Abasaheb Mhaske

Others

0.8  

Abasaheb Mhaske

Others

काही माणसं भेटतात

काही माणसं भेटतात

5 mins
1.6K


तिसरे भूमिजन साहित्य संमेलन बठाण बुद्रुक तालुका जिल्हा जालना येथे दिनांक १७ फेब्रूवारी २०१९ रोजी उत्साहात पार पडले . भाषा, साहित्य , संस्कृती आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. प्राध्यापक डॉ. सर्जेराव जिगे पाटील सर ,तिफनकार शिवाजी हुसे , दिलीप बिरुटे, जालना जिल्हा अध्यक्ष डॉ. शशिकांत पाटील , यशवंत सोनुने , रावसाहेब ढवळे, बसवराज कोरे आदी ज्ञात - अज्ञात असंख्य सामाजिक बांधीलकीच्या भूमिकेतुन एकत्र आले होते . आम्ही सर्व भूमीजन हा धागा पकडून डॉ. सर्जेराव जिगे पाटील सर यांनी .शेतीतज्ञ् जालना जिल्ह्याचे भूषण विजय अण्णा बोराडे सर , आक्ख आयुष्य शेतकऱ्याचं प्रश्नासाठी आपलं, आयुष्य वाहून घेणारे भरत पाटणकर , संमेलना अधक्ष्य आम्वेट मॅडम साक्षात समोर उभं करून त्यांचं अमूल्य मार्गदर्शन बठाण व परिसरातील शेतकरी व कामगार ,रसिकांना यांना घडले .उल्लेखनीय बाब म्हणे स्वागताध्यक्ष भूमिपुत्र उत्तम वक्ता ज्ञानेश्वर कुंडलिक देवडे व त्यांची शिवनेरी मित्रमंडळ टीम यांचे उत्कृष्ट नियोजन , आग्रहाने भोजन ,नाश्ता आदी पाहुणचार आणि प्रेमाचा आपुलकिच्या वर्तणुकीने सर्वच भारावून गेले होते. खेड्यात आजही माणुसकी प्रेम जिव्हाळा , माणूसकी अजून जिवंत आहे याच दर्शन घडलं .. शिवनेरी मित्र मंडळाचे सर्वच सदस्य स्वयंस्फूर्तीने घरातील कार्य असल्यासारखे शेवटपर्यंत राबत होते . खरंच सलाम तुमच्या उत्साहाला , आणि रसिकतेला सकाळी नऊ वाजेच्या ग्रंथ दिंडीपासून महिला मुले , तरुण सर्वच जण प्रत्येक कार्यक्रमास हजार होते .कविसंमेलनात सुप्रसिद्ध कवी गीतकार दासू वैद्य सर हजर होते . महाराष्ट्रातील विविध भागातून नवकवि , प्रथितयश कविनी कवयित्रीनि हजेरी लावली होती . सूत्रसंचलंन प्रा एकनाथ शिंदे सरानी केले , अध्यक्ष शंकर वाडीवाले, लक्ष्मण खेडकर , चंद्रकांत सिरस्कार , प्रभाकर शेळके , पांडुरंग गिराम , आबासाहेब म्हस्के , नारायण खरात , गोवर्धन मुळक , पंडित रानमाळ , दीप्ती मंगीराज स्वाती रत्नपारखी ,अशोक खेडकर , सदाशिव कळमकर सुहास सदावर्ते , ऋषीबाबा शिंदे राज रणधीर दिगंबार दाते , वसंत उगले , मुकुल बोरसे ,आदी कवींनी आपल्या कवितांनी मंत्रमुग्ध केले . i यशस्वी स्त्रियांमध्ये डॉ अपर्णा पाटील , श्रीमती गीता खांडेभराड , श्रीमती सीताबाई मोहिते , प्रमिला मुखेडकर आदी नी आपले अनुभव कथन केले. विशेष बाब म्हणजे महिला , तरुण ह्यांनी शेवटपर्यंत मंडमध्ये बसूनच होते आणि मनातून दाद देत होते कार्य्रक्रमाचा आस्वाद घेत होते .

