STORYMIRROR

Dipali patil

Others

3  

Dipali patil

Others

योगीता एक प्रेरणा

योगीता एक प्रेरणा

1 min
152

लोटत होते रहाटगाडे

तेच नीरस रोजचे

थबकले होते जागीच

काटे जसे बंद घड्याळाचे


निर्दयी समाज माणसांचा

त्यात अलिप्त जीवनशैली

असलो कितीही मनमोकळे

तरीही त्यांची तोंड बांधलेली


तरसतो बोलायां जीव

व्यक्त कराव्या भावना

होते त्याने मन हलके

अर्थ येतो आपल्या जीवना


भेटली मैत्रीण अचानक

ओळख कधीही नसलेली

सुरू जाहला विषय चर्चेचा

वाक्य एकमेकांच्या मनातली


सहजच निघाले तोंडातून

तान येतोय खूप जीवनात

आपलेच देतात दुःख

सल बोचते मम अंतःकरणात


म्हणाली सरळ ती मला

कर सुरवात लिहायला

नीघ एकदाची सखी तू

सोडून हया डबक्याला..


केले मार्गदर्शन सगळे

कुठे कस लिहावे ते

अडत गेले जेथे मला

तिथे पुढे मज नेते


आज लिहितेय मी

व्यक्त होतेय मी

मनमोकळं करतेय मी

वर्तमानात जगतेय मी


प्रवृत्त केले तिने मला

तत्पर असते सदैव मदतीला

छंद होतोय लिहिण्याचा

मनापासून धन्यवाद तिला



Rate this content
Log in