Charumati Ramdas

Others

2  

Charumati Ramdas

Others

इण्डियन फिल्म्स - 1.9

इण्डियन फिल्म्स - 1.9

5 mins
407



लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


मी फुटबॉल मैच बघतो...     


फुटबॉल मैच चालू होता. चैनल 1 वर, नेहमीप्रमाणे, संध्याकाळी, प्राइम टाइम मधे. आणि काय! स्पार्ताक आणि सेस्का ( सेस्का- सेंट्रल स्पोर्ट्स क्लब ऑफ आर्मी – रशियाचा फार जुना क्लब – अनु.) ह्यांच्यामधे सामना होणार होता! आमच्या रशियन चैम्पियनशिपचा सर्वांत इम्पॉर्टेन्ट मैच!

“लुझ्निकी” स्टेडियम गच्च भरलं होतं.

मैच सुरूं होण्यापूर्वी जवळ-जवळ अर्धा तास वेगवेगळे इंटरव्यूज़ दाखवंत होते, जर्नलिस्ट्स मैचचा परिणाम काय होईल ह्याचा अंदाज लावत होते आणि टीम्सबद्दल चर्चा करंत होते – म्हणजे, मूड एकदम फुटबॉल-फ़ेस्टिवलसारखा होता.

मी खूप लक्ष देऊन टेलिकास्ट बघंत होतो आणि मैच सुरू होई पर्यंत मी ठरवूं शकलो नव्हतो की मी कुणाच‘फैन’ होईन. पण मग, मी स्पार्ताकची टीम निवडली, कारण मी ‘स्पार्ताक’च्या एका जुन्या, प्रसिद्ध खेळाडू – फ़्योदोर चेरेन्कोवला ओळखंत होतो. आणि मला लगेच आठवलं की फ़्योदोर कित्ती वन्डरफुल माणूस आहे. इतका छान कोणीच माणूस असूं शकंत नाही, आणि मला वाटलं की ‘स्पार्ताक’चा फैन होणं माझं कर्तव्यंच आहे! आणि शिवाय, तो देशभरांत अत्यंत प्रसिद्ध आहे.

कॉमेन्टेटरने टी.वी.च्या दर्शकांना ‘हैलो’ म्हटलं, आणि खेळ सुरू झाला. बरोब्बर तीन मिनिटांवर ‘स्पार्ताक’च्या स्ट्राइकरने ‘सेस्का’च्या गोल-कीपर अकीन्फ़ेयेवला गंभीर दुखापत केली. अकीन्फ़ेयेव गवतावर पडला होता आणि पीडेमुळे तडफडंत होता. स्ट्रेचर आणले गेले .‘सेस्का’च्या गोल-कीपरला शु द्धीवर आणण्याचा प्रयत्न करूं लागले. पण ‘स्पार्ताक’चा स्ट्राइकर जवळंच उभा राहून नुसतां बघंत होता, त्याला अकीन्फ़ेयेवबद्दल येवढीशीसुद्धां दया वाटंत नव्हती. उलट,तो हसण्याचा बेतातंच होता!

मी पण हाच विचार करंत होतो. जर ‘स्पार्ताक’चे स्ट्राइकर्स इतके दुष्ट आहेत, तर मी ‘स्पार्ताक’चा फ़ैन नाहीं होणार. बिचारा गोल कीपर इतका तळमळतो आह, त्याला इतकी गंभीर दुखापत केली आणि ह्याच्या मनांत जरासुद्धां सहानुभूति नाहींये!.

मी ‘सेस्का’चांच फैन होईन.

पण तेवढ्यांत आणखी एक नाटक झाले. टी.वी.वर ज़ख़्मी अकीन्फेयेवला स्ट्रेचर वर बाहेर घेऊन जातानाचे हाइलाइट्स दाखवत होतेआणि तो कसा ओरडंत होता हे ऐकायला सुद्धां मजा येत होती. तो ओरडून-ओरडून ‘स्पार्ताक’च्या स्ट्राइकरला इतक्या भयानक शिव्या देत होता, की त्या मी इथे लिहूं देखील शकत नाही. पुस्तकांमधे असले शब्द छापंत नाही. ‘सेस्का’चा ज़ख्मी गोल कीपर बरांच वेळ मोठ्याने ओरडून आणि खूप प्रयत्न करून सांगत होता की तो, म्हणजे स्ट्राइकर, ज्याने त्याला इजा केली होती, खरं म्हणजे कोण आहे, आणि त्याचे सगळे नातेवाईक, मित्र आणि ओळखीचे लोकं कोण आहेत आणि त्याने धमकी दिली की सर्वांना जिवंतच जमीनीत पुरून टाकेल!

