इण्डियन फ़िल्म्स 2.6
इण्डियन फ़िल्म्स 2.6


लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
समर कॉटेज.
सणाचे दिवस आणि नेहमीचे दिवस...
आजोबा शेडजवळ बाकावर बसलेत. त्यांच्या पुढे चकचकीत बाल्टी आहे, ज्यांत कांदे आणि माँस आहे. ते कबाब बनवंत आहे, आणि मी आणि व्लादिक कैम्प फायरमधे काड्या पेटवून अंगणांत हिंडतोय. ह्या आमच्या मशाली आहे. त्या पट्कन विजतांत आणि आम्हीं त्यांना पुन्हां पेटवायला कैम्प फायरजवळ जातो. त्या पुन्हां विजतांत आणि आम्हीं ठरवतो की चला ह्यांच्या तलवारीच बनवूं या. आम्हीं युद्धाला सुरुवात करतो. व्लादिक जिंकतो, कारण की त्याला जिंकायचं होतं, आणि मी, मला असं वाटतं की युद्ध सुरेख झालं पाहिजे.
आज विजय-दिवस (9 मे – अनु.) आहे, जो आम्हीं आमच्या समर कॉटेजमधे साजरा करतोय. तोन्या आजी घरांत वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स तयार करतेय. लवकरंच व्लादिकचे मम्मी-पप्पा येतील, आजोबचे मित्र इलीच आणि वीत्यापण येतील. वीत्या माझ्या आजोबाला ‘मेरे बाप’ म्हणतो. आणि निळ्या ‘ज़ापरोझेत्स’ कारमधे वास्या आजोबा आणि नीना आजी सुद्धां येतील, हे व्लादिकचे आजी-आजोबा आहेत.
वास्या आजोबा बरोबर फुटबॉल बद्दल बोलायला आवडतं, कारण की ते सुद्धां सगळे मैचेस बघतात; आणि मला ते अशासाठी पण आवडतांत, की जरी ते सत्तर वर्षांचे आहेत, तरीही नेहमी कडक इस्त्री केलेलाच सूट घालतात, मस्त टाय बांधतात, त्यांचे केस नेहमी चांगले सावरलेले असतात, आणि एक सुद्धां केस हलंत नाही, वास्या आजोबाने कोल्यांट्या मारल्या तरीही.
पण माझे आजोबा, जे पण मला खूप आवडतात, नेहमी कोणची तरी सलवार घालून असतात, एकंच, जुन्या काळातला खाकी रंगाचा शर्ट आणि हल्की पिवळी तेलकट टोपी घालून फिरतांत, जी त्यांनी मी व्हायच्या खूप आधी एका रिसॉर्टवर विकंत घेतली होती.
लोकांनी माझ्या आजोबांना लेदरच्या, कॉड्रोयच्या, लोकरीच्या टोप्या दिला होत्या, आणि इलीच तर नेहमी विचारतो, की ते “आपली इमेज केव्हां बदलणार आहेत”, पण अगदी पालथ्या घड्यावर पाणी! नवीन टोप्यांचा ढेर अलमारीत पडला आहे, पण आजोबा नेहमी आपल्या फेवरेट, हल्क्या पिवळ्या टोपीतंच असतात, आणि फक्त समर कॉटेजमधेच नाही, पण फ़ार्मेसीच्या गोडाउनमधे सुद्धां, जिथे ते डाइरेक्टर आहेत.
आमचा सण मस्तंच रंगलाय. इलीच मला पिटकुलं डुक्कर म्हणतो, आणि मला खूप राग येतो. आजोबा आणि वीत्या वाद घालताहेत, की वास्याच्या “ज़ापरोझेत्स”साठी टायर्स कोण आणणार आहे, कारण वास्या आजोबा कम्प्लेन्ट करत होते की टायर्स – केव्हांच गुळगुळीत झालेत. जेव्हांपासून आमच्या कम्पाऊण्डमधे एकाच दगडावर वास्या आजोबाचे तीन टायर्स पंक्चर झाले, माझे आजोबा प्रत्येक गोष्टीत त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतात.
