इंटरनेट नि मोबाईलवाला समाज
इंटरनेट नि मोबाईलवाला समाज


आज शाळकरी मुलांच्याही हातात अँड्रॉइड मोबाईल दिसतो. त्यात यूट्यूब या एपमधून जितकी चांगली माहिती तितकीच सर्व वाईटही. मी वाईट शाळकरी मुलांच्या वयासाठी बोलते. नको तितकी माहिती मिळते. जो विषय किंवा माहिती ही अल्लड वयातील मुले चवीने वाचतात. व्हिडिओ पाहतात त्यातून बऱ्यावाईटाची जाणीव नसल्याने बावचळतात. नको ते प्रकार करू पाहतात. काहीजण गंमत, काही वेगळेपण, तर काहीजण विकृत वृत्तीने. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम समाजाला भोगावे लागतात. इंटरनेट इतके स्वस्त उपलब्ध असते की सगळे सहजच वापरू शकतात. या ऐन करियरच्या वयात नको त्या गोष्टींना प्राधान्य दिल्याने त्याचे दूरगामी वाईट परिणाम कुटुंब साहजिकच समाजाला भोगावे लागतात.
दुसरी गोष्ट वाचनात आली की वेश्याव्यवसायामुळे खानदानी किंवा उच्चभ्रू समाजातील मुली सुरक्षित राहतात. पण या वेश्या जन्मतः वाईट नसतात परिस्थितीने किंवा जबरदस्ती त्या या क्षेत्रात येतात. त्यांनाही आपले घर संसार असावा वाटणे साहजिकच आहे जीवन त्यांच्यासाठीही एकदाच आहे मग त्यांनी का देहसमर्पण करून सुंदर जीवन उकिरड्यात लाचारीने वेश्या म्हणून घेत जगायचे?