इण्डियन फ़िल्म्स 3.4
इण्डियन फ़िल्म्स 3.4
लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
मला काही सांगायचंय...
माझा जन्म सुप्रसिद्ध हीरो-सिटी स्मोलेन्स्कमधे सन् 1978मधे झाला आणि मी तिथे सेप्टेम्बर 1985पर्यंत राहिलो. स्मोलेन्स्कमधे माझे जवळ-जवळ सगळे जवळचे नातेवाईक राहायचे, मम्मीकडचे आणि पापांकडचेही.
माझे मम्मी-पापा नौकरी करायचे (पापा सैन्यात होते, आणि मम्मी रेडिओ स्टेशनवर), आणि मी नर्सरी शाळेत जायचो, तिथे मी बरेंचदा आजारी पडायचो, म्हणून मी बराच काळ आजी-आजोबांकडे राह्यलो. म्हणूनंच माझ्या ह्या लघु कादंबरिकेत आजीची, पणजीआजीची, आणि आजोबाची गोष्ट आहे. आणि व्लादिक – माझा मावस भाऊ आहे – मम्मीची बहिण – स्वेता आण्टीचा मुलगा. त्यांचे कुटुम्बसुद्धां स्मोलेन्स्कमधेंच राहायचे. आणि तसं पण – माझ्या गोष्टींचे बाकी पात्रंसुद्धां खरेखुरेच आहेत – ते त्या काळांत आमच्या कम्पाऊण्डमधे राहायचे, किंवा माझ्या नातेवाइकांचे मित्र होते. मी एकही काल्पनिक प्रसंग लिहिलेला नाहीये.
त्या काळचे स्मोलेन्स्क म्हणजे एक शांत, हिरवळीनं बहरलेलं शहर असायचं, ज्यांत, म्हातारपणामुळे चरमरंत ट्रामगाड्या घसटायच्या. सामूहिक फार्मच्या बाजारांत आमच्या आवडीचे बियाणे, कलिंगड आणि चेरीज़ विकायचे आणि शहरांतल्या सिनेमा हॉल्समधे वेगवेगळ्या प्रकाराच्या, नव्या आणि जुन्या इण्डियन फिल्म्स दाखवायचे....
आज तो काळ मला स्वर्गासारखा वाटतो, ज्याला, मला वाटतं, मी कधीच विसरूं नाहीं शकणार. आम्हीं मॉस्कोला आल्यावर पण, जवळ-जवळ सन् 1994पर्यंत मी सगळ्या सुट्ट्या आणि सगळे उन्हाळे स्मोलेन्स्कमधेच घालवायचो, स्वर्गाच्या अनुभवाला खूप वेळ अनुभवायच्या प्रयत्नांत, कारण तिथेच माझं खरं जीवन होतं. आण्खी कोणत्याही शहराने आणि देशाने मला कधीच आकर्षित नाहीं केलं, हे सांगताना घाबरणार नाहीं, की मी जणु तिथेच बंदिस्त झालो होतो. सन् 1998मधे माझे आजोबा वारले (‘इण्डियन फिल्म्स’ ह्या लघु-कादंबरिकेचे पर्तोस) आणि स्वर्गाची जाणीव संपली. मी स्मोलेन्स्कला जात राहिलो, पण ही वेगळ्याच प्रकारची ट्रिप असायची.
सन् 2005मधे मी मॉस्को स्टेट युनिवर्सिटीतून जर्नलिज़्मचा कोर्स पूर्ण केला,सुरुवातीला एका प्रकाशनगृहामधे काम केलं, मग रेडिओवर, पण लेखकांसाठी आयोजित केलेल्या सेमिनार्समधेही मी जायचो, माझ्या रचना प्रकाशित होत होत्या, आपल्या गोष्टी आणि कविता मी वेगवेगळ्या पब्लिक फोरम्समधे प्रस्तुत करंत होतो (तसं तर लहानपणीच मी लिहायला सुरुवात केली होती, पण काही व्यवस्थित जमलं नाहीं). लेखिका मरीना मस्क्वीना, कवियत्री एवम् अनुवादिका मरीना बरदीत्स्काया, कवियत्री तात्याना कुज़ोव्लेवायाा, आलोचक इरीना अर्ज़ामास्त्सेवाया,कवियत्री आणि नाटककार एलेना इसायेवा आणि एडवर्ड निकोलायेविच उस्पेन्स्की – ह्या मंडळींशी संवाद करणं फार अवघड वाटायचं. एडवर्ड उस्पेन्स्कीने जेव्हां माझ्या रचनांची तारीफ़ केली, तेव्हां मला विश्वास वाटू लागला, की मी लेखक आहे. मी इरीना युरेव्ना कवाल्योवाचा आभारी आहे, ज्या लीप्कीमधे आयोजित तरूण लेखक मंचाच्या आयोजकांपैकी आहेत, ज्यांत मी सन् 2004मधे भाग घेतला होता, त्यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आणि प्रेमळ वागणुकीसाठी धन्यवाद देऊं इच्छितो.
मी विशेषकरून मुलांसाठी लिहिण्याचा प्रयत्न नाही केला – बस, मनांत येईल ते लिहीत गेलो, उलट मी मोठ्यांसाठीच लिहीत होतो. पण, तरीही, मला मुलांचा लेखक म्हणूं लागले. ठीक आहे, मी विरोध नाही करंत.
जे लोकं हे पुस्तक वाचतील त्यांना अगदी हृदयांतून धन्यवाद. आणि ज्यांना हे आवडेल, त्यांना आनंदाने आपला मित्र समजेन.
नेहमीच आपला
सिर्गेइ पिरिल्याएव