इण्डियन फ़िल्म्स 2.7
इण्डियन फ़िल्म्स 2.7


लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
मी आणि व्लादिक – लेखक...
रात्रीचे अकरा वाजून गेलेत. पण मी आणि व्लादिक जागेच आहोत. आम्हीं मोठ्या खोलीत टेबलाशी बसलोय, आणि आपल्या नोटबुकवरून डोकं काढंत नाहीये. आमच्या वर प्लास्टिकच्या अनेक माळांनी वेढलेला एक छोटा लैम्प लटकतो आहे, आणि कधी-कधी असे वाक्य ऐकूं येतांत : “मी दुसरा भाग सुरू करतोय” किंवा “आणि माझा दुसरा चैप्टर प्रेमाबद्दल असेल”.
हे, आम्हीं नॉवेल्स लिहितोय. जेव्हांपासून व्लादिकने एक लहानशी गोष्ट : “थण्डीची तयारी” लिहिलेली एक जुनी, भुरकट रंगाची नोटबुक आणली होती, माझं मन “सैनिक” ह्या खेळांत रमंत नाहीये आणि मला प्लास्टीसिनची खेळणी करायला पण नाहीं आवडंत. सुरुवातीला मला आश्चर्यच झालं, की माझ्या डोक्यांत आपणहूनंच हा विचार कसा नाही आला, की एक नोटबुक विकत घेऊन त्यांत पाहिजे ते लिहितां येतं, आणि मग ‘लेखकपणा’ माझं सर्वांत फेवरेट काम झालं असतं – हो, फुटबॉल शिवाय! बस, मी असल्या फाल्तू गोष्टी नसत्या लिहिल्या, जसं - “थण्डीची तयारी”. ह्या गोष्टीत फक्त येवढंच सांगितलं आहे, की आपल्या ‘स्की’ज़ला गुळगुळीत कसं करावं, म्हणजे त्या व्यवस्थित घसरतील, आणि खिडक्यांना लुगदी लावून कसं बंद करावं, म्हणजे हवा आत नाहीं येणार. व्लादिकने लिहिलंय की खिडक्यांना स्पंजने बंद करणं सर्वांत उत्तम आहे. पण हे मजेदार नाहीये, आणि थण्डीसाठीच्या सम्पूर्ण तयारीबद्दल व्लादिकने फक्त दीडंच पान लिहिलंय! मी ठरवलं की लिहीन, तर एकदम कादम्बरीच लिहीन.
माझ्या पहिल्या कादम्बरीचं शीर्षक आहे “विसरलेल्या आडनावाचा”. त्यांत असं लिहिलं आहे, की कसा एक मुलगा खूपंच ‘बोर’ होत होता, तो हॉकी सेक्शनमधे स्वतःचं नाव नोंदवायला चालला होता, पण रस्त्यांत काही कैनेडियन्सने त्याच्यावर हल्ला केला, त्याला खूप मारलं, आणि तो आपली स्मरण शक्तिच गमावून बसला. शेवटी हा मुलगा आपल्या आजोबाला भेटतो आणि त्याची स्मरण शक्ति परत येते. व्लादिक, ज्याने “थण्डीच्या तयारी” नंतर आणखी काहींच लिहिलं नव्हतं, माझी गोष्ट वाचतो आणि मग आम्हीं दोघं बरोबर लिहूं लागतो.
मी तीन खण्डांची कादम्बरी “ इवान – शिकारी आजोबांचा नातू” सुरू करतो, आणि व्लादिक एक थ्रिलर - “सगळ्यांना असंच असायला पाहिजे”ची सुरुवात करतो. जेवढ्या वेळांत तो आपली कादम्बरी पूर्ण करतो, तेवढ्यांत मी फक्त माझी तीन खण्डांची कादम्बरीच नाहीं तर, एक छोटीशी कादम्बरी ‘गद्दार’ सुद्धां पूर्ण करतो. मग आम्हीं खूपदां “एम्फिबियन मैन”(भूजलचर मानव) नावाची फिल्म बघतो, आणि अचानक आमची ढीगभर पुस्तकं तयार होऊन जातांत. व्लादिकचं – “किरण-मानव”, आणि माझी - “वायु-मानव”, “चुम्बक-मानव” आणि “धातु-मानव”. किरण-मानव फक्त डोळ्यांनीच कोणच्याही वस्तुला जाळू शकतो. वायु-मानव, जर आपल्या नाकांत स्प्रिंग घालून शिंकला, तर मोट्ठं चक्रवाती वादळ आणू शकतो. चुम्बक-मानव सोन्याला आकर्षित करतो, आणि धातु मानव फक्त खूप शक्तिशाली आणि खूप चांगला आहे. आणि बदमाश लोकं ह्या सगळ्या मानवांचा आपल्या नीच कामांसाठी उपयोग करायचं ठरवतांत, पण, स्पष्टंच आहे, ते ह्यांत सफल नाही होत.
व्लादिकला आपल्या पुस्तकांमधे चित्र काढायला आवडतं, पण माझी ड्राइंग चांगली नाहीये; पण माझ्या नोटबुकच्या मुखपृष्ठावर नेहमी त्या पुस्तकाचे मूल्य, प्रकाशन वर्ष, प्रत संख्या आणि संक्षिप्त विवरण असतं. उदाहरणार्थ “दहा अविजित” ह्या कादंबरीचे संक्षिप्त विवरण असे आहे: “डाकू, समुद्री डाकू आणि इतर लोकांबद्दल कादम्बरी”. आणि माझ्या सगळे नॉवेल्स व्लादिकच्या नॉवेल्सपेक्षां मोठे आहेत. माझी सगळ्यांत छोटी कादम्बरी “सीक्रेट प्लेस” ब्याण्णव पानांची आहे, अनुक्रमणिका धरून, आणि व्लादिकचे नॉवेल्स पन्नास-पन्नास, चाळीस-चाळीस पानांचे आहेत. नॉवेल मोठं असणं माझ्यासाठी खूप जरूरी आहे आणि ते अनेक खण्डांमधे सुद्धां असायला पाहिजे, कारण तेव्हां मला अनुक्रमणिका लिहिणं फारंच चांगलं वाटतं. कधी-कधी तर मी अध्यायांचे शीर्षक आधीच ठरवतो, अनुक्रमणिका लिहून टाकतो आणि तेव्हांच कादम्बरीची सुरुवात करतो.
काही दिवसांनंतर व्लादिकने लिहिणे बंद केले, कारण की, “तसंही काहींच तर छापलं जाणार नाही”. मी व्लादिकला सांगतो की कधी न कधी तर छापतीलंच, आणि समजा नाहींच छापलं तरी आपल्या नोटबुक्संच एखाद्या पुस्तकापेक्षा कमी नाहीत, कारण त्याच्यावर किंमत आहे, प्रत-संख्या आहे, पण त्याला पटवूं शकलो नाही.
आता मी एकटाच “बेलोरशियन लोककथा” लिहितोय.