STORYMIRROR

Charumati Ramdas

Others

3  

Charumati Ramdas

Others

चंद्रावरून टपकला

चंद्रावरून टपकला

7 mins
1.7K


मागच्या दोन वर्षांत जीवन खूप बदललंय.

सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे, नोंद करायला मजा वाटते, की चो-या जवळ जवळ बंदच झाल्यात. सगळे कसे अगदी साजरे झालेत. व्यवस्थित, शिस्तबद्ध, चो-या कमी करतात आणि लाच तर बिल्कुल नाही घेत.

व्यंगकाराच्या लेखणीला, खरं सांगायचं म्हणजे, अगदी गंज लागायची वेळ आलीय. हो, लाचेबद्दल बोलायचं म्हटलं तर, मामला जरा गुंतागुंतीचा आहे. लाच नाही घेत, पण पैसे, पुढच्या वेळेस नक्की घेतील. म्हणजे पुनर्शिक्षणामुळे पब्लिक अगदी काटेकोरपणे नवीन नैतिक मूल्यांचे पालन करताना दिसतेय.

केवळ भीतीपोटी वादळ उठवण्यांत येते की, एकदम कळतंच नाही, की कोण, कुठे, काय, कशासाठी...

काही वर्षांपूर्वी मला दक्षिणेकडे ह्या बाबतचा चांगला अनुभव आला. एका धूर्तपणाशी गाठ पडली. इतर लोकांना असला त्रास होऊ नये म्हणून ह्याबद्दल सविस्तर लिहायचंच ठरविलंय.

तसं म्हटलं तर एका हॉटेलमधे खोलीसाठी माझ्याकडून एंट्री-फी लुबाडायचा प्रयत्न झाला. दुस-या शब्दांत म्हणजे – लाच घेण्याचा प्रयत्न केला गेला.

ऑफकोर्स, पूर्वी, म्हणजे काही वर्षांपूर्वी, ह्या क्षुल्लक विषयावर मी ही गोष्ट अशी लिहिली असती:

तर, काय झालं भाऊ, की एकदा स्टीमरने प्रवास करंत होतो.

तर, चहुकडे, ऑफकोर्स, ब्लैक-सी. अगदी स्वर्गीय सौन्दर्य. अजस्त्र शिळा. गरुड पक्ष्यांचे थवे, ऑफकोर्स, उडताहेत. हे सर्व काही होतं. आणखी काही असो वा नसो, पण हे मात्र होतं.

ह्या सौंदर्याकडे बघता बघता इतर प्रवाश्यांबद्दल मला खूपंच आदर वाटू लागला.

बघा, मी विचार करत होतो, माणूस जीवनावर राज्य करणारा आहे : मनांत आलं तर तो स्टीमरमधे जाऊ शकतो, मनात आलं तर गरुड पक्ष्यांना बघंत राहील, मनात आलं तर किना-यावर उतरून जाईल आणि एखाद्या हॉटेलमधे ठिय्या मांडेल.

मनांत आनंदाच्या उकळ्या फुटंत होत्या.

मात्र, फक्त एकंच विचार ह्या आनन्दाच्या आड येत होता. मी विचार करू लागलो कि उतरल्यावर मला एखाद्या बेक्कार हॉटेलमधे तरी खोली मिळेल काय?

मी स्टीमरवर उदासंच होतो, आणि कैप्टेन मला म्हणाला:

“सज्जन गृहस्था, तुमच्याकडे बघून मला खरोखरंच कीव येतेय. तुम्हीं चाललाय कुठे? कशाच्या भरवशांवर? तुम्हीं काय चन्द्रावरून टपकलाय?”

“म्हणजे काय?” मी विचारले.

“नाही,” तो म्हणतो कसा, “म्हणजे हे असूंच कसं शकतं? तुम्हीं काय कुक्कुलं बाळ आहात? तुम्हीं थांबणाराय कुठे? कशाला निघालांत? मी, म्हणजे, स्टीमर मागे वळवण्यासाठी पण तयार आहे, फक्त तुम्हीं तिथे जाऊं नये म्हणून.”

