योगा (नीरजा काव्य )
योगा (नीरजा काव्य )
1 min
14K
भारतीय परंपरा थोर
योगाचे देणं
अनमोल
सुदृढ
निरामय आरोग्य
योगाने होईल तत्पर
साधावा ब्राह्ममुहूर्त नियमित
करून शरीर
शुचिर्भूत
श्रीगणेशा
योगसाधनेचा करून
परिवर्तन आणू जीवनशैलीत
आसन, ध्यान, प्राणायाम
योगाचेच प्रकार
शरीरस्वास्थ्य
मनस्वास्थ्य
देई निरंतर
सातत्याने हवा व्यायाम
जीवनात सकारात्मक दृष्टिकोन
योगाने मिळेल
सकलांस
सैराट
चंचल मनाला
योगसाधनेने घालू वेसण
