Charumati Ramdas

Others

2  

Charumati Ramdas

Others

इण्डियन फ़िल्म्स 2.2

इण्डियन फ़िल्म्स 2.2

2 mins
531


लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर: आ. चारुमति रामदास


औषधी पाल्यांचा संग्रह...


मी माझ्या भावाबरोबर तुखाचेव्स्की भागांतल्या पाचव्या नंबरच्या फार्मेसी जवळ एका बेंचवर बसलोय. बाजूला दोन बैग्स पडल्या आहेत. त्यांत घडी केलेल्या मोठ्या-मोठ्या पिशव्या, मोठा किचनचा चाकू (हे व्लादिकच्या बैगमधे, आणि माझ्या बैग मधे – कोयता), थर्मस आणि सैण्डविचेज़ आहेत. आम्ही बससाठी थांबलो, कारण की आम्हांला शहराच्या बाहेर जाऊन आग्याची पानं गोळा करायचीत.

जवळंच जुने जैकेट्स आणि डोक्यावर रुमाल बांधून फार्मासिस्ट (औषध निर्माता) मुली उभ्या होत्या आणि हसंत होत्या. (औषधीय जडी-बुट्या तयार करण्याची जवाबदारी त्यांची असते). लवकरंच बस येते आणि इंजन सुरू करतांना ड्राइवर वीत्या म्हणतो: “राचेव्काला चाललोय”. बसमधे ह्या फार्मासिस्ट मुली आणि एक हात वाले आजोबा ( त्यांना एकंच हात असला तरी ते माझ्यापेक्षां दुप्पट आग्याची पानं गोळा करतांत) म्हणतील की आम्हीं कित्ती चांगली मुलं आहोत, की आपल्या पिक्चर साठी आणि आइस्क्रीमसाठी पैसे स्वतःच जमवतो. काय माहीत कां, पण त्यांना असं कां वाटतं की पिक्चर आणि आइस्क्रीमशिवाय आम्हांला जीवनांत आणखी कशाचीही गरजंच नाहीये. त्यांना सांगायलांच हवं की मी कसा चांगल्या ग्रेडने पास झालो आणि कसं मला पंचवीस रूबल्सचं बक्षिस मिळालं होतं, जे मी त्याच दिवशी ऑनलाइन गेम ‘शीपा’ मधे हरलो सुद्धां. जर कुणाला माहीत नसेल, तर सांगतो की ‘शीपा’ पत्त्यांच्या एक गेम असतो. पण मी काहीचं नाहीं म्हणंत, कारण, जर कुणाला कळलं की मी पैसे लावून पत्ते खेळतो, तर...म्हणजे, काही सुद्धां चांगलं झालं नसतं.

उद्या, जेव्हां आम्हीं पुन्हां पाच नम्बरच्या फार्मेसीजवळ बसची वाट बघत असूं (आणि तेव्हां माझ्या बैगमधे कोयत्याच्या ऐवजी मोठा चाकू पडलेला असेल, कारण की कोयत्याने आग्याची पानं तोडायला त्रास होतो, तसं ती मस्तंच कापली जातात), तेव्हां एकदम पाऊस पडू लागेल. पावसांत तर कोणी औषधी पाला गोळा करायला जात नाही, आणि आनंदाने घरी परत जाऊं शकू आणि तोन्या आजीसोबत चहा बरोबर सैण्डविच खाऊ. व्लादिक नव्याने वाचलेल्या फ़ैन्टेसीच्या पुस्तकाबद्दल सांगेल आणि मला आणि तोन्याला काहीच कळणार नाही आणि आम्ही नुसते हसतंच राहू, तेव्हां व्लादिकला खूप राग येईल. शेवटी आमच्यांत “डोईफोड नाकतोडे” ह्या फिल्ममुळे समेट झाला, जी, असं कळलं की ‘स्मेना’ थियेटरमधे दाखवतांत आहे. त्यांत असा कमालीचा कुंग-फू आहे! आणि हीरोचं नाव सुद्धां ‘चाय’ असं आहे. व्लादिकंच मला ही फिल्म दाखवायला घेऊन गेला होता, आणि ही एक अशी फिल्म होती, जिला आम्हीं कमीत कमी तीन-चार वेळां नक्कीच बघायचो. तर, आम्हीं ‘स्मेना’ला जातो, मग, जेव्हां “डोईफोड नाकतोडे” ‘जुबिली’ थियेटरमधे दाखवतील, - तेव्हां आम्हीं ‘जुबिली’ला जाऊं, आणि पुन्हां माझ्या डोक्यांत एक नवा आइडिया येईल, की काय केलं पाहिजे: आपणंच एक्वेरियम्स बनवायचेत आणि डज़न्सने त्यांना विकायचे. शाळेच्या ग्रीन हाऊस मधून आम्हीं थोडेसे काच आणू, एपोक्साइड-ग्लू विकत घेऊं, ज्याने काचा चिकटवतां येतील, आणी इतकी साधारणशी वस्तू बनवूं, जी बाजारांत अजून आलीच नाहीये. पण आपली वस्तू आम्हीं विकायला नाही घेऊन जाणार.


Rate this content
Log in