Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Charumati Ramdas

Others


3  

Charumati Ramdas

Others


इण्डियन फ़िल्म्स 2.9

इण्डियन फ़िल्म्स 2.9

3 mins 567 3 mins 567


लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


फुटबॉल-हॉकी


“ह्या खट्याळ मुलामुळे मी आपल्यांच घरांत प्रसिद्ध कलाकारांची कॉन्सर्ट नाहीं बघू शकत!” आजोबा कुरकुरंंत आहेत, पण तरीही किचनमधे चहा प्यायला निघून जातांत, आणि शेवटी मी टी.वीचं चैनल बदलतोच, मी प्रोग्राम नं. 2वर येतो, जिथे पंधरा मिनिटांपासून फुटबॉल चालू आहे. “स्पार्ताक” – “दिनामो”(कीएव). दसाएव, चिरेन्कोव, रदिओनोव, ब्लोखिन, बल्ताचा, मिखाइलिचेन्को, आणि हे न जाणे कोणत्या कलांकारासाठी चिडचिडताहेत!

आमच्या घरी फक्त एकंच टी.वी. आहे, आणि म्हणून, फुटबॉल आणि हॉकीचे सगळे मैचेस बघण्यासाठी, जे अधून-मधूनंच दाखवतांत, मला चार वर्षांचा असतानांच वाचणं शिकावं लागलं. पेपरमधे टी.वी. प्रोग्राम दिलेला असतो – पेपर घ्या आणि स्वतःच बघून घ्या की केव्हां टेलिकास्ट होणार आहे. जर मला वाचतां येत नसतं, तर कोणीही, ह्या कटकटीमुळे, मला सांगितलंच नसतं की एखाद्या कॉन्सर्टच्या वेळेला दुसरीकडे , उदाहरणार्थ, यूरोपियन क्लबचा मैच दाखवतांत आहेत.

आणि मी, फक्त बघतंच नाही. पहिली गोष्ट, म्हणजे, मी ह्या गोष्टीकडे लक्ष देतो की गोल कोण करतोय, कोणच्या प्लेयरने किती अंक बनवलेत, आणि वर, माझी स्वतःची चैम्पियनशिप मैच सुद्धां चाललेली असते, आणि ती चक्क मोठ्या हॉलमधे चाललेली असते, अगदी टी.वी.वर दाखवल्या जात असलेल्या मैचच्या बरोबर-बरोबर. जेव्हां फुटबॉलचा मैच असतो, तेव्हां मी खोलीत बॉल ढकलतो, कॉमेन्ट्री करतो, अगदी ओज़ेरोव किंवा पेरेतूरिनसारखा; बाल्कनीचे दार – गोल, आणि ह्या दारावर लावलेला जाळीचा पडदा – गोलची जाळी असते. जर टी.वी.वर गोल होत असला, किंवा काही धोकादायक गोष्ट होत असेल, तर मी आपला खेळ थांबवतो, बघतो, नंतर गालीच्याच्या सेंटरपासून सुरुवात करतो.

“प्रतासोव लेफ्ट फ्लैन्कच्या दिशेने चालला आहे! पेनल्टी कॉर्नरमधे कैनपी करायला पाहिजे!” मल आठवतं की नेफ़्त्ची(फुटबॉल क्लब, बाकू)चे प्लेयर्स आज “द्नेप्र”च्या फुटबॉल प्लेयर्स विरुद्ध फार चुकीचं खेळताहेत, मी टाचेने चेंडू मागे मागे ढकलतो, स्वतःच स्वतःला शर्टाने पकडतो आणि जमेल तेवढं खरंखरं पडण्याचा प्रयत्न करतो. “निश्चितंच पेनल्टी, प्रिय मित्रांनो!!! पण माहीत नाही, रेफ़री फक्त एकंच पिवळं कार्ड दाखवतो...

