यंदा दिवाळी आहे म्हणायचं...!
यंदा दिवाळी आहे म्हणायचं...!
यंदा दिवाळी आहे म्हणायचं....
बकऱ्याची, कोंबड्याची, टाकलेल्या तुकड्यांची
फेकलेल्या साड्यांची, उचललेल्या नोटांची
जिरुस्तर जिरवणाऱ्या रिकाम्या झालेल्या बाटल्यांची
यंदा दिवाळी आहे म्हणायचं...
साहेबांची, ताईची, दादाची अन वहिनीची
साहेबांच्या जिन्यातून हात दाखवणाऱ्या पोराची
बेंबीच्या देठापासून कोकलणाऱ्या बेहिशोबी बाबूंची
यंदा दिवाळी आहे म्हणायचं...
टाळ्यांची, गर्दीची, झेंड्यांची अन सभांची
नाऱ्यांची, केऱ्यांची अन आयत्या बिळावरच्या नागोबांची
बोट दाखवून, छाती बडवून मत घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दैवतांची
यंदा दिवाळी आहे म्हणायचं...
निळ्याची,पिवळ्याची, हिरव्या अन भगव्याची
जातीची,धर्माची,झुंबड उडालेल्या तुफान गर्दीची
काठ्यांची, कुऱ्हाडीची,भावभावकीच्या मतभेद-तंट्याची
यंदा दिवाळखोरी पण आहे म्हणायचं...
तुमची,आमची,बेरोजगार,कामगार अन शेतकऱ्याची
बायकांची,लेकरांची,उन्हात भाजनाऱ्या रॅल्यांची
घरची भाकर,बापाची गाडी,पेट्रोलच्या रांगाची
यंदा खरंच दिवाळखोरी आहे म्हणायचं...
निर्लज्ज,जातीव्यवस्थेला पूजनाऱ्या मतदारांची
आश्वासनांनी पोट भरून जयजयकारात मिरवण्याची
अन तोच वसा पुढं नेऊन दिवाळ मागणं करणाऱ्या भविष्याची
