Charumati Ramdas

Others

3  

Charumati Ramdas

Others

इण्डियन फ़िल्म्स 2.4

इण्डियन फ़िल्म्स 2.4

3 mins
347


लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास



मी आणि व्लादिक...

फ़िल्म्स बनवतो......



लवकरंच मला असं वाटूं लागल, की फक्त इण्डियन फिल्म्स बघणंच पुरेसं नाहीये. माझी इच्छा होती की मी स्वतः त्यांना बनवावं, अशा प्रकारे, की मी त्यांत मुख्य भूमिका करावी, स्वतःच डाइरेक्टर, स्क्रिप्ट राइटर, आणि गायकसुद्धां असावं. मी मूवी-कैमेरा घेण्यासाठी पैसे जमा करूं लागतो, ह्या बद्दल विचार करणं मात्र मला जमंत नाहीये की शूटिंग कसे होईल आणि, मुख्य गोष्ट, आमच्या फिल्म्स बघेल कोण. जसा-जसा मी विचार करंत होतो, माझी भीति वाढत होती आणि मी निराश होऊं लागलो. पण अचानक व्लादिक मला फिल्म्स बनवायची एक मस्त ट्रिक सांगतो, ज्यांत काही कैमेरा-बिमेरा नाहीं लागंत. फक्त तुम्हांला ड्राइंग मात्र यायला हवं.

तो कागदाच्या एका तुकड्यावर एक माणूस काढतो, दुसरा कागद घेऊन – तसांच माणूस, हात वर केलेला. पहिला कागद वर ठेवतो, त्याच्याखाली दुसरा कागद ठेवतो आणि पट्कन वरचा कागद सरकवतो. माणूस हात उचलतो आहे! काय गंमत आहे! मी डिपार्टमेन्टल स्टोअरला पळतो आणि थंडीच्या दिवसांत खिडक्यांवर चिकटवायच्या कागदाचे खूप सारे रोल्स घेऊन येतो. ही आमची रील आहे. उभ्या डैशेसनी मी फ्रेम्सचे चिह्न काढतो आणि ड्राइंग करूं लागतो.

मन लावून चित्र काढणं मला जमंत नाही, म्हणून “बदला” नावाच्या फिल्मची दुसरी सिरीज़ येता-येता माझे सगळे हीरोज़ एक सारखे दिसूं लागते, फक्त कपड्यांच्या रंगानेच त्यांना ओळखू शकतो. खलनायकांना मी मोठं दाखवलं आहे आणि त्यांचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला दाखवला आहे. सुरकुत्या दोन जाड्या-जाड्या रेषांनी काढल्या आहेत, म्हणजे त्यांना ओळखायला त्रास व्हायला नको.

संध्याकाळपर्यंत फिल्म तयार झाली. मी एक डब्याला दोन उभी भोकं करतो, त्यांत आपली फिल्म “बदला”ची पहिली आणि एकुलती एक कॉपी फिट करतो, आणि व्लादिक माझा पहिला, एकुलता एक दर्शक होतो. जर कागदाच्या रीलला व्यवस्थित सरकवलं तर डब्ब्याच्या स्क्रीनच्या भागांत चित्रांमधले लोकं चालू लागतात, ढिशूम-ढिशूम करूं लागतात, आणि डान्स करू लागतात. असो, फिल्ममधे आवाज़ मला स्वतःलाच द्यावा लागतोय.

फिल्म शो झाल्यावर व्लादिकसुद्धां थंडीच्या दिवसांत खिडक्यांवर चिकटवायचा कागद विकत घेतो आणि काही दिवसांत त्याच्या पहिल्या फिल्म “बवण्डर”चा प्रीमियम होतो.

हळू-हळू हम आम्हीं निर्माणाच्या कामांत मग्न होऊन जातो. व्लादिक धारावाहिक फिल्म “12 निन्जास” बनवतो, जी “बवण्डर” सारखीच कुंग-फूच्या दोन प्राचीन घराण्यांमधे असलेल्या वैमनस्याची गोष्ट आहे. आपल्या फिल्ममधे तो एक नवीन वस्तू जोडतो: हीरोज़चे डायलॉग्स रीलवर लिहित, म्हणजे प्रत्येक फ्रेममधले त्यांचे डायलॉग्स लक्षांत ठेवण्याची गरज नाहीं.

जो पर्यंत व्लादिक “12- निन्जास” बनवंत होता ( ही फिल्म बनवायला त्याला जवळ-जवळ एक महिना लागला), मी एकदम माझ्या खूप फिल्म्स रिलीज़ करून टाकल्या: “वेगळ्या नावाने”, डान्सिंग रेनबो”, “जनतेच्या भलाई साठी”, “खतरनाक आज़ार, “अपूरणीय क्षति”, “गावाचा रक्षक”, “आगमन” आणि “मास्टर दीनानाथचे संगीत”. दर्शक नसल्याची समस्या पण हळू-हळू कमी होत होती. व्लादिकचे मम्मी पप्पा आणि आमचे सगळे आजी-आजोबा बिना तक्रार आमच्या फिल्म्स बघंत होते.

पण फिल्म्स दाखवतां-दाखवतां मला कळलं की जेव्हां रील मधेच तुटते, तेव्हां मला फार आनंद होतो, कारण की तेव्हां अगदी खरोखरच्या थियेटरसारखं वाटतं. रील आपणहून नाही फाटंत, आणि मी दर मिनिटाला दुर्घटनांचे चित्र दाखवतांना तिला फाडतो आणि वरून कुरकुर करतो की वाइट कॉपी आणली आहे.

पण ह्याचा परिणाम असा झाला की लोकांनी आमच्या फिल्म्स बघणं बंदंच केलं, आणि मी सुद्धां फिल्म्ससाठी ड्राइंग्स काढता-काढता बोर झालोय.

काहीही म्हणा, खरोखरच्या इण्डियन फिल्म्स जास्त चांगल्या असतात!

हरकत नाही. काही दिवसांत मी आणखी काही करेन!


Rate this content
Log in