“काय, म्हणताय काय तुम्हीं? कृपा करून स्पष्ट सांगाल कां?”

“काय म्हणजे काय? हॉटेलची खोली मिळवण्यासाठी तुमच्या ओळखी तरी आहेत कां? किंवा, तिथला केयरटेकर तुमचा दुधाचा भाऊ आहे कां?”

म्हणतो कसा, “मला तुमचं आश्चर्यंच वाटतंय.”

“हं! कसंतरी, काहीतरी करून खोली मिळवीनंच,” मी म्हटलं. “मला एक परवलीचा शब्द माहीत आहे, की ज्यापुढे हॉटेलमध्ये कुणी काही म्हणूंच शकंत नाही.”

कॅप्टन म्हणाला, “ जा तुम्हीं खड्ड्यांत! माझं काम होतं तुम्हांला सावध करण्याचं. मग तुम्हीं मनांत येईल ते करा. जहाजावरून खाली उडीही का न मारा.”

तर, थोडक्यांत म्हणजे मी पोहोचलोय.

माझ्या हातांत दोन नग आहेत. एक – साधारण सोवियत बास्केट, जिच्यांत कुणालांच काही रस नाही. पण दुसरा नग – खूपंच शानदार. फाइबरची, किंवा बरोबर सांगायचं म्हणजे प्लायवुडची सूटकेस.

बास्केट मी पेपरवाल्या पो-याजवळ ठेवतो, चौकटीचं अस्तर असलेला आपला रबरी इंटरनेशनल ओवरकोट उलटतो आणि स्वतः तसांच आपली इम्पोर्टेड सूटकेस घेऊन हॉटेलमध्ये घुसतो.

दरबान म्हणतो, “फुकटंच घुसतोय, खोल्याच नाहीयेत.”

मी केयरटेकरजवळ जातो आणि मोडक्या-तोडक्या भाषेत त्याला सांगतो:

“एन शाम्बेर...त्सिम्मेर...यावोल?”

केयरटेकर उद्गारतो:

“आता म्हणा...लोकहो...आपल्याकडे तर फॉरेनर आलाय!”

आणि तो स्वतःसुद्धा मोडक्या तोडक्या भाषेतंच उत्तर देतो : “यावोल, यावोल, ओने शाम्बेर...त्सिम्मेर, नक्कीच, शंकाच नाही, यावोल, या-या. बस एक मिनिट. लगेच तुमच्यासाठी सर्वांत बेस्ट खोली बघतो, कमीत कमी ढेकूण असलेली.”

मी अगदी गुर्मीत उभा आहे, पण माझे गुडघे मात्र थरथरंत आहेत.

परदेशी भाषेत बोलण्याची आवड असलेला केयरटेकर मला विचारतो:

“पार्डन...” त्याने विचारलं, “मिस्टर माफ़ करा, आपण जर्मनीहून आलात, किंवा, कदाचित दुसरीकडून आलांत?”

‘गो टू हेल,’ मी विचार केला, ‘आणि जर हे पाप्याचं पितंर अचानकंच जर्मनमधे बोलूं लागलं तर?’ “नाही,” मी म्हटलं, “इख बिन ऐने शाम्बेर-त्सिम्मेर इस्पानिया. कोम्प्रेने? इस्पानिया. पादेस्पान, कामारील्या.”

“ओह,” केयरटेकर पूर्णपणे धराशायी झाला.

आता म्हणा...लोकहो...म्हणतो कसा, “आपल्याकडे हा स्पॅनिश माणूस तर नाही न टपकला?” आता घ्या, म्हणाला, “असं कसं...” पुढे म्हणतो, “माहितीये, ऐकलंय...इस्पानिया, पादेस्पान, इस्पानोल्का...” आणि बघतां-बघतां त्याचे हात थरथरू लागले. माझे पण थरथरंत होते. पण त्याचेसुद्धा थरथरंत होते आणि आम्हीं दोघेही बोलंत होतो आणि थरथरंत होतो.

