Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Charumati Ramdas

Others


3  

Charumati Ramdas

Others


इण्डियन फ़िल्म्स 2.8

इण्डियन फ़िल्म्स 2.8

3 mins 339 3 mins 339

लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


मी आणि व्लादिक – बिज़नेसमैन


आमच्या शहराच्या सीमेवर, तिथे, जिथे ट्राम नं. 3 वळण घेते, अचानक एक भंगार-मार्केट उघडतं. तिथे एक-एक रूबलमधे परदेशी च्युईंग गम विकतात, आणि माझ्याकडे आणि व्लादिककडे जसेच पैसे जमतात, आम्हीं तिकडे जातो. भंगार मार्केटमधे नुसतंच च्युईंग गम नाहीं, पण अनेक प्रकारच्या वस्तू विकल्या जातांत, आणि माझ्या डोक्यांत विचार येतो की जर पिठाचे बुटके बनवले, त्यांना गडद रंग दिला आणि त्यांच्यावर लाखेचे कवर चढवले तर लोक हसंत-हसंत विकत घेतील. मी व्लादिकला हा आयडिया सांगतो, आणि थोडं फार ‘नाही, नाही’ केल्यानंतर तो तयार होतो. आम्ही पीठ, मीठ, गडद रंग आणि वेष्टनासाठी लाख विकत घेतो, जो बुटक्यांसाठी लागेल.

भंगार मार्केट फक्त सुट्टीच्या दिवशीच भरतं, आणि शनिवारी संध्याकाळी आम्ही किचनला प्रॉडक्शन-यूनिटमधे बदलून टाकतो. आम्ही बुटक्यांना बेकिंग पैनमधे ठेवतो, पीठ खूब गरम करतो, मग पैन बाहेर काढतो, बुटक्यांना थोडा वेळ गार होऊं देतो, मग त्यांना रंग देऊन झाल्यावर त्यांच्यावर लाख चढवतो. सम्पूर्ण क्वार्टरमधे लाखेचा वास भरून जातो, पण कलेसाठी काहींतरी बलिदानतर द्यावंच लागतं! 

भंगार मार्केटमधे जागा मिळवायला तिथे चार वाजता पोहोचावे लागते. म्हणून बुटक्यांना चिंध्यांच्या डब्यांत व्यवस्थित ठेवून, म्हणजे एकही तुटायला नको, मी आणि व्लादिक, झोप पूर्ण न करतांच पाई-पाई अर्धवट अंधारांत शहरांतून चालत जातो, आणि आमच्या शंभर मीटर्स मागे-मागे तोन्या आजी येते आहे, मी घाबरू नये म्हणून. आम्ही जागा पटकावतो, आणि आमचे बिज़नेस-शेजारी शुभकामना देत आमचं स्वागत करतात. त्यांच्या डोक्यांत हा विचारसुद्धां येत नाहीये की आम्हीं त्यांच्याशी प्रतिस्पर्धा करूं शकूं . खरंय, इकडे-तिकडे बघितल्यावर मला खूप विचित्र वाटायला लागतं, कारण की माझा आणि व्लादिकचा स्टाल इतर स्टाल्सपेक्षा खूपंच दयनीय भासत होता. जरा विचार करा: भला मोट्ठा स्टाल आणि त्यावर उभे आहेत दहा बुटके, आगपेटीच्या साइजचे, जेव्हां इतरांकडे आपल्या सिल्क आणि मखमलसाठी जागा अपुरी होती आणि त्यांना बरंच काही हातांतंच धरावं लागतंय. वरून, थोड्या-थोड्या वेळाने तोन्या आजी येते आणि व्लादिककडून बुटके घेऊन जाते, कारण की मी तिला विकत नाहीये.

पण मग तोन्या आजी कुठेतरी गायबंच होते, भंगार मार्केट आपल्या नावाप्रमाणेच खूप हल्ला करतंय, आणि मी जोरजोरांत ओरडून आणि लोकांना जबर्दस्ती आपले सगळे बुटके विकून टाकतो, आणि शेवटचे दोन – एक रूबलमधे नाहीं, जसं आम्हीं ठरवलं होतं, पण पन्नास कोपेकमधे विकतो, तरीही मी खूप खूश आहे.