नाही, मी विचार केला, असल्या टीमचा फैन मी नाही होणार, जिचा गोल कीपर इतका दुष्ट आहे. मी ‘स्पार्ताक’चांच फ़ैन राहीन. आणि चेरेन्कोव मस्त माणूस आहे आणि,तसं पण, कोणी इतक्या घाणेरड्या शिव्या देऊंच कसा शकतो!

तेवढ्यांत ‘स्पार्ताक’ने गोल केला. वेल्लितन आणि दुसरे स्पार्ताकियन्स आनंदाने ग्राऊण्डच्या बाउन्ड्रीजवळ डान्स करूं लागले. आह, कित्ती घाणेरडेपणाने ते डान्स करंत होते! फक्त भयानक आरडा-ओरड! खूपंच कृत्रिम उत्साहाने.

त्यांचा आनंद लवकरंच वेडेपणापर्यंत पोहोचला. त्यांनी आपले टी-शर्ट्स काढून फेकले, शॉर्ट्स खाली सरकवले – म्हणजे, काहीतरी खूपंच भयानक घडंत होतं. ‘स्पार्ताक’च्या फैन्सच्या गैलरीला सुद्धां वेड लागलं होतं, आणि मग त्यांनी मशाली पेटवल्या, त्यांच्यातून इतका धूर निघूं लागला की ग्राऊण्ड सुद्धां दिसंत नव्हतं. कॉमेन्टेटरने हेच सांगितलं : “ग्राऊण्ड नीट दिसंत नाहीये, कॉमेन्ट्री करणं खूप कठीण आहे.”

मग स्पार्ताकियन्स ‘सेस्का’च्या फैन्सच्या गैलरीजवळ गेले आणि तोंडं वेडेवाकडे करून चिडवायला लागले. असं होत राहिलं.

‘नाहीं,’ मी विचार केला, मी ‘सेस्का’चांच फैन राहीन, तेच जास्त चांगलं आहे. तसं पण अकीन्फ़ेयेव ज़ख़्मी झाला होता , आणि ‘सेस्का’च्या खेळाडूंनी आपले शॉर्ट्स खाली नव्हते सरकवले.

पण वीस मिनिटांतच वेगळंच झालं. खरं सांगायचं तर पुष्कळश्या फुटबॉलप्रेमींच्या मते काही विशेष घडलंच नाही, पण मी जे काही बघितलं, त्याचा माझ्यावर खूपंच परिणाम झाला.

‘सेस्का’च्या चीफ-ट्रेनरला टी.वी.वर दाखवंत होते. त्याला चांगलंच माहीत होतं की त्याला टी.वी.वर दाखवतांत आहेत, पण त्याने काही फरक नाही पडला, आणि त्याने सर्वांच्यासमोर मोठ्याने नाक शिंकरलं, ते पण थेट त्या सुंदरश्या आणि विशेष प्रयत्न करून बनवलेल्या ट्रेड मिलवर, जिच्यावर तो उभा होता. मला खूप राग आला. असं करतांत कां?! कमीत कमी रुमालंच काढला असता! पण, हा तर सरळ ट्रेड मिलवर! नाही, मी ‘सेस्का’चा फैन नाही होणार. ‘स्पार्ताक’चाच फैन राहीन. कमीत कमी त्यांचा ट्रेनर तरी स्वच्छ आहे...

