Bharati Sawant

Others

1  

Bharati Sawant

Others

आजचा विषय - ऐतिहासिक

आजचा विषय - ऐतिहासिक

2 mins
504


काय हरकत आहे गड-किल्ल्यांचे रिसॉर्ट झाले तर! गड किल्ले पडलेत. बुरूज ढासळलेत. तटबंदी निखळलेत. बोटावर मोजता येतील एवढे लोक तिथे जातात. काहीजण जातात ते एकांत मिळतो म्हणून तर काही पार्ट्या करण्यासाठी. एवढी भव्य ऐतिहासिक किल्ल्यांची अवस्था आज मोडकळीस आलेल्या दुर्लक्षित झालेल्या जुन्या वाड्याप्रमाणे झाली आहे. सरकारने काही ठोस पावले उचलली तर जनतेकडून विरोधच केला जातो. मग हेच माईचे लाल डागडूजीला किंवा तिथल्या सफाईला कुठे जातात या ऐतिहासिक वास्तूंवर अश्लिल काहीबाही नावे कोरलेली दिसतात. तेव्हा जात नाहीत सांगायला, समजवायला. 

           जर सरकारने त्या वास्तू ताब्यात घेतल्या तर त्यांची डागडुजी तरी होईल. त्यांचे नूतनीकरण होईल नाहीतर आणखी दहा बारा वर्षात सर्वच पडझड आणि गर्दुल्ल्यांचे वस्तिस्थान पहायला मिळेल तेव्हा काय सांगणार की आमच्या शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकात येथे किल्ले नि तटबंदी बांधली होती पण त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आता पुसल्या गेल्या आहेत. सरकारचा हा निर्णय स्वागतार्हच म्हणावा लागेल त्यामुळे काही बेरोजगारांना रोजगार मिळून किल्यांचे अस्तित्व टिकून राहील.

      विरोध करायला सारेच पुढे येतात तसेच सरकारकडून काही चांगली किंवा हितावह कामे होत असतील तर त्यास पाठिंबा द्यायला जेव्हा पुढे याल तेव्हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने प्रगत नि विकसित झालेला दिसेल. जे लोक अशा घोषणांना किंवा सरकारच्या निर्णयाला विरोध करतात त्यांनी राजस्थानमधील जयपूर, उदयपूर या शहरांना जरुर भेटी द्याव्यात.तिथे राजमहालाचे रूपांतर रिसॉर्टमध्ये करून आज करोडो रुपये कमवत आहेत. प्रदर्शनीमध्ये तिकिटे काढून रांगा लागत आहेत. कितीतरी लोकांच्या पोटापाण्याची सोय झाली आहे असे पडझड झालेले किल्ले पोटाशी धरून बसलात तर सुधारणा होणे दूरच पण सरकारच्या निर्णयाची पायमल्ली होते असे मला वाटते. त्यामुळे भविष्यकाळाच्या दृष्टीने अंतर्मनाशी विचार करून योग्य ती पावले उचलावीत. सरकारला प्रत्येक गोष्टीत मागे खेचण्यात शहाणपणा नाही हे लक्षात ठेवावे आणि सरकारला प्रगतीच्या निर्णयापासून परावृत्त न करावे करावे हेच इष्ट असे मला वाटते.



Rate this content
Log in