मी मोडक्या-तोडक्या स्पॅनिश भाषेंत म्हटलं, “यावोल,” मी पुढे म्हणालो, “बित्ते...त्सिर्बित्ते. घेऊन चला,” मी म्हटले, “माझ्या खोलींत सूटकेस लवकर घेऊन या, बाकीचं आपण नंतर बोलूं, नंतर ठरवू काय ते, कुणाला किती द्यायचे ते.”

“यावोल, यावोल,” केयरटेकरने उत्तर दिलं, ”काळजी करूं नका.”

आणि एकदम एका बिज़नेस अ‍ॅटिट्यूडमध्ये त्याने विचारलं, “पेमेन्ट कसं करणारेय? इन वाल्यूत ओदेर, आमच्याच करन्सीत नं?”

आणि आपल्या बोटांनी खाणाखुणा करूं लागला, ज्या प्रवासी परदेश्यांना चांगल्यांच समजतांत...शून्य शून्य आणि एक एक...

मी म्हटलं, “हे मला काही समजंत नाहीये...घेऊन चल.” मी ओरडलो, “पाप्याच्या पितरा, लवकर आण.”

मी विचार केला की एकदा खोलींत घुसलो रे घुसलो की मग त्यांनी माझी अगदी चटणी केली तरी चालेल. तर, त्याने माझी सूटकेस धरली. आणि महत्प्रयत्नामुळे इतक्या जोराने धरली की कुलूप जुनं असल्यामुळे ती पट्कन उघडली!

माझी सूटकेस उघडली, आणि, ऑफकोर्स, आतून बाहेर पडला अगदी सगळ्या प्रकारचा कचरा. त्यातूंन निघाले रफू केलेले अंतर्वस्त्र, हाफ-पैन्ट्स, ‘कील’ साबण आणि आणखीही बरांच आपला देशी पसारा...

केयरटेकरने ह्या दौलतीकडे बघितलं आणि त्याचा चेहरा पांढराफटक पडला. तो सगळं समजला.”तू, हरामखोर, डॉक्यूमेन्ट्स दाखव!”

मी म्हटले:

"ql-align-justify">“समजंत नाई...” पुढे म्हणालो, “जर खोल्या नसतील तर मी चाललो.”

केयरटेकर दरबानला म्हणाला:

“बघितलास हा कचरा! परदेशी पाहुण्याचं सोंग करून खोली घेण्याचा प्रयत्न करंत होता.”

मी पट्कन आपली दौलत गोळा केली आणि...पळालो. दुस-या हॉटेलमध्ये मला खोली मिळाली...ह्या प्लस फिफ्टी स्कीमखाली.

तर, साधारण तीन-चार वर्षांपूर्वी ह्या विषयावर अशा प्रकारची सोपी गोष्ट मी लिहिली असती.

बरोबर आहे. तरुण होतो तेव्हां. विचारांमध्ये परिपक्वता नव्हती, बेजवाबदार वागणं होतं. सगळ्या गोष्टींकडे अगदी क्षुल्लकपणे बघायचो.

पण आज अशी परिस्थिति नाहीये. आज सत्याच्या जवळ असावेसे वाटते. अतिशयोक्ती करणे, कोरी कल्पना करणे, तथ्यांची उलटपालट करणे आवडंत नाही. वेगवेगळ्या कहाण्या, हास्यास्पद गोष्टी आणि प्रहसनं नवीन आवरणांत प्रस्तुत कराव्याशा वाटंत नाही...म्हणजेच ओल्ड वाईनला न्यू बॉटलमध्ये ठेवणे मला जमंत नाही.

थोडक्यांत म्हणजे, खरं काय ते सांगायची इच्छा आहे, कसल्याही प्रकारच्या खोटेपणाचा आश्रय नकोसा वाटतो.

