Bhagyashri Chavan Patil

Others Children

3.4  

Bhagyashri Chavan Patil

Others Children

आजोबा एक अतुट नातं

आजोबा एक अतुट नातं

4 mins
1.5K


आज एकदम पोरक झाल्या सारखं वाटलं कारण आजोबांना मी बाबा म्हणूनच हाक मारायचे म्हणूनच असेल कदाचित त्यांच्या बद्दल काय काय बोलणार मी शब्द सुद्धा अपुरे पडतील असे होते आजोबा माझे आणि दिसायला एकदम रुबाबदार व्यक्तिमत्व उंची सहा फूट आणि अंगावर नेहमी पांढरा शुभ्र सदरा आणि पांढरी विजार हातात पानाची बॅग रुमाल आणि पायात चपला घालूनच बाहेर जाणार सगळ्यांशी मायेने बोलायचे खुप काही माहिती ही सांगायचे. मी शाळेत असताना माझ्या वह्या पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे.. मला फूट पट्टी ही घेऊन दिली होती आम्हा आठ नातवंडांना खुप शिका मोठे व्हा हाच आशीर्वाद कायम देत राहणार कधीही मन भरून सेवा केली की पाठीवरून मायेचा हात ही फिरवणार मुली असतील तर त्यांना अक्का म्हणुन हाक मारणार बोलवणार आणि मूल असतील तर त्यांना बाळं म्हणूनच हाक मारणार आमचे आजोबा (बाबा) पण आम्हला पण अहो जाहो हीच हाक मारणार..


 त्यांच्या जवळ नेहमी पाण्याची बॅग असायची त्यात पान सुपारी अडकित्ता असणार आणि एक डायरी आणि पेन अक्षर तर अगदी मोत्या सारखे होते शेतकरी पत संस्थे मध्ये अधिकारी म्हणुन कार्यरत होते आजोबांनी विवाह संस्थेच काम ही घरात राहून पाहिलं पण कधीच फी घेतली नाही आपण हे काम लोकांसाठी आणि त्यांच्या भल्या साठी करतो आहोत असे म्हणायचे.. त्यांना दोन मुलं आणि दोन मुली आणि आमच्या आई म्हणजेच आजी सगळ्यांवर अतोनात माया आणि प्रेम आम्ही आठ नातवंड पण आम्हला नेहमीच लाडाने पाखरं म्हणतात माझ्या साठी दोघं नेहमीच खुप जवळचे राहिले आहेत कारण मी त्यांना आजी आजोबांचा पहिला मान दिला म्हणून माझं जे नावं आहे ते त्यांनीच ठेवलेलं आहे जे आयुष्यभर माझ्या सोबत राहील आणि माझे भाग्य थोर म्हणुन मला अश्या आजी आजोबांचा सहवास आणि प्रेम मिळालं.. कधीच कुठला दुजा भाव नाही प्रत्येका बरोबर मायेचं अतूट नातं त्यांनी नेहमीच बांधून ठेवलं होतं..


माणसाने आयुष्यात समाधानी कसं राहायचं हे सुद्धा त्यांच्या कडूनच आम्ही सारे शिकतच मोठे झालो आहोत.. माझी आई सुद्धा खुप काही सांगत असते बाबांच्या बद्दल त्यांच राहणीमान आणि त्यांनी कोणासाठी काय काय केलं आजोबांना आठ बहिणी आणि आजोबा एकटे म्हणजे नऊ भावंड होती बर आठ बहिणींची लग्न सुद्धा आजी आजोबांनी केली आधी त्यांनी चाळीत राहायला होते आजी आजोबा त्यांची दोन मूल आणि दोन मुली आणि त्यांच्या नातेवाईकांचा गोतावला त्यांनी एकट्याने खंबीर राहून सगळं केलं नंतर मुलांचं संगोपन शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्यांची लग्न ही केली ही मोजकीच माणसे झाली अश्या बऱ्याच जणांना त्यांनी अपेक्षा न ठेवता मदत करत राहिले आणि कधीच कोणाची मदत न घेता सेवा करत राहिले..


