Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Charumati Ramdas

Others


2  

Charumati Ramdas

Others


इण्डियन फ़िल्म्स 2.10

इण्डियन फ़िल्म्स 2.10

4 mins 514 4 mins 514

लेखक : सिर्गेइ पिरिल्यायेव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


माझे आजोबा मोत्या, पर्तोस आणि पालनहार.... 


मी आणि तोन्या आजी हळू-हळू आपल्या मरीना रास्कोवाया स्ट्रीटवर परत येतोय.

जेव्हां आम्हीं आमच्या पोर्चपर्यंत पोहोचलो, तेव्हां मी म्हटलं, “चल, पर्तोसची वाट बघूया.”

जेव्हां पासून टी.वी.वर “डी’अर्तन्यान एण्ड थ्री मस्केटीर्स” ही फिल्म दाखवली होती, मी आजोबाला ह्याच नावाने बोलावूं लागलो. आजोबाचा चेहरा अगदी पर्तोस सारखाच आहे आणि जर त्यावर बाजूला एक पोनीटेल बांधली, तर बिल्कुल दुसरा पर्तोसंच वाटेल! आणि तसंही आजोबांना ह्या नावाने बोलावलेलं आवडतं. त्यांना माहीत आहे की ह्या फिल्ममधे मला पर्तोस कित्ती आवडला होता.

“ठीक आहे, पाहूंया वाट,” तोन्याने उत्तर दिलं. “पण, फक्त आपल्या आजोबांची, पर्तोसची नाहीं.”

“अरे, ते पर्तोसंच तर आहेत!”

“त्यांना ह्या नावाने बोलवायची काही गरज नाहीये,” आजी शांतपणे बोलतेय, पण ह्या शांतपणामुळेच कळतं की तिला किती वाईट वाटतंय – तिला वाटतं की मी आजोबाला चिडवतोय, खरं म्हणजे चिडवण्याबद्दल मी विचारसुद्धां करत नाहीं. “ते काल मला सांगत होते की इलीच आला होता, त्यांचा खूप जुना मित्र, आणि तू सरळ इलीचच्या समोरंच आजोबाला पर्तोस म्हटलं...आजोबा एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, इतक्या लोकांना ओळखतात...आणि ते आपले पालनहार सुद्धा आहेत, पर्तोस नाही.”

“हे पालनहार म्हणजे काय असतं?” मी विचारतो.

“ते आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. मी ती ‘सर्कस’ कार तुझ्यासाठी विकत घेतली. नऊ रूबल्सची आहे, आणि मला पैसे कोणी दिले, काय वाटतं, आजोबाने नाही, तर कोणी दिले?”

आणि तेवढ्यांत आजोबा दिसतांत. जुना कत्थई सूट घातलेले, जैकेट उघडं आहे, कारण पोटावर बसंत नसेल; डोक्यावर फिक्कट पिवळी कैप नव्हती, आणि आजोबांचे उरले-सुरले भुरे केस हवेत उडंत होते; घाणेरडे, कदाचित सूटापेक्षांही जास्त जुने जोडे घातलेले आजोबा येत आहेत; चेहरा हसरा (त्यांने दुरूनंच मला आणि आजीला बघितलं होतं), ते बहुधा, जवळ-जवळ सगळ्याच लोकांना बघून, जे ह्यावेळी कम्पाऊण्डमधे आहेत आणि आजोबाला नमस्कार करताहेत, मंद मंद हसताहेत.

आणि मला अचानक इतका आनंद होतो, की माझे आजोबा येताहेत, आणि आता आम्हीं घरी जाणार, आणि, कदाचित व्लादिक येईल, आणि आजोबा आमच्याबरोबर पत्त्यांचा खेळ ‘झब्बू’ खेळतील! म्हणजे असं, की मी सम्पूर्ण कम्पाऊण्डमधे पळत सुटतो आणि जोराने ओरडतो:

“आ-जो-बा!!! पा-आ-लन-हार!!! पा-आ-आ-लनहार!!!!”

कम्पाऊण्डमधे असलेले सगळे लोकं वळून बघतांत; मी उडी मारून आजोबांच्या खांद्यावर चढून जातो, आणि ते फक्त येवढंच पुन्हां पुन्हां म्हणतांत: “अरे, हल्ला कां करतोस? लोकं आहेत! लोकं आहेत! कां ओरडतोयस?!” (आजोबा, माहीत नाही कां, “हल्ला कां करतोयस”च म्हणतात, ते “किंचाळतो” किंवा डरकाळ्या फोडतो” सुद्धां म्हणू शकतांत.)

मग, जेव्हां आम्हीं जीना चढतो, तेव्हां आजी आजोबाला समजावते, की तिनेच मला असं सांगितलंय की आजोबा पालनहार आहेत, पर्तोस नाहींत, पण आजोबा आपल्यांच स्टाइलमधे क्वैक-क्वैक करतांत, की “आजीला काही काम-धाम नाहीये”.

