जिवन्त हैट
जिवन्त हैट


जिवन्त हैट
लेखक: निकोलाय नोसव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
मांजरीचं लहानसं पिल्लू वास्का फरशीवर, अलमारीजवळ बसलं होतं.
अलमारीच्या वरती, अगदी कोप-यावर एक हैट ठेवली होती. अचानक हैट खाली पडली आणि तिने वास्काला पूर्णपणे झाकून टाकलं.
खोलींत बसले होते वोलोद्या आणि वादिक.
त्यांने बघितलंच नाही की वास्का कसा हैटच्या खाली लपलाय.
वोलोद्या वळला आणि त्याची नजर फरशीवर पडलेल्या हैटवर गेली.
तो हैट उचलायला पुढे आला, पण अचानक ओरडू लागला, “आय-आय-आय” – आणि घाबरून दूर झाला.
“काय झालं?” वादिकने विचारलं.
“ती जि-जि-जिवन्त आहे!”
“कोण जिवन्त आहे?”
“है-है-हैट!”
“कसा आहेस रे तू! हैट कधी जिवन्तपण असते?”
स्वतःच बघून घे!”
वादिक पुढे आला आणि लक्ष देऊन हैटकडे बघू लागला.
अचानक हैट सरळ त्याच्याकडे सरकू लागली.
तो ओरडला, “आय!” – आणि उडी मारून दीवानवर चढून गेला.
त्याच्या मागे-मागे वोलोद्यापण चढला.
हैट सरकंत-सरकंत खोलीच्या मधोमध आली आणि थांबून गेली. तिच्याकडे बघंत मुलं भीतिने थरथर कापू लागली.
“हे काय आहे! ही खोलीत कां सरकतेय?” वादिकने म्हटलं.
आणि हैट सरकंत-सरकंत दीवानपर्यंत आली. मुलं किचनमधे पळाली.
हैटसुद्धां रांगत-रांगत किचनमधे पोहोचली.
किचनच्या मधोमध पोहोचली आणि तिने रांगणं बंद केलं.
“ऐ, हैट!”
नाही रांगंत.
“ओहो, घाबरली!!” मुलं आनंदाने ओरडली.
“चल, हिच्यावर बटाटे फेकूं या,” वादिक म्हणाला.
त्यांने टोपलीतून बरेचसे बटाटे काढले आणि हैटवर फेकू लागले.
वादिकचा नेम लागला.
हैट उड्या मारू लागली आणि “म्याँऊ, म्याँऊ” करू लागली.
आणि हैटच्या खालून काळं शेपूट बाहेर निघालं.
“वास्का!” मुलं ओरडली आणि त्याला आपल्या हाताने पकडू लागली.
“वास्का, लाडक्या, तू हैटच्या खाली कसा आलांस?”
पण वास्काने काही उत्तर नाही दिलं. त्याने, बस, उजेडामुळे फुरफुर करंत आपले डोळे मिटून घेतले.
*****************