Rahul Maghade

Children Stories Inspirational Children

3.7  

Rahul Maghade

Children Stories Inspirational Children

बालक पालक

बालक पालक

2 mins
145


मुळात चूक की बरोबर हा नंतरचा विषय आधी आई वडिलांचं मुलांवर किती लक्ष आहे आणि आई वडील मुलांना कश्या प्रकारे संस्कार देत आहेत. त्या - त्या वयानुसार मुलांना चांगल्या - वाईट गोष्टी शिकवल्या जाव्यात, अस मला वाटत. खरतर मुलांसोबत आपण किती वेळ घालवतोय हे ही तितकचं महत्त्वाचं आहे ,मी असेही पालक पाहिलेत जे मुलांना मोबाईल वर गेम, कार्टून लावून देतात आणि स्वतः टीव्ही किंवा शेजाऱ्यांसोबत गप्पा करत बसतात. 


मूलं रडली की त्यांना शांत करण्यासाठी मोबाईल द्यायचा खरतर ह्या सवयी आपणच त्यांना त्यांच्या बालपणापासून लावल्यात म्हणून मुलं मोबाईल शिवाय साधं जेवण सुद्धा करत नाहीत. (थोडंसं रडलं द्या मोबाईल, ऐकत नसेल तर द्या मोबाईल, मस्ती करत असेल, जेवत नसेल) म्हणजे सगळ्याच बाजूने आपणच मुलांना मोबाईल मध्ये अडकवून ठेवलंय.


बरं किती पालकांना आपल्या मुलांबरोबर खेळायला, बोलायला वेळ भेटतो किंवा वेळ देतो असच म्हणूया, कामामुळे वेळ मिळत नाही असं बोलून आपण फक्त ती वेळ मारून नेतो किंवा आपली जबाबदारी झटकून देतो. पण वास्तविकता पाहता, आपण आयुष्यभर कामामध्ये व्यस्तच असणार आहोत त्यामुळे आपण आपल्या मुलांना कधीच वेळ देणार नाही का? 


खरंतर आपलं काम , आपलं वयक्तिक आयुष्य सांभाळूनच मुलांसाठी वेळ काढावा लागेल त्यांच्यावर चांगले संस्कार घडवावे लागतील, मोबाईल पेक्षा ही जास्त जवळचा मित्र म्हणून पालकालाच पुढाकार घ्यावा लागेल. मी मानतो की ऑफिसच्या कामामुळे, दैनंदिन धावपळीमध्ये माणूस हा थकतो पण हे जीवनचक्र रोजचच राहणार आहे ह्यात बद्दल नाही त्यामुळे हे सगळ सांभाळून एक पालक म्हणून आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ हा द्यावाच लागेलं. 


पालकाने मुलांसाठी वेगळा वेळ राखून ठेवला तर मला नाही वाटत की एक पालक मुलांना चूक आणि बरोबर ह्यातला फरक आणि शिकवण चांगल्या प्रकारे सांगू शकेल आणि शिकवू ही शकले.


Rate this content
Log in