STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Others

3  

Urmi Hemashree Gharat

Others

यंञयुग

यंञयुग

1 min
266



यंञ युग...

आधुनिक वस्तु वापरता वापरता

यंञाचेच होऊन गेलो

यंञानेच दिस सुरु होता

जगणेच विसरुन गेलो


परग्रहावर जाऊन पोहोचलो

माणसे माणुसकीही दुरावली

वाटले विश्व मुठीत आले

परी ओंजळ बघता खाली


जुने ते सोने होते

पटते आता कधीतरी

ऊगीच वाटत राहते

जगावे पुन्हा जुन्यासवे एकदातरी.



Rate this content
Log in