यश
यश
1 min
370
भास वा आभास नसे
आकाशाला गवसणी घालण्याचा,
मेहनतीचा डोंगर पार करुनी
मिळे मार्ग यशाचा.
यश मिळविण्या कुणी
कुणाचे पाय न् खेचावे,
पुढे पुढे चालावे
आनंदाचे क्षण वेचावे.
प्रत्येकाचा वाटा असे
पिंजरलेल्या निळ्या आभाळी,
कर्तुत्वाचा मांजा हाती
यशाचीच फळे भाळी.
आजचा बालक
शिल्पकार उद्याच्या भारताचा,
झेप घेई आकाशी
कमान वाढविण्या यशाचा.
