इण्डियन फ़िल्म्स - 1.3
इण्डियन फ़िल्म्स - 1.3


लेखक: सिर्गेइ पिरिल्यायेव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
जेव्हां मी खूपंच लहान होतो, तेव्हां मला वेरोनिका आवडायची. ती बाजूच्या बिल्डिंगमधे राहायची आणि साफ़-सफ़ाई करणारी दाशा आण्टी मला त्या प्रवेशद्वारांत घुसूंच नव्हती देत, कारण की मी सूर्यफुलाच्या बिया फरशीवर फेकल्या होत्या. मग मम्माने दाशा आण्टीला वाशिंग पावडरचा एक डबा दिला, आणि दाशा आण्टी मला आंत येऊं द्यायला लागली.
वेरोनिकाचे केसं काळे-भोर आणि डोळे हिरवे होते. आम्हीं दोघं गैस स्टेशनवर हिंडायचो आणि टी.वी. बघायचो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि सगळे आमचा हेवा करायचे, विशेषकरून आमच्या कम्पाऊण्डचा एक मुलगा ल्योशा रास्पोपव. मग मी शाळेत जाऊं लागलो, आता हिंडायला वेळ फारंच कमी असायचां, आणि मग वेरोनिका एका वेगळ्या शहरांत चालली गेली. पण, जेव्हां मी मोट्ठा होईन, तेव्हां तिला जरूर शोधून काढीन आणि आम्हीं लग्न करूं.
आणि मी आपला निबंध टीचरला दिला.
आणि, आमच्या वर्गांत होती एक लीज़ा स्पिरिदोनोवा. ती पण सुरेखंच होती, पण मला ती बिल्कुल नाही आवडांयची, कारण तिला बघतांच कळायचं की ती दुष्ट आहे. तर, ‘ब्रेक’मधे लीज़ा स्पिरिदोनोवा टीचरच्या टेबलाशी गेली, माझा निबंध वाचला आणि माझ्यावर हुकूम सोडूं लागली की कुठे-कुठे स्वल्प विराम असायला पाहिजे आणि कुठे नसायला पाहिजे. हे, ती कदाचित अशासाठी करंत होती कारण की तिला वाटायचे की जगातल्या सगळ्या माणसांनी तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, पण माझांतर जणु चेहरांच सांगायचा की मला ती बिल्कुल आवडंत नाही. माझ्या अज्ञानासाठी मला 3 मार्क्स मिळाले, पण लीज़ा स्पिरिदोनोवाचं येवढ्यांनेसुद्धां समाधान झालं नाही. असं नाहीये की मला फक्त स्वल्प विरामांसाठीच ती आवडंत नाही!
आता मी अकरा वर्षाचा आहे. हे नोट्स, जे तुम्हीं वाचलेत, मी माझ्या एका मित्राला दाखवले, आणि तो म्हणाला, की हे नक्कीच इंटरेस्टिंग आहेत, पण खूपच संक्षिप्त आहेत. म्हणजे, मी खूप कमी-कमी लिहिलंय. पण, मी तर तेवढंच लिहूं शकतो नं, जे खरोखरंच घडलं होतं, म्हणून मी विचारमग्न झालो: अजून पर्यंततर काही फार मनोरंजक घटना घडल्या नाहीयेत, म्हणजे, मला अजून माहीत नाहीये की कशाबद्दल लिहायचे. पण मित्राने सांगितलं:
“तू भविष्यांत काय होईल, ह्या बद्दल लिही.”
“असं कसं?” सुरुवातीलातर मला समजलंच नाही.
“बघ, जसं आता तू असं लिहितोस,” मित्राने मला समजावलं (त्याचं नाव आर्तेम होतं), - “जेव्हां मी इतक्या-इतक्या वर्षांचा होतो, तेहां असं-असं झालं होतं. पण आतां असं लिही: जेव्हां मी इतक्या-इतक्या वर्षाचा होईन...आणि कल्पना कर की काय होऊं शकतं.”
मी लगेच ही आयडिया पकडली आणि लिहायला बसलो.
अशा प्रकारे ह्या छोट्याशा लघु-उपन्यासाचा दुसरा भाग अवतरला, ज्याचे शीर्षक आहे