Bharati Sawant

Others

2  

Bharati Sawant

Others

आजचा विषय -भय

आजचा विषय -भय

1 min
614


  मानवाला प्रत्येक गोष्टीचे भय असते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण भयाच्या छायेत वावरत असतात. कोणाला भुताचे तर कोणाला घरातल्यांचे, बाहेरच्यांचे तर कोणी आपल्या आपल्याच सावलीला घाबरतो. लहान मुले मुंगी, उंदीर,सरडा,साप अशा क्षुद्र प्राण्यांनाही घाबरतात. काहीजण तर कोळी किंवा विंचू यांना घाबरतात. प्राण्यांना सर्वच मानवजात घाबरते. काही प्रवासाला किंवा घरात एकटे राहायला घाबरतात. काहीजण मरणाला घाबरतं, कोणी आजारी पडायला घाबरते. मनुष्यप्राणी अतिशय भित्रा आहे.भय हे त्यांच्या पाचवीलाच पुजलेय.माणूस चोराला किंवा लूटीला घाबरतो. परंतु काही जण तरी चोरीच्या कल्पनेलाच घाबरतात.काहींना नेहमी असुरक्षित वाटते. कधीकधी भयाची भीषणता इतकी वाढते की त्या कल्पनेनेच ती व्यक्ती जास्त घाबरते आणि घाबरण्याची परिसीमा पार झाल्याने त्याचा शरीर आणि मनावर विपरित परिणाम होतो.

    रोगांना विकारांना बळी पडतो. त्यामुळे प्रत्येकाने भयाचे कारण समजून त्याचे परिमार्जन करणे हितावह असते अशाने मनुष्य सुरक्षित आणि निरोगी राहू शकेल.त्यामुळे भयाच्या छायेखाली कधी राहू नये. जो कोणी भित्रा असेल त्याची भीती कमी करण्याचा किंवा नाहीशी करण्याचा प्रयत्न व्हावा. या निसर्गातील प्रक्रिया आहेत. अंधाराला घाबरणारेही काही महाभाग आहेत. बऱ्याच जणांना वाटते अंधारात कुणीतरी कुठेतरी लपून बसले आहे नि आपणास त्यापासून धोका आहे परंतु असे वाटण्यात काहीच तथ्य नसते. बालपणापासून आपण भूत, वेताळ अशांच्या भाकड कथा वाचत, ऐकत आलो आहोत. त्यामुळे काहीजण भयाच्या छायेखाली वावरत असतात. अंधार ,उजेड या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. म्हणून भयापासुन मुख्यतः होण्याचा प्रयत्न व्हावा.


Rate this content
Log in