इण्डियन फ़िल्म्स - 2.1
इण्डियन फ़िल्म्स - 2.1


लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषातर : आ. चारुमति रामदास
(माझ्या बद्दल आणि व्लादिकबद्दल, नातेवाइकांबद्दल आणि मित्रांबद्दल निघून गेलेल्या, चांगल्या काळाबद्दल)
अगदी-अगदी सुरुवातीपासून...
तो फोटो, ज्यांत सात महिन्याच्या मला तोन्या आजी वर छताकडे उचलते आहे, आणि मी समोर, छातीवर तीन चमचमते तारे असलेला पांढरा ‘ओवरऑल’ घातला आहे, मामाचे मित्र, हैनरी आरोनोविचने घेतला होता. आजीने सांगितलं होतं की तो स्वतःच त्यादिवशी माझा फोटो काढायला आलेला होता. आणि कित्येक वर्षांनंतर हैनरी आरोनोविचने मला तीन टैन्कर्स बद्दल गाणं म्हणूंन दाखवलं होतं. गाणं मला इतकं आवडलं होतं, की नंतर मी ते पाठ करून टाकलं आणि गायलोसुद्धां होतो. मी ‘तीन टैन्कर्स’ बद्दल गायचो, एरोड्रोमचं गाणं म्हणायचो, ज्यांत “कुणासाठी तर ही फक्त उड्डाणाची वेळ आहे, पण खरं म्हणजे वेळ आहे प्रेमाचा निरोप घेण्याची,” पण विशेषकरून मी – “जर मित्र निघाला अचानक...” म्हणायचो.
आजी खूप मजा घेत-घेत सांगते की मी कसा तिच्या मिलिट्री यूनिटच्या ऑफ़िसमधे गेलो होतो, टाइपिस्ट मुली जिथे बसतांत, त्या खोलीत गेलो, आणि जोराने गाऊं लागलो: “जर मित्-त्र निघाला अच्-चानक...”
आजीला माझ्यामुळे खूप अवघडल्या सारखं वाटंत होतं – मी इतक्या ज़ोराने आणि इतकं अगदी बरोब्बर गात होतो. म्हणून दुसरा स्टैंज़ा सुरू करतांच तिने आपल्या सहकारी टाइपिस्ट स्पिरीनाकडे बघून, जी खोटंखोटं हसंत होती, म्हटलं: “सिर्योझेन्का, तू पूर्ण गाणं म्हटलं नं!” मी उत्तर दिलं: “पूर्ण कसं म्हटलं, जेव्हां अजून दोन स्टैंज़े शिल्लक आहेत?!” आणि मी गात राहिलो:
“जर तर्-रूण पहा-आडावर – म्हणत नाही – आह, घाबरून अचानक आणि खाली...”आणि असाच शेवटपर्यंत गातंच राहिलो. काही हरकत नाही, स्पिरीना सहन करत होती आणि मंद-मंद हसत होती. आता ती कुठे असेल?
आजीचं ऑफिस सुटल्यावर आम्हीं बरेचदां बेकरीत जायचो, जी आमच्यांच बिल्डिंगमधे होती. बेकरीतले सगळे लोक आम्हांला ओळखायचे – तिथे पण मी, स्वाभाविकंच आहे, धिंगाणा करंत होतो, पण सेल्सगर्ल्सला मी खूप आवडायचो. आत घुसल्याबरोबर, मी ‘जातो, ब-अ-घ-तो, सगळं ठी-ईक आहे नं!’ असं म्हणंत सरळ तिकडे गेलो, जिथे ब्रेड ठेवलेली असते, म्हणजे ग्राहकांना तेथे जाण्यांची बंदी आहे. तेथून बाहेर निघालो तेव्हां माझ्या अंगावर डोक्यापासून ते पायांपर्यंत टोस्ट आणि रिंगसारखी ब्रेड लटकंत होती, मी रिपोर्ट दिली: “सगळं ठी-ईक आहे!” फक्त माझ्या तोन्या आजीला ठीक नव्हतं वाटंत, कारण तिला इतके सगळे टोस्ट्स घ्यायचेच नव्हते. सेल्सगर्ल्स हसत होत्या आणि म्हणंत होत्या की त्या मला हे सगळे टोस्ट्स आणि रिंग-ब्रेड विकायला तयार आहेत. पण मला रिंग-ब्रेड घ्यायचीच नव्हती, मला तर फक्त ब-अ-घायचं होतं, की सगळं ठी-ईक आहे किंवा नाही,” आणि मी माझ्या अंगावरून सगळ्या रिंग-ब्रेड्स काढून टाकल्या, तोन्या आजीला त्यांचे पैसे नाहीं द्यावे लागले.