येता सरी पावसाच्या
येता सरी पावसाच्या
1 min
25
येता सरी पावसाच्या
वाटे चिंब चिंब भिजावे
लहानपणीची आठवण
कुणाकुणाला सांगावे
वाहत्या डबक्यात
सोडलेली जहाज
विटी-दांडू खेळ
आठवत आहे आज
खोखो कबड्डी
हुतुतु हमामा
रेलगाडी ती जावी
गावच्या मामा
लपन चप्पल
घालून गोल रिंगण
मामाचं पत्र हरवलं
किती जावे सांगून
आता शहारा अंगा
झोंबते ती आठवण
खेळ लहानपणीचे
मजा वाटे पाहून
