STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

येता पावसाच्या सरी

येता पावसाच्या सरी

1 min
177

येता पावसाच्या सरी 

धरतीवर पसरे आनंद लहरी 

मातीचा सुगंध मन उल्हासित करी 

 पडे साऱ्यांचा विसर धुंद गार  

वार्‍यासवे येई सृष्टीला बहर  


येता पावसाच्या सरी 

धुंद होई सारा परिसर

 रिमझिम बरसणाऱ्या सरी जणू गात असे मधुर स्वर  


येता पावसाच्या सरी

 तृप्त होई धरा  

पाने-फुले पशुपक्षी सारेच सुखावती

 तप्त मातीला अन् मनाला

मिळे नवचैतन्य नवा गारवा  


येता पावसाच्या सरी 

 लतावेली चित्त भुलवी सुमने त्यावर रास करी

 सृष्टीचे सौंदर्य खुलवे या बरसणाऱ्या सरी 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை