आजचा विषय - ग्रामीण भारत
आजचा विषय - ग्रामीण भारत
स्वातंत्र्यचळवळीत महात्मा गांधीजींना खेड्याचे महत्त्व उमगले होते म्हणून त्यांनी सर्वांना उद्देशून 'चला खेड्याकडे' असा संदेश दिला. भारत हा शेतीप्रधान देश आहे भारतात ९०%खेडी आहेत. खेड्यातील जनतेसाठी साधन संपत्ती, उद्योगधंदे, आरोग्य, शिक्षण या सोयी उपलब्ध होणे आवश्यक आहे. खेड्यातील लोक शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असतात. निसर्गाची कृपा झाली तर शेती छान पिकते परंतु निसर्गाच्या अवकृपेने हाहाकार उडवून दिला तर मात्र शेतात काही पिकत नाही आणि शेतकऱ्याला जीवन दुस्वार होते. नोकरीच्या शोधार्थ शहरात धावतात किंवा खेड्यातील अनिश्चित शेतीला कंटाळून शहरात येतात आणी खेडी तशीच अविकसित राहतात.आज खेड्यांतील चित्र आज बदलायला हवे. शहरात जसा महिन्याला पगार मिळतो तसे खेड्यात महिन्याला पगार न मिळता सर्वतः शेतीवर अवलंबून राहावे लागते. शहरात प्रदूषण, गर्दी, गोंगाट ,वाहनांचे कर्णकर्कश आवाज तसेच चोऱ्यामाऱ्या आणि असुरक्षिततेचे वातावरण असते. परंतु खेड्यात मात्र ती परिस्थिती नाही. खेड्यातील जीवन सुखमय आणि आरोग्यदायी असते. खेड्यातील घरेही प्रशस्त असतात एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांचा विकास होत असतो.
शहरात ते शक्य नसल्यामुळे स्वतंत्र राहण्यामुळे मुलांच्या मनावर सुसंस्कार केले जात नाहीत आणि मुले वाममार्गाला लागण्याची शक्यता असते किंवा ते भरकटले जातात. खेड्याची प्रगती केली तर खेडे खुप सुधारण्याची शक्यता आहे. खेड्यात अशुद्ध पाणीपुरवठा किंवा गाई म्हशी यांना पिण्याच्या पाण्यात ,नदीच्या पाण्यात धूणे यामुळे नारू रोग, जीवजंतू मिश्रित पाणी प्यावे लागते त्यामुळे अनेक गावकरी रोगास बळी पडतात. काहीवेळा आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेड्यातील लोकांना प्राणास मुकावे लागते. शिवाय सुशिक्षित लोक शहराकडे जात असल्यामुळे गावी अडाणी आणि वृद्ध लोकांची जास्त संख्या असते. दोन-चार गावात एकच डॉक्टर असल्यामुळे आरोग्यसेवा मिळत नाहीत. श
िवाय शाळा उत्तम प्रतीच्या नसतात. मेडिकल सुविधा उपलब्ध नसतात.
गावात वाहतुकीची साधने नसल्यामुळे शिवाय रस्ते डांबरी नसल्यामुळे लोकांना असुविधांना सामोरे जावे लागते. गावात एका वर्गात पहिली ,दुसरी, तिसरी, चौथी हे चार वर्ग एकत्र बसल्यामुळे शिक्षणाच्या योग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. आज विज्ञान युग आहे. समाज वाऱ्याच्या गतीने सुधारत आहे. आज लोकं अंतराळात जाऊन पोहोचली आहेत, परंतु खेडी मात्र अशीच मागासलेली राहिली तर आपला भारत देश विकसित होण्याऐवजी अविकसित असाच राहील.सरकारने ठोस पावले उचलायला हवीत. सरकारने खेड्यांकडे लक्ष देऊन खेड्यांची सुधारणा करण्याकडे कल ठेवावा. ग्रामीण जीवनात जास्तीत जास्त उद्योगधंदे किंवा कार्यशाला उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून समाज शहराकडे न वळता गावातच राहील आणि त्यांची परिस्थिती देखील सुधारेल. खेड्यातील शाळा किंवा सोयी-सुविधा यांची उपलब्धता व्हावी, कार्यक्रमात त्यांच्या विकासाला महत्त्व प्राधान्य दिले आहे पण एका सरकारचे काम नाही तर त्यासाठी सुशिक्षित जगातील प्रत्येक व्यक्तीचे आहे. आता प्रयत्नांची गरज आहे .अनेक सेवाभावी सामाजिक संस्था दुर्गम अशा खेड्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी अजून खूप खूप काम बाकी आहे. शाळा ,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खेड्यातील लोकांना स्वच्छतेच्या, आरोग्याच्या सवयी लावल्या आणि साक्षरता प्रसाराची मोहीम हाती घेतली तर फार जलद गतीने ग्राम सुधारणेचे कार्य होण्यासारखे आहे. ग्रामस्थांच्या जीवनातील दुःखाकडे त्यांच्या समस्यांकडे 'परदुःख शीतल' या भावनेने न बघता जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत अशी दृष्टी ठेवली तर ग्राम व त्यांच्या जीवनात भाग्याचे क्षण लवकरच येतील.' एकमेका साह्य करू ,अवघे धरू सुपंथ' या न्यायाने जर सर्वांनी खेड्यातील लोकांना सुधारण्याच्या संधी दिल्या, मदतीचा हात दिला तर आज खेड्यांचे रूपांतर ही विकसनशील खेड्यात व्हायचा दिवस आता दूर नाही.