Charumati Ramdas

Children

3  

Charumati Ramdas

Children

इण्डियन फ़िल्म्स - 1.2

इण्डियन फ़िल्म्स - 1.2

4 mins
580


लेखक : सिर्गेइ पिरिल्याएव

भाषांतर : आ. चारुमति रामदास


जेव्हा मी सात वर्षाचा झालो, तेव्हा शाळेत जाऊ लागलो. आमच्या टीचरचे नाव होते रीमा सिर्गेयेव्ना. तर, पहिल्याच दिवशी, पहिल्याच वर्गात, ती म्हणाली: “आपला क्लास – एक जहाज आहे. ह्या जहाजात बसून आपण ज्ञान-सागरात निघालोय. कोणाला कॅप्टन व्हायची इच्छा आहे का?”

आणि ती टेबलावर ठेवलेल्या कागदांना असे आलटू-पालटू लागली, जसं की तिला नक्की माहीत असावं, की कोणाचीच जहाजाचा कॅप्टन व्हायची इच्छा नाहीय. पण मला तर नेहमीच कॅप्टन व्हावंसं वाटायचं. ज्ञानाच्या जहाजाचा तर नाही, पण आणखी कोणत्याही जहाजाचा कॅप्टन व्हायला मला आवडलं असतं, पण, जर फक्त हेच जहाज समोर आहे तर काय करणार.

“मला व्हायचंय कॅप्टन!” मी म्हटलं.

रीमा सिर्गेयेव्नाने एकदम विचारलं: “पण, तू विविध प्रकारच्या अडथळ्यांच्या आणि शंका-कुशंकांच्या लाटांना तोंड देत जहाजाला एका विशिष्ट दिशेकडे नेऊ शकतोस का? कारण ज्ञान-सागर – एक गंभीर, भयंकर गोष्ट आहे!’               

मला कळत होतं की त्यांच्या मते, मी फक्त हेच नाही, तर काहीही करण्याच्या लायकीचा नाही. ती बोलत होती आणि आपल्या ओठांवर लिपस्टिक फिरवत होती. तिथे काहीतरी चिटकलं होतं.

“ठीक आहे, रीमा सिर्गेयेव्ना,”मी आपलं घोड‌ं पुढे दामटलं, “मी तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर तर दिलेच होते ना, की लेनिनग्रादला लेनिनग्राद का म्हणतात! कारण ‘ग्राद’ – ह्याचा अर्थ पूर्वी ’शहर’ असा होता! मी जहाजसुद्धा मॅनेज करेन, तुम्ही काळजी करू नका.”

“नाही, मॅनेज नाही करू शकणार,” माहीत नाही का, पण तिने अत्यंत आनंदाने म्हटले, आणि तो मुद्दा तिथेच संपला. तिची लिपस्टिक पूर्णपणे फिस्कटली, आणि मला कळून चुकलं की मी कॅप्टन नाही होणार. पण नंतर कळलं की रीमा सिर्गेयेव्ना स्वतःच कॅॅप्टन होणार आहे. पण कोणत्याच पुस्तकात आणि एकाही सिनेमात कॅप्टन जहाजाच्या डेकवर आपली लिपस्टिक ठीक नाही करत. आणि, ते सुद्धा सेलर्सच्या समोर!


जेव्हा मी आठ वर्षांचा होतो, तेव्हा मी टीव्हीला एक पत्र लिहिलं, ज्यात त्यांना विनंती केली होती की ‘दॉन किहोते’बद्दल फिल्म दाखवावी. मला माहीत नव्हतं की दॉन किहोते आहे तरी कोण, पण नार्सिस अंकलकडून (हे पण माझ्या पप्पांचे एक मित्र आहेत) कळलं की दॉन किहोते बराचसा माझ्यासारखा आहे.

नार्सिस अंकलशी मी किचनमधे बोलत होतो. नार्सिस अंकल दुरुस्तीच्या कामात पप्पांची मदत करत होते, आणि चाकूने वॉलपेपर खरवडत होते. ते खरवडत होते आणि म्हणत होते की ही भिंत सपाट आहे, आपल्या आयुष्यासारखी, आणि असं म्हणताम्हणता गालातल्या गालांत हसत होते, जणू एखादी मोठी ज्ञानाची गोष्ट सांगताहेत. मी पण एक छिन्नी (खवणी) घेतली आणि वॉलपेपर खरवडू लागलो. माझी इच्छा होती की एकाच वेळेस जितकं जास्त जमेल, तेवढं खरवडून टाकू, पण नार्सिस अंकल म्हणाले की, अशाप्रकारे वॉलपेपर खरवडताना मी भिंतीशी तसलाच संघर्ष करतोय जसा दॉन किहोतेने विण्ड-मिलशी केला होता.