आणि सकाळी तर, आह सकाळी! शेवटी ते घडतंच, ज्याची मी केव्हांपासून वाट बघतोय, म्हणजे, ज्याचं खूप आधी आजोबानी प्रॉमिस केलं होतं.

आजोबा सकाळी सहा वाजता मला उठवतांत आणि विचारतांत की त्यांच्या बरोबर ऑफ़िसला यायचंय कां, किंवा अजून काही वेळ झोपायचंय? अफकोर्स, मला जायचंच आहे, तसंही, जेव्हां आजोबा ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतांत, तेव्हां मी उठूनंच जातो, ते मला आपल्या बरोबर नेतील किंवा नाहीं ह्याचा विचार न करतां. आणि आता तर – ओहो! मी बिछन्यातून उठंत नाहीं, उडीच मारतो आणि तीनंच मिनिटांत किचनमधे बसून जातो, कारण की मला आजोबाला दाखवायचं आहे की जेव्हां वेळ येईल आणि मला रोज ऑफिसमधे जावं लागेल, तेव्हां मी व्यवस्थित सगळं करेन, काहीच गडबड न करता.

आमच्या लोकल स्मोलेन्स्क रेडिओचे प्रोग्राम लागोपाठ चालतंच असतांत, जसं “धान्य पर्याप्त होईल”, “मुलं पूर्वीपेक्षां जास्त चांगल्या प्रकारे विश्रांति घेतांत”;

फ्राय पैनवर लोणी तडतडतंय आणि इकडे तिकडे उडतंय; फ्रिजमधून सगळ्या वस्तू बाहेर काढल्या आहेत, कारण आजीला वाटतं की आम्हीं कदाचित आधी नाही म्हटलेला एखादा पदार्थसुद्धां खाऊं शकतो (जरी तिला माहीत असलं, की आमची 13नंबरची बस पंधरा मिनिटांनी सुटणार आहे), हे मी आणि आजोबा ब्रेकफास्ट करतोय. मला आश्चर्य वाटतं की आजी ह्या फ्राय पैनवर सगळंच कसं करूं शकते, जेव्हां तेथून चारीकडे आणि तिच्या हातांवरसुद्धां गरम लोणी उडतंय, आणि ती असं दाखवंतसुद्धां नाही की तिला भीति वाटतेय, किंवा दुखतंय, आणि मग मी फ्राइड अण्डा खातो, बिल्कुल आजोबांसारखाच – जसे ते अण्ड्याचा पिवळा भाग पसरतात, आणि नंतर ब्लैक-ब्रेडच्या तुकड्याने प्लेटमधे एकत्र करतांत.

आणि बसमधे, आणि ट्राममधे आजोबा आपल्या परिचित लोकांशी भेटतांना माझ्याकडे बोट दाखवून सगळ्यांना सांगतात: “हा आमचा लहाना...”

एकीकडे तर मला फार्मास्यूटिकल गोडाउन खूप घाणेरडं, अस्तव्यस्त आणि जर्जर वाटतं, पण दुसरीकडे असंही वाटतं की हीच अस्ताव्यस्तता, इकडे-तिकडे विखुरलेल्या इंजेक्शनच्या लहान-लहान बाटल्या, बोळे, कागद आणि सगळ्या प्रकारचा कचरा, ह्यामुळेंच तुम्ही विचार करूं शकतां की फार्म्यास्यूटिकल-गोडाउनमधे गंभीर प्रकाराचं काम होत असतं...

काही जरूरी फोन केल्यावर, आजोबा मला आपल्याबरोबर नेतात, हे बघायचं असतं की ट्रक्स व्यवस्थितपणे चालले तर आहेत नं. मजूर कोण्या इवानची वाट पहाताहेत, जो असल्याशिवाय काम सुरूं नाहीं करता येत, आणि जेव्हां आजोबाला कळतं की इवान अजून आलेला नाहीये, ते आपल्या हाताखालच्या लोकांना समजावतांत की हा इवान खरं म्हणजे कोण आहे. ते अश्या शब्दांमधे समजावतांत, ज्यांची मला त्यांच्याकडून जरा सुद्धां अपेक्षा नव्हती. पण पहिली गोष्टं, मजूर तयार होतात, आणि दुसरी, मला स्वतःला सुद्धां आवडतं की माझे आजोबा असे शब्दसुद्धां वापरू शकतात. मी तर, खरं म्हणजे, खूप आधीपासून त्यांना ओळखतो.

आणि शेवटी, जेव्हां फार्म्यास्यूटिकल-गोडाउनमधे बसल्या-बसल्या मी थकून जातो, तेव्हां ह्या गोडाउनचे डाइरेक्टर, म्हणजे माझे आजोबा, मला ट्राममधे बसवून घरी पाठवतांत. त्यांत काय आहे? “जुबिली” स्टॉपपर्यंत जाईन, आणि तेथून पाच मिनिट चालंत जाईन – बस, मी घरी पोहोचून जाईन...


Rate this content
Log in