तेवढ्यांत तोन्या आजी येते आणि माहीत नाहीं कितव्यांदा म्हणते, की बाहेर कम्पाऊण्डमधे खेळणं जास्त चांगल होईल. पण मी कम्पाऊण्डमधे सुद्धां खेळतो, आणि मला माहीत आहे की तिथे ‘ती’ गोष्ट नाहीये. तिथे कॉमेन्ट्री करतां येते कां? हे खरं आहे, की लवकरंच घराच्या आतल्या ह्या चैम्पियनशिप्स बंद कराव्या लागतील, कारण की हॉकीचा सीज़न सुरू होतोय आणि चेकोस्लोवाकियाच्या टीमशी खोलीतल्या मैचमधे फेतिसोवने इतक्या जोरांत बॉल फेकली की झुम्बर फुटले. हे कारण, की आमच्या टीमकडे जिंकण्यासाठी फक्त दोनंच मिनिटं शिल्लक होती, आजोबाला मंजूर नाहीये, म्हणून मी आतां फक्त टी.वी.वरंच मैच बघतो.

हरकत नाहीं, हॉकीचा मैच नुसतां बघण्यांत सुद्धां मजा येते. त्यांत सगळे नेहमी भांडतंच असतात! विशेषकरून इण्टरनेशनल मैचेसमधे. आणि वर्ल्ड कप मैचेस, “इज़्वेस्तिया”चे पुरस्कार मैचेस, कैनेडियन कप मैचेस – हे आम्हीं तोन्या आजी बरोबर, आणि कधी कधी पणजी आजी नताशा बरोबर पण बघतो. आम्हांला रेफ़रींच्या अन्यायावर चिडायला खूप आवडतं, ज्यांना कैनेडियन्सची आणि फिन्सची चूक कधी दिसतंच नाही आणि जे नेहमी अन्यायपूर्ण पद्धतीने आमच्या खेळाडूंना आउट करतात. माझ्या आज्यांना तर इतका राग येतो की आमच्या एखाद्या खेळाडूने कधी जर नियम तोडला, तरीही त्यांना कैनेडियन्सचीच चूक दिसते, आणि जरी मला माहीतेय की आमच्या खेळाडूवर चुकीमुळेंच दंड बसला आहे, तरीही मला त्यांचे हे मत, कोण जाणे कां, बरोबर वाटते.

मग अचानक हॉकी रात्री दाखवूं लागतात. तोन्या आजी न झोपण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सकाळी खेळाबद्दल मला सांगता येईल. पण तिसरा सेक्शन येतां-येतां ती नक्की झोपून जाते, म्हणून सकाळी तिला स्कोरसुद्धां माहीत नसतो, आणि टी.वी.सुद्धां रात्रभर उघडांच राहतो.

तेव्हां मी ठरवतो की मी स्वतःच मैचेस बघेन, आणि दिवसा झोपून घेत जाईन, म्हणजे रात्री माझा डोळा नाहीं लागणार. आपल्या बिछान्यावर लोळंत पडतो, कधी कधी तर दीड तास पडून राहतो, पण एका सेकंदासाठीही डोळा लागत नाहीं, मग काहीही झालं तरी हॉकीची मैच संपेपर्यंत बसूनंच राहतो. नाहीतर दुपारचं लोळणं वायाच जाईल, आणि दिवसां पलंगावर दीड घण्टा पडून राहणं – माफ़ करा, मला तरी शक्य नाहीये! पण जर सोवियत संघ आणि स्वीडनच्या टीम्समधे मैच होत असेल, तर शेवटपर्यंत कसा नाहीं बघणार? जर पहिल्या सेक्शन नंतर स्कोर 3:0 किंवा 5:1 असेल, तर, ह्याचा अर्थ हा झाला की आमची टीम निश्चितंच 10:1 ने जिंकणारे. असं, कमीत कमी नऊ वेळां झालं. एकदांतर आजोबापण रात्री उठून बसले आणि हे बघून की आम्ही कसे स्वीडन विरुद्ध लागोपाठ पाच गोल केले, गर्वाने म्हणाले:

“असा असायला पाहिजे मैच! मला सुद्धां इंटरेस्ट वाटला.”

‘जरा थांबा’ मी विचार करतो, ‘तुमच्या आर्टिस्ट्सच्या कॉन्सर्टपेक्षां वाईट तर निश्चितंच नाहींये.’


Rate this content
Log in