आणि ह्याचा काय अर्थ आहे : विण्ड-मिलशी संघर्ष करणे? आणि दॉन किहोते कोण होता? हा शांत-दोन तर नाही ना?” मला कित्तीतरी गोष्टींबाबत उत्सुकता होती.

“कम ऑन, बाळा!” अंकल नार्सिस हसू लागले. “शांत-दोन – ही एक नदी आहे, पण दॉन-किहोते – शिलेदार. असा कोणी नव्हताच ज्याच्याशी तो युद्ध करेल, म्हणून त्याने विण्ड-मिलशी संअअअ...घर्ष केला” आणि नार्सिसने पेंटचा एक मोठा तुकडा काढून फेकला, पुन्हा असं म्हणत, की भिंत आपल्या जीवनासारखीच सपाट आहे.

काही वेळाने ते पुढे सांगू लागले, मी आता काही विचारंत नव्हतो तरी:

“विण्ड-मिलशी संघर्ष करणे – ह्याचा अर्थ असा आहे, काहीच विचार न करता आपली शक्ति व्यर्थ वाया घालवणे. तू ह्या खवणीच्याऐवजी चाकू घे आणि निवांतपणे खरवड. नाही तर तू दॉन किहोतेसारखाच होऊन जाशील, ज्याच्यावर दुल्सेनिया तोबोसो हसली होती.”

“आता ही आणखी कोण आहे?”

“ही एक बाई होती, अशी, खासंच होती!!!” इथे अंकल नार्सिस ज्या स्टुलवर उभे होते, त्याच्यावरून पडतापडता वाचले, आणि हे खास’ – ह्याच खासने त्यांना सावरायला मदत केली. त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि लगेच पुढे बोलू लागले, जसं काही झालंच नव्हतं : दॉन किहोते सतत तिच्या मागे-मागे जायचा, तिची रक्षा करण्यासाठी, पण ती त्याच्यापासून दूर पळायची, कोणी तिची रक्षा करावी, हे तिला आवडत नव्हतं.

मग नार्सिस अंकलने मला सल्ला दिला की मी दॉन किहोतेबद्दल पुस्तक वाचावं. पण मला वाचणं आवडत नाही, म्हणून मी विचार केला, की दॉन किहोतेबद्दल फिल्म बघणं केव्हाही जास्त चांगलं होईल, आणि मी टीव्हीवाल्यांना पत्र लिहायला बसलो. चक्क चैनल नं.-1 ला.

“नमस्कार!” मी लिहिलं. “मी, वोलोग्दाहून एक स्टुडण्ट, तुम्हाला पत्र लिहितोय. माझं नाव कन्स्तांतिन आहे. जर काही अडचण नसेल तर, दॉन किहोतेबद्दल फिल्म दाखवा. कोणत्याही दिवशी, पण खूप उशीरा नको, म्हणजे मी रात्री आरामात झोपू शकेन. जर तुमच्याकडे ही फिल्म नसेल, तर कमीत कमी शांत-दोनबद्दलचं दाखवा, म्हणजे मला कळेल की दोघांमधे अंतर काय आहे.” तारीख टाकली आणि सही करून दिली. आणि, त्यांनी शांत-दोनबद्दल फिल्म दाखवली. अगदी लगेच तर नाही, पण एका वर्षाने.


पण, चला, ठीक आहे, महत्वाची गोष्ट अशी की आता मला माहीत आहे की शांत-दोनकाय आहे – ही तिथे आहे, जिथे कजाक भांडाभांडी करतात. पण, मग ती शांत कशी काय झाली? तार्किक दृष्टीने बघितलं, तर तिला खळखळणारी असायला पाहिजे. ऐकायला पण चांगलं वाटतंय: खळखळणारी दोन’... आणि हे जास्त प्रामाणिकसुद्धा आहे.


जेव्हा मी दहा वर्षांचा होतो, तेव्हा तिसरीत शिकत होतो आणि आम्ही आपल्या आवडीच्या कोणत्याही विषयावर निबंध लिहायचो. मी प्रेमाबद्दल लिहिण्याचा निश्चय केला... आणि लिहून टाकला.  


Rate this content
Log in