काही माणसं भेटतात आणि आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनचं बदलतो . त्यातील मोजकीच माणसं समाजाच भलं व्हाल तळमळीने आयुष्यभर झटतात . आपण कळ -नकळत देश , समाजाकडून खूप काही घेत असतो . या भूमीचे आपण देणे लागतो हे ऋण फेडणे आवश्यक असते याचि त्यांना जाणीव असते. त्यातील असे अनमोल रत्न भारतभत विखुरलेले आहेत . त्यांना एकत्र करण्याचे काम होत नसले तरी ते आपापल्या परीने , कुवतीनुसार करीत असतात . पण काही लोक खूप काही करण्यासाठी योग्यता असून देखील समाजासाठी काही करू शकत नाही .काही करण्याची धमक असूनही ते काही तरी समाजासाठी करण्याची तळमळ , धडपड मात्र नक्कीच बाळगून असतात . ते संभ्रमित असतात . आणि आर्थिक बाजू कमकुवत असल्याकारणाने ते हताश होतात . कारण घर संसार , रोजच्या रगाड्यातून त्यांची सुटका होत नाही आणि मग नैराश्य येते . पण अशा संवेदनशील मनाचे , प्रतिभावान लोकांची तळमळ अचूक हेरून त्यांना एकत्र आणून त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं महान कार्य गेल्या दशकापासून आमचे मार्गदर्शक आदर्श डॉ. सर्जेराव जिगे पाटील सर करीत आहेत . नोकरी , घर - संसार सांभाळत भाषा, साहित्य , संस्कृती आणि संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत . भूमिजन चळवळ संकल्पनेतून त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले आहेत . त्यांच्या मानतील मरगळ झटकून कामाला लावले आहे. संतवचना प्रमाणे बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले ... बोलघेवडे समाजसुधारक अनेक आहेत . पण कृतिशील अनेक प्रतिभावन आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून प्रसिद्धीची हाव न बाळगता काम करणारी मंडळी शोधून त्य्नाच्या कार्यच गौरव करण्याचं काम हि मंडळी करीत आहे . त्यांची हि भूमिजन चळवळ इवल्याश्या रोपट्यातून वटवृक्ष लवकर होईल असा विश्वासच नाही तर खात्री आहे . कारण जो माणूस शाबासकीची थाप देण्याची योग्यता त्यासाठी लागणार मोठ मन बाळगून असतो . त्याची शब्द झेलणारी माणसं आपसूक तयार होतात . कार्यकर्त्याची फार मोठी फौज उभि राहते आहे . त्यातील प्रा. एकनाथ शिंदे , पांडुरंग गिराम , मी स्वतः अशा अनेक वर्षांपासून साधं व्यासपीठावर कविता सादर करण्याची संधी लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी प्रस्थपित साहित्यिक मंडळींनी नाकारली होती . महाराष्टभरातील आमच्यासारख्या अनेक लोकांना हककच व्यासपीठ मिळवून देण्याचं काम भूमिजन चळवळीच्या माध्यमातून होते आहे . या मातीशी नाळ जोडलेले भूमिपुत्र एकत्र येऊन खूप काही विधायक चांगलं घडू शकत असा मला वाटत . खूप कमी लोकांना जीवनाचा अर्थ समजलेला . आपण कशासाठी जन्म घेतला ? मातृ ऋण .पितृ ऋण , गुरु ऋण फेडणे आवश्यक आहे . त्याचबरोबर देशाच्या उभारणीची एक वीट होण्याचं भाग्य जरी लाभलं तरी आवघ आयुष्यच सार्थ होईल. जन्माला आलेला सर्व जीव एक दिवस मरणारचं आहे पण मारावे परी किर्तीरुपी उरावे .. नंदादीप नाही होता आलं तरी पणती बनून तेवत राहून आपापल्या परीने सभोतालचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न करावा .

मित्रहो ! का कुणास ठाऊक माणसा - माणसातील प्रेम जिव्हाळा , आपुलकी कमी होत चाललीय . विभक्त कुटुंब पध्द्तीचा परिणाम असावा बहुदा . प्रथम आपण एक चांगलं माणूस होऊया . एका विशिष्ट कोशातच आपण बंदिस्त झालो आहोत . माझं घर मूळ बाळ संसार यातच गुंतून पडलो आहोत . सभोवताली सारकही बिघडलंय काही तरी करायलाही हवं हे ही समजत पण ती जबादारी कुणीतरी शेजाऱ्याने घ्यावी शिवाजी महाराज जन्माला यावेत पण ते शेजाऱ्याची घरात . असे वाटणेच घातक आहे यांचे गंभीर परिणाम आपल्या पुढ्याचा पिढीला भोगावे लागणार आहेत. तेंव्हा उठ मित्र जागा हो , क्रांतीचा धागा हो ! फक्त पंखात बळ आणि उंच आकाशात भारे घेण्याचं स्वप्न उराशी बाळण्याची गरज आहे ते यशोशिखर तुला गवसणी घालत आहे .

आम्ही सर्व भूमिजन असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि ही भूमिजन चळवळ नेटाने पुढे चालावी याकरिता विचारांचे वारस ही निर्माण होणे तितकेच आवश्यक आहे . लवकरच भूमिजन चळवळ मोठी होणार ते दिवस दूर नाहीत मित्र हो !

असतील डोळे पुसणारे तर ....

रडण्यालाही अर्थ आहे

नसतील रडणारे तर....

मरणही व्यर्थ आहे ...


Rate this content
Log in