आणि ह्या विषयावरची गोष्ट, खरं म्हणजे...सत्य घटना...कोणताही आडपडदा न ठेवतां आणि कल्पनेचा एकही शब्द न वापरतां, अस्मादिक ह्या अशा ‘अकॅडेमिक’ स्वरूपांत लिहितील:

“स्टीमरमधून उतरल्यावर मी सरळ हॉटेलकडे गेलो. केयरटेकर तोंड वाकडं करून जणु माझ्याऐवजी आजूबाजूच्या देखाव्याला म्हणाला:

“नाहीत, माहीतीये, मला ह्या आजच्या पब्लिकचं आश्चर्यंच वाटतं. जहाज आलं रे आलं की सगळे सरळ आमच्याकडे धावतात. जणु काही मुद्दाम येतात. जसं काही आमच्याकडे त्यांच्यासाठी खोल्या अगदी तयारंच आहेत. तुम्हीं काय, चंद्रावरून टपकलाय? परिस्थितीचा काही अंदाज़ बिंदाज़ आहे की नाहीं?”

मी निघून जायच्या बेतात होतो. एक दरबान हळूंच एक दीर्घ श्वास घेऊन मला म्हणतोय कसा:

“ होS, अगदीच...माहितीये, ह्या खोल्यांचा भयंकरंच प्रॉब्लेम आहे. कुठेच नाहीत खोल्या. आमच्याकडे तरी एखादी सापडली असती, निश्चितंच सापडली असती, पण...तुम्हीं एकदा व्यवस्थित बोला त्या केयरटेकरशी...”

‘मसणांत जा,’ मी म्हटलं, “तुम्हीं हे कशाबद्दल म्हणताय?”

केयरटेकर आपल्या काऊंटरवरून दरबानशी चक्क माझ्या डोक्यावरून बोलतोय कसा, “ मला तुमची गंम्मतंच वाटतेय, फ्योदर मिखाइलविच! आपल्याकडे रिकाम्या खोल्या आहेतंच कुठे? तुम्हीं असं कसं सांगताय त्याला? हो, एक खोली मात्र आहे, पण माहितीये, तिला किनई किल्लीच नाही. पाहिजे असेल तर घेऊ द्या बापड्याला...”

मी म्हटले:

“बिन किल्लीची का होईना, पण द्या तर खरं!”

“ओह, तुम्हांला बिन किल्लीची पाहिजे,” केयरटेकर म्हणाला. “घ्या, पण आमच्याकडे चो-या मात्र फार होतात. चोरांचा सुळसुळाट आहे म्हणा ना. पडदे चोरून नेतील आणि त्याला तुम्हीं जवाबदार असाल.”

मी म्हटलं, “फार काय होईल? मी खोलीतून बाहेरंच नाही निघणार. फक्त मला खोलीत जाऊ द्या. समुद्र प्रवासांत मला खूपंच त्रास झालाय...नीट उभं राहण्याचं सुद्धा त्राण नाहीये.”

“घ्या,” केयरटेकर म्हणाला, “फक्त मी आधीच सावध करतोय : आमची किल्ली हरवलीय, आणि खोली बंद आहे...आणि तुम्हांला, कदाचित वाटेल की खोली उघडी आहे आणि किल्ली हरवलीय, म्हणजे तिला कुलूप नाही लावतां येणार.”

“मेहेरबानी करा,” मी म्हटले, “अशा खोलीचा मला काय उपयोग, जिच्या आत मला जातांच येणार नाही...”

“माहित नाही,” केयरटेकर म्हणाला, “तुमची मर्जी.”

दरबान माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “मी एक सुचवूं कां?”

मी मान हलवली. “बघा,” तो म्हणाला, “जर तुम्हीं म्हणंत असाल तर मी पुढल्या अंगणांत जातो. तिथे आमचा बढई काम करतोय. तो तुमची खोली आपल्या मास्टर-की ने उघडून देईल.”

बढई आला. “हो,” तो म्हणतोय कसा, “काय म्हणता, हे काही मोठ्ठं काम नाहीये. दार उघडणं – अगदी एका कोपेकचं काम आहे, पण मला,” पुढे गुरकावतोय, “”वरच्या मजल्यावर चढून जाण्याची काही हौस नाहीय. मी आपल्या कामाचा प्रत्येक तास हार्ड-करन्सीत मोजंत असतो.”