आणि अचानक पाऊस पडूं लागतो. आम्हीं घरांत पळतो; खुर्च्या कमीच आहेत, पण कसे तरी बसतो आणि बिघडलेल्या टेलिफोनचा खेळ खेळू लागतो. इलीच सर्वांत जास्त हसतोय, पण स्पष्टंच दिसत होतं की त्याला खरंच मजा नाही येत आहे. ह्या उलट व्लादिकचे पप्पा, मुद्दामंच नाहीं हसंत, हे दाखवायला की – बिघडलेला टेलिफोन कित्ती मूर्खपणाचा खेळ आहे – उदाहरणार्थ, चैज़च्या लेखांच्या संग्रहापेक्षा, ज्याचे दोन खण्ड ते वर्षभरापासून दर महिन्याला विकत घेतात. मला असं वाटतं की सगळ्यांनी रात्री कॉटेजमधेच थांबावं. म्हणून पाऊस रात्रभर पडतंच राहिला पाहिजे, नाहीतर माहीत नाही, सगळे लोक थांबतील किंवा नाही.
पण लवकरंच सूर्य निघाला, आणि आम्ही आपापल्या घरी जाण्यासाठी निघालो. वास्या आजोबा मला “ज़ापरोझेत्स”मधे घरी सोडायला तयार झाले. जशीच ते स्पीड वाढवतात, मी सीटवरून पुढे वाकतो, आणि इंजिनच्या आवाजापेक्षाही मोठ्याने, अपेक्षेने विचारतो:
“वास्, आता तू कुठेतरी घुसवशील, हो नं?! (अरे, मी नुसतीच गंमत करतोय).
“छिः, तू, घाणेरडा यूसुफ़!” वास्या आजोबा फिसकारतात आणि गाडीचा वेग कमी करतांत.
हे ‘यूसुफ़’ कशाला – फक्त देवालाच माहीत.
सणाचे दिवस सोडले तर फक्त मी आणि तान्या आजीच समर कॉटेजकडे जातो. कधी-कधी व्लादिक पण आमच्या बरोबर येतो, पण आजकाल त्याला एक मित्र सापडला आहे – ल्योशा सकलोव, ज्याची तो इतकी काळजी घेतो, की मला पण दाखवायला लाजतो. ठीकंच आहे, जर मी सांगून टाकलं की आम्हीं खिडक्यांना चिकटवायच्या कागदावर कशा प्रकारे फिल्म्स बनवल्या होत्या, तर?
तर, मी आणि तोन्या टेकडीवर चढ़तो, आणि सतत घाण वास सोडंत असलेल्या नदीच्या वरचा पुल पार करतो, आणि तिथून समर कॉटेज फक्त दोन हात दूर आहे. बैक-पैक्स काढल्या-काढल्या मी शेजारच्या आन्ना बिल्याएवा, विक्टर पेत्रोविच आणि कुबड्या आन्ना मिखाइलोव्नाकडे धाव घेतो.
आन्ना बिल्याएवा मला ‘ससा’ म्हणते आणि माझ्याशी बोलत असताना सतत पुचकारंत असते. आश्चर्य म्हणजे, मला तीच सगळ्यांत जास्त आवडते. पण आन्ना बिल्याएवाच्या डोक्यावर नेहमी रुमाल बांधलेला असतो, ती जशी सतत धुळीने माखलेली असते, आणि तिचं पुचकारणं खराब नाहीं वाटंत.
विक्टर पेत्रोविच माझ्याकडे कमी लक्ष देतात, पण त्यांचं घर खूप मोट्ठं आणि सुरेख आहे आणि दारासमोर गारगोट्यांचा ओटा आहे. ह्या गारगोट्यांना घासून मी ठिणग्या काढतो. आणि जर जास्त वेळ घासलं तर गारगोट्यांमधून जळक्या कोंबडीचा वास सुटतो. कधी-कधी असंही होतं की मी हट्ट करून तोन्या आजीला पण गारगोट्यांचा वास घ्यायला लावतो. एकदा तोन्या आजी माझ्या जवळपास नव्हती, म्हणून मी कुबड्या आन्ना मिखाइलोव्नाला गारगोट्यांचा वास घ्यायला सांगितला. तेव्हांपासून ती जोर देऊन सांगते आहे, की आम्ही आमचा रास्बेरीचा वेल कुठे दुसरीकडे लावावा, कारण तो तिच्या अंगणांत पसरंत आहे.