मग ‘सेस्का’ने सुद्धां एक गोल केला. आणि ‘सेस्का’च्या खेळाडूंनी खूपंच सभ्यतेने आपला विजय साजरा केला. त्यांनी, सांगायचं म्हणजे, आपले जर्सी-जैकेट्स नाही काढून फेकले. पण ‘स्पार्ताक’चे फैन्स, स्पष्ट आहे, की ‘सेस्का’च्या खेळाडूंवर चिडून आणखी जास्त मशाली पेटवूं लागले आणि वरून ग्राऊण्डवर टॉयलेट-पेपरचे रोल्स फेकूं लागले.

“आह, हे कित्ती घाणेरडं आहे,” कॉमेन्टेटरने कुरबुरंत म्हटलं, “’स्पार्ताक’च्या फैन्सचं हे असलं वागणं! मित्रांनो, ग्राऊण्डवर टॉयलेट-पेपर फेकणं!”

वाद घालायचा प्रश्नंच नव्हता, मला कॉमेन्टेटरचं म्हणणं पूर्णपणे पटंत होतं! नाही, मी ‘सेस्का’चाच फैन होईन. त्यांचे फैन्स कमीत कमी टॉयलेट-पेपर्सतर ग्राऊण्डवर नाही फेकंत!

पण, दुसरीकडे, फ़्योदोर चेरेन्कोव – कित्ती चांगला माणूस आहे... आणि कदाचित 'स्पार्ताक’च्या स्ट्राइकरला मैचच्या सुरुवातीला ‘सेस्का’च्या गोलकीपरला जखमी नव्हतं करायचं...तरी पण ‘स्पार्ताक’चाच फैन राहीन...

की ‘सेस्का’चा?

त्यानंतर ‘सेस्का’ने आणखी एक गोल बनवला. ‘स्पार्ताक’ने हा गोल लगेच उतरवून टाकला, आणि मैच 2:2च्या स्कोरने संपला.

थैन्क्स गॉड! चला, शेवटी एकदांचा संपला तरी! थैन्क्स, की नाक खाली नाही झालं. नाहीं तर मला ठरवतांच नसतं आलं की मला कोणाचा फैन व्हायला पाहिजे, आणि शेवटी दुःख व्हायला पाहिजे की आनंद झाला पाहिजे!

मैच संपल्याबरोबर मला न्यू क्वार्टर्सच्या तोल्या लूकोवने फोन केला. न्यू क्वार्टर्स हल्लीच बनवले आहेत, ट्रामच्या थांब्याच्या मागे.

“सेरी, तू कुणाचा ‘फैन’ होता?” त्याने विचारलं.

आणि तोल्यातर फुटबॉलचा इतका शौकीन आहे की जगांत त्याला फुटबॉलशिवाय दुसरं काही दिसतंच नाही. मोठा होऊन फुटबॉल प्लेयर व्हायचंय त्याला आणि तो स्पोर्ट्स-स्कूल ‘स्मेना’मधे शिकतोय.

“तोल्यान,” मी प्रामाणिकपणे सांगितलं, मला कळंत होतं की ह्याचा परिणाम काहीही होऊं शकतो, “प्लीज, मला येवढं सांग की ते सगळे तिथे थुंकत कां होते, टॉयलेट-पेपर्स कशाला फेकंत होते, पैन्ट्स कां खाली सरकवंत होते? फुटबॉलच्या गेममधे असं सगळं होत असतं कां?”

“काय म्हणतोयं!!!” तोल्या रागाने किंचाळला. “कित्ती उत्कृष्ट खेळ होता! हे थुंकणं कुठून आलं? तुझं डोकं तर नाही फिरलंय? आता मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तुला फक्त बैले बघायला पाहिजे, फुटबॉल नाही!” आणि त्याने रिसीवर ठेवून दिला.

मी पण हाच विचार करतोय, की खरंच बैले पाहणं जास्त चांगल असेल. तिथे कोणी धूर तर नाही करणार. बैले, कदाचित, चांगली गोष्ट आहे. फक्त एकंच गोष्ट, जी मला त्यांत आवडंत नाही, ती अशी की सगळी मुलं घट्ट विजारी घालून उड्या मारतात. ते मला नाहीं आवडंत. आणि जोकर सुद्धा! त्यांना साधारण विजार घालतांच येत नाहीं


Rate this content
Log in