झालं. बढयाच्या हातांत पाच रूबल्स टिकवतो.

तो मास्टर की ने दार उघडतो आणि अगदी प्रेमाने म्हणतो:

“हो, नक्कीच. आणखी घ्या! स्पष्टंच आहे. किल्ली शिवाय राहण्यांत काही मजा नाही, राव! तुम्हांला, काहीही म्हणा, काही खायची इच्छा झाली किंवा वोद्का पिण्यासाठी बाहेर जायचे असेल तर...बसून रहा, पुतळ्यासारखे...कारण किल्लीच नाहीये!”

“मग काय,” मी म्हटले, “एका नोकराला ठेवायचे.”

“हे, म्हणजे, तुमच्या खिशाला भुर्दण्ड! मी काय म्हणंत होतो, जर मला आठ रूबल्स दिलेत तर मी जुन्या किल्लीपासून तुमच्यासाठी एक किल्ली करून दिली असती.”

तर किल्ली तयार झाली. मी पलंगावर पडलो आहे, अगदी राजासारखा. शेजारच्या खोलीमधून ग्रामोफोन ऐकतो आहे – वेर्तिन्स्की महाशयांच गाणं. मी हिंडतो आहे. इकडे-तिकडे फिरतो आहे. आपल्या किल्लीमुळे स्वतःला शेजा-याच्या बरोबरीचा समजतो आहे.

संध्याकाळी हिंडायला निघालो, आणि केयरटेकर मला म्हणाला:

“माहीत आहे का, आपण सकाळी उगीचंच त्या किल्लीबद्दल डोकं फोडंत होतो. आम्हांला वाटलं की ती हरवलीय, पण ती एका वेगळ्याच खिळ्यावार टांगली होती.”

“वा! छान!” मी म्हटले. “खोलीचं भाडं आहे पाच रूबल्स, आणि इतर खर्च सोळा रूबल्स!”

“म्हणजे?” तो विचारतो, “सोळा कसे काय बुवा, आठ का नाही?”

“नाही,” मी उत्तर दिलं. “दरबानला – तीन; बढयाला – पाच; आणि किल्लीसाठी – आठ रूबल्स.”

“कोणत्या किल्लीसाठी?”

मी म्हटले, “त्या बढयाने जी मला करून दिली.”

“माफ़ करा,” तो म्हणाला, “हा, तो नीच माणूस, त्याने आमचीच किल्ली तर तुम्हांला नाही ना विकली? हो, अगदी,” पुढे म्हणाला, “तेच आहे. बघा, अशी इथे टांगली होती, आणि आता नाहीये. ठीक आहे, जरा थांबा, मी त्याला...”

“तुमच्याकडे,” मी म्हणतो, “असं वाटतं की अगदी एक गैंगच आहे...”

केयरटेकरने काहीतरी खोट-नाटं बतावण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या कमी पगाराबद्दल बडबडू लागला, मग हात झटकून तो मागे वळला आणि नवीन पाहुण्याशी बोलूं लागला.

आणि मी ऐकलं, की तो कसं म्हणाला:

“हो, आहे एक खोली. पण त्याला किल्ली नाहीये.”

मी लवकरंच त्या हॉटेलमधून निघून गेलो.

सहज मनांत आलं की कदाचित रेल्वेच्या तिकीटांच्या संदर्भांतसुद्धा असेच जास्तीचे ‘खर्च’ आणि अशाच भानगडी असतील, पण मग कळलं की असलं काही नाहीये. तिकीट मला ओळखीमुळे मिळालं आणि त्यासाठी मी तेवढेच पैसे मोजले जेवढ्यांत सरकारी नियमाप्रमाणे ते हतर, अशा प्रकारे मी साऊथहून परंत आलो. मनाच्या समतोल अवस्थेत


Rate this content
Log in