाहू”

सौंदर्या ओरडत “अम् .. चॉकलेट”

“नाही!”

लावण्या थोडं लाडात आणि स्वतःकडे लक्ष वेधण्याकरिता थोड हिरमुसून ”माझ्यासाठी नाही!”

बाबानी तिला मिठी मारीत ”असं कस होणार रे माझ्या सोन्या तुम्ही दोघी तर माझ्या लाडक्या पऱ्या आहात”

बाबा त्याना संगीत “जा दोघी आईकडे दिली जिलेबी” दोघी बाबांच्या मांडीमधून उडी मारीत किचनकडे पाळल्या. आई ने दोघीना प्लेटमध्ये जिलेबी दिली. तिने राजेशकरिता प्लेट काढून हॉल मध्ये आणून दिली. आणि चहा ठेवायला पुनः किचनमधे निघून गेली. लावण्या, सौंदर्या हॉलमध्ये खातखात येऊन बबसमोर उभ्या झाल्या. 

सौंदर्या आनंदाने सांगायला लागली “बाबा बाबा आज एक गंमत झाली. मला डान्स मध्ये टीचरणी लीड परफॉर्मर म्हणून समोर रांगेत जागा दिली”

बाबा आनंदाने “अरे वा!”

लावण्या जी काही आतापर्यंत सामान्य झाली होती ती हे सौंदर्याचे आणि बाबाचे संभाषण एकूण नाराज झाली. हातातली जिलेबी प्लेटमध्ये टाकून ती टेबलेवर ठेवत पळत तिच्या रूममध्ये निघून गेली. बाबा हे बघीत “हिला काय झाले?”

आई किचनमधून चहा घेऊन येत म्हणाली ”तिला बिचारीला मागे रांगेमध्ये उभे केले. आणि सौंदर्या तू मला सांगितले नाही तुला समोर उभे केले ते”

“मी सांगीत होती तर तूच फ्रेश हो फ्रेश हो म्हणाली. मग राहून गेले”

राजेशनी आईला सांगित ”लावण्याला आन माझ्या कडे”

लावण्या जड़ पावलानी बाबा जवळ आली आणि बाबानीही प्रेमाने जवळ घेत “ काही नाही बेटा पुढीलवर्षी आणखी छान मेहनत करू तर तू नक्की समोर परफॉर्म करशील” लावण्यानेपण चटकन मान हलवीत होकार दिला. तिला जे अटेन्शन हवे होते ते तिने मिळवले. ती बाबांची फार लाडकी होती. बाबानी गालावरती पापी करून ”माझ समझदार बाळ! गुड गर्ल”

रात्रीच्या जेवणानंतर सर्व झोपायला निघून गेले. आज लावण्यांनी स्वतःच्या रूममध्ये न झोपता आई बाबां बरोबर झोपण्याचा हट्ट पकडला आणि त्यांनी तो मान्य केला. अर्थात लावण्याचे बघून सौंदर्या पण आई बाबामध्ये जाऊन झोपली . लावण्या बाबाजवळ जाऊन बिलगली सौंदर्या आई जवळ . बाबा नी दोघीना झोपताना गोष्ट सांगितली. बाबा रोज दोघीच्या रूममध्ये बसून दोघी झोपेपर्यंत गोष्टी सांगायचे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे. लहानपणी प्रश्न कधी संपत नसायचे बाबाही उत्तरे देत थकत नसायचे. पण वेळ बघून शेवटी म्हणायचे “चला झोपा बघू स्वप्नामधील पऱ्या निळ्याशार आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांमध्ये तुम्ही दोन पऱ्यांची वाट बघतायात” हे एकूण दोघी घट्ट डोळे मिटून चटकन झोपी जायच्या. 

आज तर नृत्याची प्रॅक्टिस करून दमल्यामुळे बाबांची गोष्ट ऐकताऐकताच दोघी झोपी गेल्या. 

रश्मीने थोड्या काळजीत राजेशला म्हणाली “राजेश मला लावण्याची काळजी वाटतेय. इतक्यात ती छोट्या छोट्या गोष्टीवरती फार विचार करतीये. आणि रोज आल्यावर शाळेत मला यांनी हे म्हटले,ते म्हटले संगीत असते.”

राजेश तिला समजावत म्हणाला “अग तिच्या ह्या वयात वाटत असले तिला हे आणि ती थोडी हळवी आहे. हळूहळू समजायला लागली कि नाही करेल.” 

हे राजेश चे उत्तर समाधानकारक नसतानाही रश्मी एकूण शांत झाली आणि झोपी गेली. 

राजेशने जरी रश्मीच्या प्रश्नाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो त्याच विचारत छताकडे बघीत होता. ‘आता लावण्या लहान आहे सगळे दुःख ,आनंद मनमोकळेपानाने सांगते, पण जेव्हा ती मोठी होणार तेव्हा पण असंच सांगेल? का मनात दाबून धरेल?’

राजेशला थोडे अस्वथ झाले एकीकडून दुसरीकडे कड बदलत तो विचार करीत होता. लावण्याच्या भविष्याबाबत त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले. 

सतत चाललेल्या आघातामुळे तिच्या मनावर काही कायमस्वरूपी वाईट परिणाम तर नाही होणार?

तिचे आयुष्य हे असेच निराशेत तर नाही जाईल? 

आणि ह्यामध्येच एका विचाराने तो रोमांचित झाला तिचे आयुष्य त्या वनात भेटलेल्या तपस्वी साधूने भाकीत केल्याप्रमाने रोमांचक राहणार का?

आणि त्याला लावण्याच्या जन्मानंतरच्या घडामोडी डोळ्यासमोर आल्या…


क्रमशः ..Rate this content
Log in