आजोळ
आजोळ


त्या दिवशी आजोळी जाऊन आलो .. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. बालपणीची झेड पी ची शाळा, तिची झालेली दुर्दशा.. रंग उडालेल्या भिंती गावाचं गावपण हरवल्याचं जणू दाखवत होत्या ...पूर्वीचं गावाचं वैभव, संपन्नता, गावचा पार, ती शाळेची घंटा .. गल्लीत गोट्या खेळताना खाल्लेला मार.. हुतूतू, सूरपाट्या, कब्बडी सारं आठवत गेलं.. अगदी जसाच्या तसं... अनवाणी पायांन तुडविलेल्या त्या वाटा ती चिंचा, बोरं, सुक्या मेव्यासाठीची वणवण ....सोबतचे ते सवंगडी... पाण्याने तुडुंब भरलेले ओढे, नाले विहिरी ...तो गावचा पार शेणाने सारवलेली घरे , गावचा पार ... ती घराच्या ओढीने निघालेली जनावरे ... सारं सारं आठवलं .. आणि गावात झालेला बदल पाहून धस्स झालं कारण ... काळाच्या ओघात गाव पार बदललं होत ... सिमेंटच्या भिंती ... अंगणेे गायब ... एखादं दुसरं जुने जाणते मंडळी शिल्लक दिसत होते ते हि नावापुरते ... बरेचसे जग सोडून गेलेले... पारावरच्या गप्पा केव्हाच हद्दपार झाल्यात त्या जागा आता व्हाटस अप, फेसबुक ने घेतल्याने जो तो स्वतांचंच विश्व निर्माण करताना जाणवत होता . काही जुने मित्र भेटले , जुन्या आठवणीना नव्याने उजाळा मिळाला .बालपणीचं गमती जमती, मौजमस्ती, तेव्हा
झालेला दुरावा, बालपणीचं मित्र मैत्रिणी कुठे-काय करतात. मनसोक्त गप्पा झाल्या मग हल्ली कोण काय करतो ? सर्व यथेच्छ गप्पा भरभरून प्रेम मिळालं . खूप दिवसांनी मित्र मंडळी भेटल्याने . खूप छान वाटलं ... पण पूर्वीची आपुलकी , हल्ली जाणवत नाही सर्वकाही वरवरचं .. बेगडी वाटतं सारं ... ते माणूसपण प्रेम जिव्हाळा कुणी हिरावला असेल बरे .... का माणूस एवढा आत्मकेंद्रित झाला असेल ? गावाचं गावपण हरवली एवढं मात्र नक्की . तरुण पोर बहुदा मोबाईलशी खेळताना दिसली .. पूर्वीची मैदानी खेळ क्रिकेट वगळता कालबाह्य होतोत कि काय असच वाटून गेलं .. गावात रोजगार फारसा मिळत नसल्याने शहराकडे धाव घेताना तरुण दिसतो . पण हे झालेले बदल गावाला पूरक न ठरता मारकच ठरत आहे. गावात रोजगार नाही . शहरात तरुणाचं मन रमत नाही ... बोटावर मोजण्या इतके तरुण छोटे छोटे व्यवसाय करतात व उदर्निवाह कसाबसा करीत आहे .. पूर्वीचा गाव आठवला कि मन उदास होत. ती संपन्नता, सुजलाम-सुफलाम भारत कुठे आणि हे भकास झालेली खेडे पहिले कि मन गहिवरून येतं. जाड पावलांनी गावाचा निरोप घेतला. गावाचे झालेले बदल. अनुभवत, मनात साठवत गुणदोषांसहित बदल टिपत ... निघालो टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडलेल्या लोकांसारखं ध्येयपथाच्या दिशेने ....