एक सुंदरस्वप्नांच साक्षात ...
एक सुंदरस्वप्नांच साक्षात ...


माझं - माझं कबाड ओझं , रिकाम्या हातानं येणं तसं जाणं
ठरलेलंच आमचं घड्याळाच्या काट्यावर अनिवार धावणं ..
सर्व काही पूर्व नियोजित येणं - जाणं विधिलिखित असतं
जीवन हवंहवंसं कितीही जगलं तरी जगावंसं वाटतं ...
टीचभर पोटासाठी किती हाल ? क्षणिक सारा मायाजाल
तोडाफोडी, रडा -रडी , मारा -मारी , एकमेकांवर कुरघोडी
रुसवे - फुगवे , भांडण - तंटे , सत्त्तेसाठी ओढाओढी
सर्वकाही समजत तरी चालूच आपली मोघम चढाओढी
काडी - काडी जमवतो , वृथा मी पण , अभिमान मिरवतो
मायाजालात हरवून सालं मनासारखं जगायचंच विसरतो .
कुणी सोबत नेलं म्हणून आपण घेऊन जाणार आहोत ?
माझं - तुझं काही नाही आपण फक्त भारवाही...
आपल्या हाती काय उरतं ? दिव्यासारखं जळत राहणं
स्वतःही जळण,झुरतं - झुरतं एखाद दिवशी संपून जाणं..
जीवन म्हणजे एक सुंदर स्वप्नांचा साक्षात अविष्कार
त्यास करावं सुंदर , मनभावन , प्रेमच वाटावं असेल तोवर ...