यश
यश
यश गिरीशिखरे चढण्यात असतं,
तसंच पराभव मानण्यातही असतं.
यशाकडे पाहण्याची दृष्टी आली,
तर यशस्वी होण्याची गणितं सुटतात.
असंच पहा, एखाद्या बाळाने,
चिमणीचे सुंदर चित्र काढले,
किती छान काढले, म्हणणे,
हे त्या कलेतलं यश असतं.
फांदीवर बसलेली चिमणी काढ बरं,
कशी दिसते पाहू, ही त्यास,
दिलेली प्रेरणा असते,
म्हणून यश लहान गोष्टीत असतं,
जसं छान माझा बाळ म्हणलेलं,
यश प्रमाणपत्राहून मोठं असतं.
यश ही प्रेरणा आहे,
यश ही साद आहे,
म्हणून साद न दिलेलं,
यश, हे अपयशच वाटतं
म्हणूनच, अभिनंदन तितकंच,
महत्त्वाचं असतं,
जितकं साद देण्यात आलेलं,
मन तितकंच मोठं असतं.
यश मिळवण्यासाठी अभ्यास,
असावाच लागतो,
पण अभ्यास करु,
आणि अभ्यासाला बसू,
यात बरंच अंतर असतं.
म्हणून लहान लहान, निखळ
विचारातदेखील यश असतं.