व्लादिक पूर्ण प्रयत्न करतो, की त्याच्या बुटक्यांजवळ कोणी येऊं नये. हनुवटी हातांत धरून तो ग्राहकांकडे पाठ फिरवून बसलायं आणि असं दाखवतोय की त्याला इथे एखादी भयंकर गोष्ट होण्याची भीति आहे. मी माझ्या आरड्या-ओरड्याने एखाद्याचं लक्षं वेधलं, तर तो स्वतःला आखडून घेतो आणि बस, स्टॉलच्या खाली घुसायच्यांच बेतांत असतो. मी त्याला समजूं शकतो – कारण आपला माल विकण्यासाठी जेव्हां मी अश्या लोकांचं लक्षंसुद्धां खेचतो, जे हात हलवून देतात आणि पुन्हां-पुन्हां सांगतांत की त्यांना हत्तीमधे कधीच इंटरेस्ट नव्हता.

“हे हत्ती नाहींत, बुटके आहेत!” मी त्यांच्यामागे ओरडतो. “हे बहुमूल्य आहेत, जापानी कारीगरी ‘नेत्सुके’हून कमी नाहीये, कारण ह्यांना हाताने बनवलं आहे आणि फक्त एक-एकंच बनवलं आहे!!!”

हे सगळं सहन करणं प्रत्येकाला जमंत नाही.

आम्हीं बुटक्यांची गोष्ट पुन्हां करंत नाही, पण आमचा बिज़नेस चालूच राहतो. मी रस्त्यावरचे गोटे जमवतो, त्यांना छान धुतो, त्यांना पैकेट्समधे बंद करतो, आणि मण्डईसारखं ओरडून-ओरडून विकतो, “एक्वेरियमसाठी गोटे, थेट बायकालच्या तळातून आणलेली”. खरंच सांगतोय की मी पाच पैकेट्स विकलेत.

मग मी आणि व्लादिक मत्स्य पालनाचं काम करतो, आम्हांला फ्राय-फिश उत्पन्न करून विकायची होती, पण आमच्याकडे नेहमी ‘गप्पीज़’ (रेनबो फिशेज़)च उत्पन्न होतात, आणि ‘नेचर’ ज़ू पार्कमधे तर तसले मासे खूप आहेत.

आइस्क्रीमचा बिजनेसपण बरा चालतो, पण डिपार्टमेन्टल स्टोअरपासून बाज़ारापर्यंत नेता-नेता बॉक्समधली अर्धी आइस्क्रीम वितळून जाते, आणि जी वितळंत नाही, तिच्यातला बराचसा भाग घरच्या लोकांबरोबर स्वतःलाच खावा लागतो.

घरी बनवलेल्या साबणाच्या आठ पेट्या एका सेकन्दात संपतात, कारण बाजारांत साबण कुठेच नाहीये, पण करणार काय, आजोबाच्या गोडाउनमधे फक्त आठंच पेट्या होत्या.

तेव्हां व्लादिकची मम्मा एखाद्या अनुभवी सेल्समैनसारखी अशी व्यवस्था करते, की आम्हीं चैरिटी-फण्डसाठी लॉटरीचे टिकिट्स विकावेत. आम्हीं लेनिन स्ट्रीटवर जातो, जी आमच्या शहरातली मुख्य स्ट्रीट आहे, आणि दिवसभरांत एक तृतीयांश टिकिटं विकतो. हँ, हे सांगून टाकतो, की कोणालांच काही विशेष बक्षिस नाहीं मिळालं, आणि आम्ही विचार करतो की जर उरलेले टिकिट्स उघडले तर जिंकलेली रक्कम, आमच्या मूळच्या रकमेपेक्षां जास्तंच होईल. आम्हीं टिकिट्स उघडतो.

आता मुख्य गोष्ट – चैरिटी फण्डाचा हिशेब वेळेवर द्यायचा असतो, तेव्हांच आम्हांला नवीन बिज़नेस सुरूं करता येईल...


Rate this content
Log in