बरं कोल्हापूर सारख्या शहरात त्यांनी स्वतःच घर घेतलं त्यात त्यांना त्यांच्या आजोबांची साथ मिळाली म्हणून त्यांनी घराला नावं ही त्यांचंच दिलं केशव स्मृती अशी त्यांची विचार धारणा होती आणि आजोबांची लूना होती त्यावरून आजींना घेऊन खुप फिरले आहेत बर कोणता ही सण समारंभ चुकवला नाही कोणता ही व्यवहार चुकवला नाही ना कधी कोणतं नात विसरले सगळं वेळ येत गेली तसचं सगळं सांभाळत नेल त्यात आईंची मोलाची साथ त्यांना मिळत गेली.. बरं कधी एक रुपया स्वतःसाठी म्हणून कधीच खर्च नाही केला येणाऱ्या पगारात घरचं सगळं सामान आणि मुलांसाठी खायला नेत शरीर यष्टी चांगली होती आणि महत्त्वाचे म्हणजे आजोबा निर्व्यसणी होते त्यामुळे त्यांचं कधीच कुठे अडलं नाही. वायफळ खर्च त्यांना कधीच करावासा वाटला नाही त्यामुळे त्यांचं जीवन सत्कारणी लागलं याचा आम्हला सार्थ अभिमान आहे आणि तो कायम वाटतं राहणार..


मी असंच एकदा सुट्टीत राहायला गेले असताना मी त्यांना माझ्या कवितेचे वही वाचायला म्हणून दिली होती त्यावर त्यांनी काहीच न बोलता तुझ्याकडे शब्द सामर्थ्य खुप चागलं आहे ह्याच कला गुणाने तु मोठी कवयित्री होणार म्हणुन माझ्या वहीच्या सुरूवातीच्या पेज वर त्यांनी लिहिली होती बरं त्यावर आपली स्वाक्षरी केली आहे आणि ती वही अजुन मी माझ्या कडे जपुन ठेवली आहे कारण माझ्यातला गुण फक्त त्यांनी ओळखला होता हेच माझ्यासाठी खूप प्रेरणा देणार आहे आणि हा मौल्यवान आशीर्वाद मी कायम माझ्याकडे जपुन ठेवणार आहे.. त्यांच्या सोबत बसलं की वेळ कसा निघून जायचा हेच समजतं नसायचे खुप गोष्टी सांगत बसायचे आणि आई माझी ते ऐका पुढे आयुष्यात त्यांचा उपयोग होईल म्हणुन सांगत असायची आणि ते आज समजतं आहे तेव्हा ते शब्द सामर्थ्य कानावर पडले म्हणूनच आज आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहोत रोज संध्याकाळी त्यांनी फिरायला जायचे अजूनही आठवत मला आमच्या सगळ्यांसोबत सायकल आम्ही मारणार फक्त आमच्या सोबत थांबायला म्हणून यायचे आजोबा आणि त्यांचे काही मित्र असायचे त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसणार आणि आम्ही सगळे खेळत बसणार कारण त्यांना आवडायचं ते मुला मुलींनी खेळलं पाहिजेत शिकलं पाहिजेत हे त्यांचं नेहमीचं सांगणं असायचं म्हणून तर त्यांच्या सोबत घालवलेले सोनेरी क्षण कायम माझ्या मनात एक गोड अशी साठवण म्हणून कायम माझ्या सोबत राहील..


माणसांमध्ये देव माणूस असतो असं मी ऐकलं होतं त्याचं उत्तम प्रतीच वर्णन मी माझ्या अजोबां मध्ये पाहिलं निःस्वार्थ आणि जणू देवाचं रूप घेऊन आमच्या सोबत राहत होते. खुप साधी राहणी आणि उच्च विचार सरणी होती जे काही समोर आलं ते नेहमी गोडच मानून त्यांनी आयुष्याची वाटचाल केली त्यांच्या बद्दल हे लिहून मी कधी धन्य आहे हे सांगायचं आहे आणि माझे आजोबा किती महान होते हे सांगायचं आहे.. माणसाने कौतुक नेहमी दुसऱ्याच करावं आपल नाही असं म्हणतात आणि हा वाक्य प्रचार मी नेहमी आजोबांच्या बाबतीत ऐकत आले आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हला सगळ्यांना आहे आणि कायम राहील.. अजुन खुप काही आठवणी किस्से आहेत पण शब्द आणि वेळेची मर्यादा पाळून मी इथेच थांबते कारण मनात खूप आहे पण शब्द अपुरे पडत आहेत म्हणूनच माझ्या सारखंच तुम्हाला ही सगळ्यांना त्यांच्या बद्दल कळावं म्हणून हा लेख लिहला आहे..

    


Rate this content
Log in