आणि, काहींच दिवसांपूर्वी आमचं गेट उघडतं आणि बुदुलाय (प्रसिद्ध फिल्म ‘जिप्सी’चा हीरो) आत येतो. “जिप्सी”तर मला काही इण्डियन फिल्म्सपेक्षांही जास्त आवडते, आणि इथे – अगदी खरोखरंचा बुदुलाय, दाढीवाला, किंचित पांढरे केस असलेला, मसल्स-मैन, आणि माहीत नाही कसा, पण तो तान्या आजीला ओळखतो!
“अन्तोनीना इवानोव्ना!” तो ओरडतो.
आजी बाहर येते, आणि सांगते की हा ईल्या अंद्रेयेविच आहे, ज्याच्याबरोबर ती एके काळी काम करायची. पण माझ्यासाठीतर तो – फक्त अंकल बुदुलाय आहे.
त्याला आवडतं की मी त्याला ह्या नावाने बोलावतो. मल कळतं की त्याची समर कॉटेज आमच्या कॉटेजच्या अगदी जवळंच आहे, आणि मी आता सम्पूर्ण दिवस तिथेच घालवतो. बुदुलायकडे मोट्ठाले एपल्स आहेत, गुलाबी रंगाचे, आणि आता हा माझा फेवरेट ब्राण्ड झालेला आहे, आणि त्याच्या घराच्या भिंतींवर आमच्या ड्रामा थियेटरच्या जुन्या ‘शो’चे – “हाजी नसरुद्दीन परत येतो”चे पोस्टर्स लागले आहेत, आणि बुदुलाय मला सुद्धां आमच्या घराच्या भिंतींवर लावायला काही पोस्टर्स देतो. त्याला एक मुलगापण आहे – अंद्रेइ, त्याच्याबरोबर मी ग्रीन हाउस बनवतो, म्हणजे, तो आणि बुदुलाय बनवतात, आणि मी जवळंच फिरतोय, आणि अंद्रेइला ड्रममधे बॉल फेकायला बोलावतो. थोडा प्रयत्न केल्यावर मी बॉल ड्रम मधे टाकूनंच देतो, आणि आम्हीं मोट्ठी, खडबडीत, हिरवी बॉल पाण्याने भरलेल्या मोट्ठ्या, लोखंडाच्या ड्रम मधे फेकूं लागतो. मग जेवायला वाढतात. मला भूक नाहीये, पण जेव्हां मी बघितलं की बुदुलायनी कसे चाकूने डब्बा-बंद पदार्थ उघडले आणि चाकूनेच त्यांना हलवून त्यांत ब्रेड बुडवूं लागला, तेव्हां मला कळलं की मी फुकटंच आपल्या वाट्याच्या जेवणाला नाहीं म्हटलंय, आणि मी म्हणतो, “द्या”. बुदुलायने डब्यांतून माझ्यासाठी काही पदार्थ काढण्यासाठी एक बाउल घेतला, पण माझ्यासाठीतर बाऊलपेक्षां सरंळ डब्ब्यातूनच खाणं जास्त महत्वपूर्ण आहे, आणि मी विचारतो, “मी सुद्धां असंच सरंळ डब्यांतून खाऊं शकतो कां.” बुदुलाय मंदस्मित करतो, खास माझ्यासाठी एक डबा उघडतो आणि माझ्या हातांत चाकू देतो, त्याला कळत होतं की फोर्कने मला जेवण तेवढं स्वादिष्ट नाही वाटणार.
आणि म्हणतांत, की जो चाकूने खातो – तो दुष्ट असतो. बकवास. बुदुलाय, कदाचित, बहुतेक वेळां चाकूनेच खातो, आणि त्याच्यापेक्षां चांगला माणूस मी नाही बघितला.